नाशिक : अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांवर नाव न घेता टीका केली. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे (Devendra Fadnavis on Amruta fadnavis tweet about mumbai police). “अमृता फडणवीस यांनी केलेलं ट्विट हे सुशांत सिंह राजपूत यांच्याविषयी आहे. या ट्विटचा कुणीही चुकीचा अर्थ काढू नये”, असं देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांसोबत बोलताना स्पष्ट केलं.
“मुंबई सुरक्षित आहे. आम्हाला राजकारण करायचं नाही. पण सुशांत सिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी जनतेला उत्तर हवं आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले (Devendra Fadnavis on Amruta fadnavis tweet about mumbai police).
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
अमृता फडणवीस नेमकं काय म्हणाल्या?
“बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरण ज्या पद्धतीने हाताळले जात आहे – मला वाटते मुंबईने माणुसकी गमावली आहे. निर्दोष, स्वाभिमानी नागरिकांसाठी जगणे यापुढे सुरक्षित वाटत नाही” अशा आशयाचे ट्वीट अमृता फडणवीस यांनी केले.
The manner in which #SushantSinghRajputDeathCase is being handled – I feel #Mumbai has lost humanity & is no more safe to live – for innocent, self respecting citizens #JusticeforSushantSingRajput #JusticeForDishaSalian
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) August 3, 2020
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाच्या चौकशीवरुन राज्य सरकारवर टीका केली आहे. “राज्य सरकार बिहार पोलिसांना त्यांचे कर्तव्य न बजावू देता अनावश्यक संशयाच्या भोवऱ्यात का पडत आहे, हे खरोखरच विचित्र आहे”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
It is really very strange that why Maharashtra Government is coming under unnecessary suspicion by not allowing Bihar Police to perform their duties. #SushantSinghRajputCase
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2020
“केरळमधील वैद्यकीय पथकाने मुंबईला भेट दिली. उत्तर प्रदेश पोलीस विकास दुबे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुंबईत आले. बिहार पोलिसांची एक टीम आधीच चार दिवसांपासून मुंबईत कार्यरत आहे. पण त्यापैकी कुणालाही अडचणीत आणलं गेलं नाही. पण फक्त बिहारच्या पोलीस अधिक्षकांनाच का वेगळी वागणूक दिली जात आहे?”, असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला.
A medical team from Kerala visited Mumbai, UP Police came to investigate Vikas Dubey case, a team from Bihar police is already working in Mumbai since 4 days but none of them were quarantined then why only an SP rank officer is treated differently?#SushantSinghRajputCase
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2020
“अशा प्रकारच्या वागणुकीमुळे सुशांतच्या मृत्यूचे गूढ उकलण्याऐवजी लोकांच्या मनात संशय आणि अविश्वासच निर्माण होईल”, असंदेखील देवेंद्र फडणवीस ट्विटरवर म्हणाले.
Instead of solving the mystery of #SushantSinghRajput ‘s death , such behaviour will only result into huge public outcry and disbelief amongst the people about the investigation.
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) August 3, 2020
अमृता फडणवीसांच्या ट्विटला शिवसेनेकडून प्रत्युत्तर
दरम्यान, अमृता फडणवीसांच्या ट्विटला शिवसेनेकडून प्रत्युत्तर देण्यात आलं आहे. शिवसेनेच्या राष्ट्रीय प्रवक्त्या आणि राज्यसभेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी अमृता फडणवीसांवर टीका केली. “मुंबई पोलिसांवर आरोप करुन बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांना आव्हान करु इच्छिते की, त्यांना असुरक्षित वाटत असेल तर त्यांनी मुंबई पोलिसांची सुरक्षा सोडावी. त्यांनी खासगी सुरक्षा एजन्सींकडे जावं, जिथे त्यांना सुरक्षित वाटेल. महाराष्ट्राच्या माजी मुख्यमंत्र्यांच्या पत्नीने अशाप्रकारचं वक्तव्य करणं लाजिरवाणं आहे”, असा घणाघात प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.
I challenge these state BJP leaders&their political aspiration bearing family accusing @MumbaiPolice&defaming them, to give up their police security go for private agencies who can make them feel safe in the city. As wife of fmr CM who was also HM to speak this way is shameful
— Priyanka Chaturvedi (@priyankac19) August 3, 2020
युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाई यांनीदेखील मिसेस फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं. “मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय याच मुंबई पोलिसांची सिक्युरिटी कव्हर (पोलिस संरक्षण) घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता?? सोडून द्या की सिक्युरिटी कव्हर भरोसा नसेल तर !!” अशा शब्दात सरदेसाई यांनी आव्हान दिलं.
मॅडम, तुम्ही आणि तुमचे कुटुंबीय ह्याच मुंबई पोलिसांची Security Cover घेऊन त्यांच्यावर इतके नीच आरोप करता??
सोडून द्या की security cover भरोसा नसेल तर !! https://t.co/ITw8AKLN0P
— Varun Sardesai (@SardesaiVarun) August 3, 2020
याआधी, “ठाकरे आडनाव लावल्याने कोणीही ठाकरे होत नाही. त्यासाठी सत्यवादी आणि तत्वनिष्ठ असावं लागतं. एखाद्याने स्वतःचे कुटुंब आणि सत्तेपेक्षा जनता आणि पक्षातील कार्यकर्त्यांच्या हिताचा विचार करण्याची गरज असते,” असं ट्वीट करत अमृता फडणवीसांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला होता. त्यानंतर शिवसेना आणि मिसेस फडणवीस यांच्यात ट्वीटयुद्ध रंगले होते.
संबंधित बातमी :
भरोसा नसेल तर पोलिस सिक्युरिटी सोडा, वरुण सरदेसाईंचे अमृता फडणवीसांना प्रत्युत्तर