मुंबई : “इच्छा असेल तिथे मार्ग, असा एक वाक्यप्रचार आहे. पण मेट्रोच्या कामाची अवस्था बघून मला नवीन वाक्यप्रचास सूचला आहे. इच्छा असेल तिथे मार्ग, टाईमपास करायचा तर कांजूरमार्ग”, असा टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. मुंबईत भाजपच्या पदाधिकारी मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी त्यांनी मेट्रो कारशेडवरुन राज्य सरकारवर सडकून टीका केली (Devendra Fadnavis slams Thackeray government on Metro carshed).
“मेट्रो कारशेडच्या जागेची मला मालकी मिळणार आहे का? आरे कॉलनीत कारशेड उभारण्याचा निर्णय काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री असताना घेतला होता. भाजप सरकार स्थापन होण्याच्या काही दिवसांआधी चव्हाण यांनी निर्णय घेतला होता. त्यावर केंद्र सरकारने सांगितलं होतं की, आम्हाला मेट्रो अंडरग्राऊंड करायची आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या मंत्रिमंडळाने आरे कारशेडच्या जागेचा निर्णय घेतला. त्याचबरोबर त्या जागेता कमर्शिअल वापर करुन एक हजार कोटी रुपये उभे करण्याचादेखील निर्णय घेतला होता”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
“भाजप सरकारने त्या जागेचा कमर्शिअल वापर करणार नाही, असा निर्णय घेतला. एक हजार कोटी आपण दुसरीकडून उभारु. आरे कॉलनीतील केवळ 25 एकर जागा घेऊ आणि त्यावर कारशेड उभारु. भाजप सरकार जेव्हा आलं तेव्हा अनेकांनी विरोध केला. मी तात्काळ आरेच्या कारशेडला स्थगिती दिली”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
“आरेच्या जागेला काय पर्याय आहे याचा विचार करायला सांगितलं. त्यासाठी प्रशासनाची एक कमिटी निर्माण झाली. या कमिटीने कांजूरमार्गची जागा सूचवली. पण ही जागा खर्चिक असल्याचं त्यांनी सांगितलं. पहिल्यांदा ही जागा सक्षमीकरण्यासाठी दोन वर्ष लागतील. त्यासाठी 1200 कोटी रुपये खर्च लागेल. याशिवाय तीन महिन्यात जर ही जागा उपलब्ध झाली नाही तर हा प्रकल्प होऊ शकणार नाही. त्यामुळे सर्वात सोयीस्कर जागा ही आरेची असल्याचं त्या समितीने सांगितलं”, असं फडणवीस म्हणाले.
“कांजूरमार्गच्या जागेसाठी आम्ही हायकोर्टात गेलो. कारण त्यावर स्थगिती होती. सर्व रिकॉर्ड आहेत. कोर्टात चीफ जास्टीसने सांगितले की, 2600 कोटी रेडी रेकनरचा भाव आहे तो कोर्टात जमा करा. त्यानंतर तुम्हाला ही जागा मिळेल. सर्व सचिवांनी सांगितले की कांजूरमार्गला कारशेड होऊ शकत नाही”, असं फडणवीस यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या :
देशातील लोकांना ‘कर्मयोग’ आवडतो, ‘बोलघेवडेपणा’ नाही; फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
“ऊर्जा मंत्री तुम्ही सावकार झालात, सावकारासारखी गरिबांकडून वसुली करत आहात”: देवेंद्र फडणवीस