दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी; आजच होणार SIT स्थापन, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?

| Updated on: Dec 12, 2023 | 11:22 AM

कर्नाटकच्या उडुप्पी याठिकाणी जन्मलेली दिशा सालियान ही सेलिब्रिटी मॅनेजर होती. तिने वरुण शर्मा, सुशांत सिंह राजपूत, भारती सिंह यांसारख्या लोकप्रिय कलाकारांसोबत काम केलं होतं. याशिवाय ती बऱ्याच जाहिरातींच्या एजन्सीसोबतही जोडली गेली होती. टीव्ही अभिनेता रोहन रॉयला ती डेट करत होती.

दिशा सालियन मृत्यूप्रकरणी मोठी बातमी; आजच होणार SIT स्थापन, आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढणार?
दिशा सालियन, आदित्य ठाकरे, सुशांत सिंह राजपूत
Image Credit source: Instagram
Follow us on

मुंबई : 12 डिसेंबर 2023, गिरीश गायकवाड | सुशांत सिंह राजपूतची एक्स मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी मोठी बातमी समोर येत आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी आज एसआयटी (SIT) स्थापन केली जाणार आहे. यासाठी महाराष्ट्र सरकारकडून मुंबई पोलिसांनी लेखी स्वरुपात आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे दिशाच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एसआयटीसंदर्भात फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. एसआयटी स्थापन करून आजच नोटीस जारी करण्यात येणार असल्याचंही कळतंय. दिशा सालियानच्या मृत्यूप्रकरणी आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी अनेक आमदारांनी केली होती.

दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एसआयटी स्थापन करण्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात फोनवर चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी होणार आहे. एसआयटी स्थापन होऊन आजच नोटिफिकेशन जारी होणार असल्याचं कळतंय. राज्य सरकारकडून मुंबई पोलिसांना चौकशीचे आदेश देण्यात आले असून विवेक फनसळकरांची संयुक्त आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त यांच्यासोबत बैठक घेण्यात येणार आहे. 8 जूनच्या रात्री दिशा सालियानने 40 फोन कॉल केलेला तो नंबर कुणाचा, या मथळ्याखाली तपास सुरू होणार आहे. त्यामुळे – आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

“आदित्य ठाकरे यांच्या पाठीशी असलेले लाखो तरुण आणि त्यांचा पाठिंबा यांना खुपतोय. लोकसभेला आदित्य ठाकरे फिरले तर यांच्या मतावर परिणाम होईल म्हणून त्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आदित्य ठाकरे यांनी तर म्हटलंय की करा चौकशी. सत्य समोर येईलच,” अशी प्रतिक्रिया विनायक राऊत यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

आदित्य ठाकरेंचं काय कनेक्शन?

गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मुद्दा महाराष्ट्र विधानसभेत उचलण्यात आला होता. तेव्हा शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले आणि भाजप आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत दिशा सालियनच्या मृत्यूचाही मुद्दा उपस्थित केला आणि चौकशीची मागणी केली. शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांनीसुद्धा असा आरोप केला होता की सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्तीच्या फोनवर ‘AU’ नावाने 44 वेळा फोन आले होते. राहुल शेवाळे यांनी असाही दावा केला होता की बिहार पोलिसांच्या मते एयूचा अर्थ आदित्य आणि उद्धव ठाकरे असा आहे. तेव्हापासून AU नक्की कोण आहे, याच्या तपासाची जोरदार मागणी केली जाऊ लागली.