Sachin Waze : मोठी बातमी, रुग्णालयात आणलेल्या सचिन वाझेचे ‘या’ नेत्यावर खळबळजनक आरोप

| Updated on: Aug 03, 2024 | 9:13 AM

Sachin Waze : सचिन वाझेने राजकारणात खळबळ उडवून देणारे नवीन गंभीर आरोप केले आहेत. यामुळे महायुती विरुद्ध महाविकास आघाडीमध्ये आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगणार आहे. सचिन वाझे सध्या तुरुंगात बंद आहे. त्याला रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी आणलेलं. त्यावेळी मीडियाशी बोलताना त्याने गंभीर आरोप केलेत.

Sachin Waze : मोठी बातमी, रुग्णालयात आणलेल्या सचिन वाझेचे या नेत्यावर खळबळजनक आरोप
Sachin Waze
Follow us on

बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे याने खळबळ उडवून दिली आहे. त्याने नवीन धक्कादायक आरोप केले आहेत. त्यामुळे पुढच्या काही दिवसात महाराष्ट्रातील राजकारण आणखी तापणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाचा सामना रंगणार आहे. महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अलीकडेच राज्याचे गृहमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याला देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं होतं. आता सचिन वाझेने पुन्हा एकदा माजी गृहमंत्री अनिल देशमुखांवरच आरोप केले आहेत.

“जे काही झालं, त्याचे पुरावे आहेत. अनिल देशमुखांपर्यंत त्यांच्या पीए मार्फत पैसे जायचे. सीबीआयकडे याचे पुरावे आहेत. मी स्वत: देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याची माहिती दिलीय. मी सर्व पुरावे दिले आहेत. मी नार्को चाचणीसाठी सुद्धा तयार आहे. मी त्या पत्रात सर्व काही लिहिलं आहे. मी जयंत पाटील यांचं सुद्धा नाव दिलय” असं सचिन वाझेने ANI वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. सचिन वाझे सध्या तळोजा कारागृहात बंद आहे. त्याला रात्री वैद्यकीय तपासणीसाठी जेजे रुग्णालयात आणलं होतं. त्यावेळी एएनआयशी बोलताना त्याने हे खळबळजनक दावे केले.


सचिन वाझे कुठल्या कुठल्या प्रकरणात आरोपी

सचिन वाझे मुंबई पोलीस दलातील बडतर्फ पोलीस अधिकारी आहे. 100 कोटी रुपयाच्या खंडणी प्रकरणात तो आरोपी आहे. त्याशिवाय 2021 मध्ये अँटिलायबाहेर बॉम्ब ठेवणं आणि मन्सुख हिरेन हत्या प्रकरणात आरोपी आहे. आपण गृहमंत्री असताना तत्कालीन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याला ईडी कारवाईपासून वाचण्यासाठी ऑफर दिली होती, असा धक्कादायक गौप्यस्फोट अनिल देशमुखांनी काही दिवसांपूर्वी केला. अनिल देशमुखांनी फडणवीसांबाबत पुरावे दिले, तर पुढच्या 3 तासात त्यांचा पदार्फाश करु असं आव्हान चित्र वाघ यांनी अनिल देशमुखांना दिलं होतं.