Uddhav Thackeray : द्रौपदी मुर्मू मुंबईत, पण मातोश्रीवर जाणार नाही; उद्धव ठाकरेंशी भेट होणार की नाही?

| Updated on: Jul 14, 2022 | 12:39 PM

Uddhav Thackeray : राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना सुरुवातीपासून संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत होती. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी यूपीएची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्या बैठकीला शिवसेनेकडून सुभाष देसाई उपस्थित होते.

Uddhav Thackeray : द्रौपदी मुर्मू मुंबईत, पण मातोश्रीवर जाणार नाही; उद्धव ठाकरेंशी भेट होणार की नाही?
द्रौपदी मुर्मू मुंबईत, पण मातोश्रीवर जाणार नाही; उद्धव ठाकरेंशी भेट होणार की नाही?
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: भाजपच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू (draupadi murmu) आज मुंबईत येणार आहेत. या भेटीत त्या भाजपचे खासदार आणि आमदारांशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर शिंदे गटाच्या आमदारांशीही चर्चा करून त्यांना मतदान करण्याचं आवाहन करणार आहेत. मात्र, त्यांना स्वत:हून पाठिंबा देणाऱ्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (uddhav thackeray)  यांना मातोश्रीवर जाऊन भेटणार नाहीत. पण उद्धव ठाकरे यांना त्या इतर ठिकाणी भेटणार होण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरे आणि द्रौपदी मुर्मू यांची भेट घडवून आणण्यासाठी भाजप नेते विनोद तावडे हे प्रयत्न करत असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे मुर्मू या उद्धव ठाकरे यांची भेट घेणार की नाही? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तर मुर्मू यांनी मातोश्रीवर यावं म्हणून आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला नाही, असं शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी आधीच स्पष्ट केलं आहे. तर, मुर्मू यांनी मातोश्रीवर जावं असं शिंदे गटाचंही म्हणणं आहे.

द्रौपदी मुर्मू आज दुपारी मुंबईत येणार आहेत. दुपारी त्या हॉटेल लीला, इंटरनेशनल एयर पोर्टचा जवळ, अंधेरी येथे येत आहेत. यावेळी त्या भाजपचे खासदार आणि आमदारांची भेट घेणार आहेत. शिंदे गटाच्या आमदारांची भेट घेऊन त्यांनाही मतदान करण्याचे आवाहन करणार आहे. त्यानंतर त्या मीडियाशी संवाद साधणार आहे. त्यानंतर त्या उद्धव ठाकरे यांना भेटण्याची शक्यता आहे. मुर्मू यांच्या महाराष्ट्रातील प्रचाराची धुरा विनोद तावडे यांच्याकडे आहे. उद्धव ठाकरे यांनी मुर्मू यांना पाठिंबा दिल्यानंतर तावडे यांनी सर्वात आधी ठाकरेंच्या भूमिकेचं स्वागत केलं होतं. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि मूर्म यांची भेट घडवून आणण्याचा तावडे प्रयत्न करत आहेत.

हे सुद्धा वाचा

शिंदे गट म्हणतो…

शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी कालच याबाबत प्रतिक्रिया व्यक्त केली होती. मुर्मू यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली पाहिजे, असं केसरकर म्हणाले होते. त्यामुळे भाजपकडून काय निर्णय घेतला जातो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

उद्धव ठाकरेंची इच्छा नाही?

दरम्यान, राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत शिवसेना सुरुवातीपासून संयुक्त पुरोगामी आघाडीसोबत होती. राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यासाठी यूपीएची दिल्लीत बैठक झाली होती. या बैठकीत यशवंत सिन्हा यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब करण्यात आलं होतं. त्या बैठकीला शिवसेनेकडून सुभाष देसाई उपस्थित होते. त्यामुळे शिवसेना यूपीए सोबतच राहील असं वाटत होतं. मात्र, शिवसेनेत आमदारांनी केलेलं बंड, त्यामुळे राज्यातील सत्ता गमवावी लागणे, शिंदे गटाकडून शिवसेनेवरच दावा सांगण्याचा केलेला प्रयत्न या सर्व गोष्टी घडलेल्या असतानाच खासदारांनीही भाजपच्या उमेदवार मुर्मू यांना पाठिंबा देण्याची मागणी केली. त्यातच शिवसेनेचे 12 खासदार भाजपच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना भाजपच्या उमेदवाराला इच्छा नसताना पाठिंबा द्यावा लागल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे हे मुर्मू यांना मातोश्रीवर भेटणार नसल्याचं सांगितलं जात आहे.