Dussehra 2021 Live Updates | दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

| Updated on: Oct 15, 2021 | 9:34 PM

आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण संपूर्ण भारतात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे.

Dussehra 2021 Live Updates | दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया
Follow us on

संपूर्ण भारतात आज (15 ऑक्टोबर) विजयादशमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. राज्यात दसऱ्याचा उत्साह पाहायला मिळत आहे. बाजारपेठा फुलल्या आहेत. महाराष्ट्रात दसऱ्याला राजकीय दृष्ट्याही मोठं महत्त्व असते. आज, शिवसेनाचा दसरा मेळावाही पार पडणार आहे. याआधी दुपारी भाजप नेत्या पंकडा मुंडे यांचा बीड जिल्ह्यातील सावरगावात भगवान गडावरील दसरा मेळावा खूप गाजला. त्याआधी नागपुरात सकाळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून शस्त्रपूजन पार पडलं. त्यानंतर आता शिवसेनेच्या दसरा मेळाव्याकडे जनतेचं लक्ष आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 15 Oct 2021 08:14 PM (IST)

    दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

    दसऱ्यालाच त्यांनी शिमगा करुन टाकला, उद्धव ठाकरेंच्या भाषणावर भाजप प्रदेशाध्यक्षांची पहिली प्रतिक्रिया

    भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे :
    उद्धव ठाकरेंनी दसऱ्याचा शिमगा केला
    केंद्राच्या नावाने शिमगा करुन काय उपयोग?
    महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मदतीबाबत काय?
    राज्यात महिला अत्याचाराच्या घटना वाढल्या
    राज्यात ड्रग्ज, गांजाचे प्रकार वाढले
    तुम्ही अब्दुल सत्तार, धैर्यशील माने घेतले त्याला आमचं काहीच म्हणणं नाही.
    तुम्ही आदरणीय मोहन भागवत यांच्या वक्तव्याबाबत जे बोलले ते चिंताजनक आहे.
    स्वातंत्र्यसेनेच्या वेळेला तुम्ही कुठे होते?
    तुमचा तर तेव्हा जन्मदेखील झाला नव्हता.
    सरसंघचालक हे स्वातंत्र्यसेनी होते. इतिहास वाचा.

    भारत माता की जय ची चेष्टाच केली

  • 15 Oct 2021 06:46 PM (IST)

    आपला आवाज दाबणारा जन्माला येऊच शकत नाही : उद्धव ठाकरे

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भाषणातील मुद्दे :

    मला कल्पना आहे बऱ्याच दिवसांनी आपल्याला वाव मिळाला आहे. आवाज आपला कुणी दाबू शकत नाही. आवाज दाबणारा जन्माला येऊ शकत नाही. सर्वप्रथम मी आपल्या सर्वांना दसरा आणि विजया दशमींच्या शुभेच्या देतो. मलाही बरं वाटलं. कारण मला बऱ्याच दिवसांनी जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधव आणि बघिनी आणि मातांनो अशी हाक देता आली.

    आपल्या सगळ्यांचे एकत्रित आशीर्वाद घेण्यासाठी हा दिवस असतो. शस्त्रपूजन झाल्यानंतर मी माझ्या खऱ्या शस्त्रांची पुजा केली. आपल्यावर फुलं उधळली. ही माझी खरे शस्त्र आहेत. हे आशीर्वाद घेत अशताना माझ्या मनात नेहमी नम्र भावना असते. प्रत्येक जन्मी हेच आई-वडील, माझा कुटुंब-परिवाह हाच मिळायला पाहिजे. आणि महाराष्ट्रात जन्म व्हावला पाहिजे. आणि मला स्वत:ला मी मुख्यमंत्री आहे, असं कधीच वाटू नये. माझं तर सोडाच तर माझ्या तमाम जनतेला मी मुख्यमंत्री आहे असं कधीच वाटता कामा नये. मी घरातलाच आहे, मी तुमचा भाऊ आहे, असं वाटो, अशी इच्छवर चरणी प्रार्थना आहे. कारण काही जणांना असं वाटतं जे बोलत होते पुन्हा येईल ते बोलत आहेत मी गेलोच नाही. बस आहे तिकडेच. पण जे संस्कार आणि संस्कृती असते ती हीच असते. पदं आणि सत्ता काय आहेत? पदं येतील जातील. पण कधीही अहमपणा कधी डोक्यात येऊ देऊ नको. ज्यादिवशी डोक्यात हवा जाईल, त्यादिवशी तू संपलास, अशी माझ्या वडील आणि आजोबांची शिकवण आहे.

    मी जनतेशी नेहमी नम्र राहत असतो. आशीर्वाद घेत असतो. हाच आशीर्वाद तर ताकद आहे. हे मागून कुणाला मिळत नाही. हे खरं वैभव आणि ऐश्वर्य आहे. हे जोरजबरदस्तीने मिळत नाही. ती कमवण्याची परंपरा मिळालेली आहे. मला काही गोष्टीचं नवल वाटतं, आजसुद्धा मी काय बोलणार कोणाचा समाचार घेणार, कोणाचे वाभाडे काढणार, बऱ्याच दिवसांनी बोलतोय, एकतर मनामध्ये विषयांची गर्दी झालीय. पण पंचायत अशीय की कोरोनामध्ये गर्दी झालीय. बरं गर्दीमध्ये दोन लसी घेतल्यात कारे बाबा? असं विचारु शकत नाही. मास्क कसा घालणार विचारणार. पण तरी मला हेही माहिती आहे माझ्या भाषणानंतर अनेकजण माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी, तोंडामध्ये बोंडकं घालूनच बसले आहेत. माझं भाषण संपतंय कधी आणि चिरकायला मिळतंय कधी. चिरकू द्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मी त्यांच्याशी बोलत नाहीय.

    मी तुमच्याशी बोलतोय. माझ्या जनता-जनार्दनाशी बोलतोय. माता भगिणींसाठी बोलतोय. पण एक विकृती हल्ली आलेली आहे. मला हल्ली असं वाटायला लागलं आहे, हे जे चिरकणं आहे, मग ठाकरे कुटुंबियांवर हलंले, हल्ले म्हणजे असा कुणी मायेचा पुत जन्माला आलेला नाही जो ठाकरेंवर हल्ला करेल, तिथल्या तिथे ठेचून टाकू त्याला. पण काहीही वाटेल ते बोलायचं, कुटुंबियांना बदनाम करायचं हे आता त्यांचं रोजगार हमीचं काम झालंय. काय करणार कोरोनात सगळं बंद झालंय. मग तू चिरकलास किती? हे त्याचे पैसे. तुम्ही चिरकत राहा. पण माझा वाडा चिरेबंदी आहे. टकरा मारा, मुसंड्या मारा, डोके फुटतील पण तडा जाणार नाही.

    वेगवेगळ्या प्रकाराने प्रयत्न चालले आहेत. परवा हर्षवर्धन पाटील बोलले होते. मी तर भाजपात जाणं शक्यच नाही. मी म्हणजे ते, माझं भाजपात जाणं शक्यच नाही. माझं हे जे आहे तेच माझं घर आहे. हर्षवर्धन पाटील अनाहूतपणाने बोलून गेले की भाजपात का गेलो? खरं तर अशी जी लोकं आहेत जे भाजपात गेले आहेत ती भाजपाची ब्रँड अॅम्बेसिटर झाले पाहिजेत. टीव्हीवरती जाहिराती येतात कोणतरी गोरा माणूस येतो त्याच्या तोंडात हिंदीत डब करुन टाकतात. पहिले मुझे नींद की गोली खाकरभी नींद नहीं आती थी. दरवाजे पे टकटक होती तो रोंगटे खडे हो जाते थे, फिर किसी ने कहा तुम भाजपा मे जाओ, अब भाजपा में जाने के बाद मै कुंभकर्ण जैसा सो सकता हँ, दरवाजेपर ठोका तोभी मैं उठता नाही.

    ही काय लायकीची माणसं आहेत, ते आपल्या अंगावर येत आहेत. आव्हान देत आहेत, हिंमत असेल तर अंगावर या. मी कशाला येऊ तुमच्या अंगावर? आम्ही कुणाच्या अंगावर जात नाही. पण कुणी आलं तर आम्ही सोडत नाही. आम्ही कशाला येऊ तुमच्या अंगावर? काय आहे तसं? लायकी तरी आहे का, पात्रता तरी आहे का? हीच शिकवण आम्हाला शिवरायांनी, शिवसेना प्रमुखांनी दिली आहे. पण अंगावर यायची भाषा करत असाल तर स्वत: मध्ये हिंमत आणि धमक असेल तर द्या. ईडी, सीबीआयच्या माध्यमातून देऊ नका. मी सुद्धा पक्षप्रमुख म्हणून आज आव्हान द्यायतं असेल तर माझ्या या मर्द शिवसैनिकांच्या माध्यमातून आणि त्यांच्या ताकदवर देईन. मुख्यमंत्री म्हणून देणार नाही. आव्हान द्यायचं आणि पोलिसांच्या मागे लपायचं, याला नामार्द म्हणतात.

    आज दोन मेळावे असतात. एक आपला आणि दुसरा आरएसएसचा. आपले विचार एक आहेत. पण धारा वेगळ्या असू शकतात. विचार एक होत्या, आहेत म्हणूनच भाजपसोबत युती केली होती. ज्यांना अजूनही वाटतं ते मुख्यमंत्री राहिले असते, कदाचित राहिले असते. जर तुम्ही शिवसेनेला दिलेलं वचन मोडलं नसतं तर तुम्हीसुद्धा आज नाहीतर उद्या मुख्यमंत्री राहिले असता. पण नशिबात नव्हतं म्हणून तुम्ही वचन तोडलंत. मी हे पद स्वीकारलं ते एका जबाबदारीने स्वीकारलं. मी केवळ माझ्या पित्याला दिलेलं वचन म्हणून मी हे पद स्वीकारलं. शिवेसेना प्रमुखांना दिलेलं वचन, तुमचा शिवसैनिक मी मुख्यमंत्री करुन दाखवेल, खरंतर ते वचन अजून पूर्ण झालेलं नाही. पण ते वचन मी पूर्ण करुन दाखवेलंच. ही जबाबदारी मी मोठ्या विचाराने घेतलेली आहे. कदाचित दिलेलं वचन त्यांनी पाळलं असतं शिवसैनिक मुख्यमंत्री केली असती तर मी या राजकीय जीवनातून बाजूला झालो असतो. हे क्षेत्र माझं नाही, अशी माझ्यावर टीका होते. हो हे माझं क्षेत्र नाही. मी एक पूत्र कर्तव्य निभावण्यासाठी या क्षेत्रात आलो आहे. आणि पाय रोवून ठाम पणाने उभा राहिलो आहे. जी जबाबदारी खांद्यावर आहे ती ठामपणे पार पाडल्याशिवाय राहणार नाही, या जबाबदारीने मी उभा राहिलेलो आहे.

    हे काही थोडांत नाही की, मैं तो फकीर हुँ, झोली पहनके, ये झोलीबीली असे कर्मदरिद्री आमचे विचार नाहीयत. हे विचार आमचे नाहीत. सकाळी आरएसएसचा मेळावा झाला. हिंदूत्व ही विचारधारा आपल्या दोघांमध्ये समान आहे. हिंदूत्व म्हणजे काय? मला मोहनजींना सांगायचं आहे की, मी जे बोलणार आहे ते कृपा करुन मी तुमच्यावर टीका केली असं मानू नका. पण तुम्ही जे काही सांगत आहात किंवा मी जे काही सांगतोय ते आपलीच माणसं ऐकत नसतील तर या मेळाव्यांची थेरं करायची तरी कशाला? गेल्यावर्षीही मोहनजींनी जे सांगितलं होतं हिंदूत्व म्हणजे काय? मी आणले आहेत त्यांचे वाक्य.

    एक मुद्दा मी स्पष्ट करु इच्छितो, आमचं हिंदूत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. शिवसेनाप्रमुखांनी अनेकवेळा सांगितलं आहे, पहिल्यांदा आपण माणूस म्हणून जन्माला येतो. जात-पात, धर्म हा नंतर चिकटतो. मग काय करायच? धर्माचा अभिमान असला पाहिजे. धर्म पाळला पाहिजे. पण प्रत्येकाने आपला धर्म घरात ठेवायचा, घराबाहेर पाऊल टाकतो हा माझा देश हा धर्म असलाच पाहिजे, हे आमचं हिंदुत्व आहे. हा विचार आमचा आहे. ही शिकवण आम्हाला दिलेली आहे. अशी शिकवण घेऊन आम्ही जेव्हा घराबाहेर पडतो, देश हा धर्म असं म्हणून वाटचाल करत असतो त्यावेळेला आमच्या वाटेत स्वत:च्या धर्माची मस्ती घेऊन कोणी अडथळा आणला तर मग आम्ही कडवट देशाअभिमानी, राष्ट्राभिमानी हिंदू म्हणून त्याच्यासोबत उभं राहिल्याशिवाय राहणार नाही.

    मोहन भागवतांचे विचार, त्यांनी म्हटलेलं आहे, हिंदुत्व म्हणजे काय त्यांनी म्हटलेलं खरंय. आपल्या सर्वांचे पूर्वज एक होते. आता एकदम पूर्वजांर्यंत जात नाही. नाहीतर माकडापर्यंत पोहोचू आपण. या देशापुरता विचार करायचा झाला तर आपले पूर्वज एकच होते. हे जर आपल्याला मान्य करायचं असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज काही परग्रहावरुन आले होते का? आता जे शेतकरी आंदोलन करत आहेत त्यांचे पूर्वज परग्रहातून आले होते का? लखीमपूरला जे शेतकरी दिवसाढवळ्या मारले त्यांचे पूर्वज परग्रहातून आले होते का? हा जो विचार आहे. आपण सगळे एक आहोत. आम्ही कुणाचा द्वेष, मत्सर करत नाहीत. पण हे जे दिवसाढवळ्या दिसतंय ते मोहनजी तुम्हाला मान्य आहे का? मी जनतेला विचारतो तुम्हाला तरी हे मान्य आहे का? जे मी शस्त्रपुजा म्हणून तुमची पुजा करायची आहे.

    सर्वसामान्य माणसाला मला तेच सांगायचं आहे की, तू सर्वात ताकदवान आहेस, तुझ्या हातात लोकशाहीने दिलेलं जे शस्त्र आहे ते मत. हे मत एका क्षणात रावाचं रंक आणि रंकाचा राव करु शकतं. इतकी ताकद तुझ्या मनगटात आहे. तू दुबळा नाहीस. त्यानंतर त्यांनी जे काही पुढे सांगितलं आहे, हिंदुराष्ट्र शब्द जेव्हा वापरतो त्यात सत्ता मिळवण्याची लालसा नसते. पण तुमच्या वितारातून जे लोकं बाहेर पडले आहेत, सत्ता काबीज करुन बसले आहेत त्यांना ही शिकवणी परत लावा एकदा. सध्या जो खेळ सुरु आहे वाट्टेल ते करायचं पण मला सत्ता पाहिजे. व्यसनाधीनता हा जो प्रकार आहे, अंमली पदार्थ हा वेगळा प्रकार आहे. त्याचा नायनाट केलाच पाहिजे. पण सत्तेचं व्यसन हा सगळा अंमली प्रकारच आहे. अगदी बाजार समित्यांपासून लोकसभेपर्यंत माझ्याच अंमलाखाली पाहिजे हा सुद्धा एक अंमली प्रकारच आहे. या अंमली प्रकाराचा बंदोबस्त कोण करणार?

    आपल्या हक्काच्या सरकारला दोन वर्ष पूर्ण होतील. अनेक प्रयत्न केले. फोडण्याचे-पाडण्याचे प्रयत्न केले. मी तर आज सुद्धा सांगतो हिंमत असेल तर पाडून दाखवा. पण तसं करुन पडत नाही. आपल्याकडे एक खेळ आहे, छापा की काटा, छापा टाकला की काटा काढायचा. हे जास्त थेरं चालू शकत नाही. हा देशाचा स्वातंत्र्य महोत्सवाचा अमृतमहोस्तव सुरु आहे. त्यावेळेला जसा संपूर्ण देश पेटला होता त्या देशात महाराष्ट्र लाल-बाल आणि पाल पुढे होता. महाराष्ट्र, पंजाब आणि बंगाल स्वातंत्र्यलढ्यात पुढे होता. बंगालने त्यांचं कर्तृत्व दाखवलेलं आहे. मी खरोखरच बंगाली जनतेला आणि ममता दिदींना धन्यवाद देतो आणि अभिनंदन करतो आहे. तुम्ही न झुकण्याची जिद्द कायम ठेवलेली आहे. ती जिद्द आपल्या सुद्धा रगारगात आणि रक्तात तयार ठेवावी लागेल. हरहर महादेव म्हणजे काय असतं ते पुन्हा एकदा दिल्लीच्या तक्त्याला दाखवायची वेळ येऊ नये. पण आलीच तर दाखवावंच लागेल. मग हा सत्ता पिपासूपणा नाहीय? यात कुठला विचार आहे. मला दु:ख, राग का येतो? मगाशी मी उल्लेख केला की शिवसेनेला बदनाम करणारी लोकं तोंडामध्ये बोंडकं घालून बसले असतील, अरे जर 92-93 साली शिवसैनिक हे मर्द उतरले नसते तर तुम्ही कुठे असते हे कळलं तरी असतं का?

    या देशात हिंदुत्व धोक्यात आहे का? अशी माहिती माहितीच्या अधिकारात माहिती मागवली गेली. केंद्रीय गृहमंत्रालयाने सांगितलं की, हिंदुत्वाला तसा धोका नाहीय. याच तर दिवसाची आणि क्षणाची आपण वाट बघत होतो. पण हिंदुत्वाला आता धोका नाही म्हटल्यानंतर आता खरं हिंदुत्व धोक्यात आहे. तो धोका परकियांपासून नाही तर हे उपटसूंभन नवं हिंदू जे उगवलेलसं आहे त्यांच्यापासून त्यांना खरा धोका आहे. राजनाथ सिंग यांनी सावरकरांबद्दल वादग्रस्त विधान केलं. कशाला जाताय? सावरकर आणि गांधी शब्द उच्चारण्याची लायकी तरी आहे का?
    गांधीजी समजले की सावरकर समजले?

    महिलांवर जे अत्यातार होत आहेत. मी दोन-चार वर्षांपूर्वी शिवाजी पार्कच्या मेळाव्यात बोललो होतो, माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही. काय तेव्हा उन्माद माजला होता. झुंडबळी म्हणे. त्यावरही भागवत म्हणाले होते की, झुंडबळी घेणारे हे हिंदूच नाही. मग हे हिंदूत्व आहे तरी काय? कोणी शिकवायचं, कुणाला शिकवायचं? कुणाकडून शिकायचं? जर हिंदुत्वाला धोका नाही हे आजचं जर सत्य असेल तर जेव्हा हिंदुत्वाला धोका होता त्यावेळी एकच मर्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हिंदुत्वाच्या दुश्मनांसमोर उभा राहिला होता. अनेक धमक्या आला होत्या. उडवून टाकू, अरे काय उडवून टाकू? पण त्यांनी सांगितलं होतं, ज्या रंगाची गोळी शरीराला स्पर्शून जाईल तो रंग हिंदूस्तानात पिसून टाकल्याशिवाय राहणार नाही. कोणामध्ये धमक होती? ९२-९३ साली जेव्हा पूर्ण मुंबई पेटली होती, इतरही ठिकाणी दंगली झाल्या तेव्हा कोण रस्त्यावर उतरले होते ? कोणी जबाबदारी घेतली होती? बाबरी पाडली तेव्हा आज जे लोकं छाती पुढे करुन पुढे येत आहेत तेव्हा ते त्यांच्या शेपट्या त्या शेपट्या आहेत की नाही एवढ्या आत कापत बिळात लपले होते. थरथरत होते. बोलायची कुणाची हिंमत नव्हती. तेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते, गर्व से कहो हम हिंदू है. तेव्हाही मुंबई वाचवली होती ती पोलिसांच्या मदतीने नाही. लष्कराच्या मदतीने तर नाहीच नाही. पोलीस आणि लष्कर शिवसैनिकांना पिटत होते. मला आठवतंय, कुर्ला-चेंबूर भागात एका झोपडपट्टीत मी गेलो होतो तिकडे. एका झोपडीत शिरलो अंगावर शहारे आले. संपूर्ण झोपडी उद्धवस्त झाली होती. गॅस-सिलेंडर, रक्ताचा सडा, बांगड्या पडलेल्या. मी शिवसैनिकांना विचारलं काय झालं? तेव्हा त्यांनी सांगितलं, इथल्या महिलेल्या घरात कुणी नाही म्हणून काही हैवान तिला घेऊन जात होते. आमच्या जेव्हा लक्षात आलं तेव्हा आम्ही धक्के मारुन भिंतीला पाडलं. त्याच्या विटांनी त्यांना मारलं तेव्हा ते पळून गेले. हा माझा मर्द शिवसैनिक आहे. कोण तरी एक होता. तोच शिवसैनिक केवळ तुमची आज पालकी वाहत नाही म्हणून भ्रष्टाचारी झाला? होय आम्ही पालखीचे भोई आहोत. पण तुमच्या पक्षाच्या पालखीचा भोई होण्यासाठी शिवसैनिकाचा जन्म झालेला नाही.

    वाईट काळामध्ये सोबत असलेला आपला सहकारी तेव्हा चालत होता. हर्षवर्धन पाटील आज तुमच्यात आल्यानंतर एकदम पवित्र झाले. गटाराचं पाणी तुमच्यात टाकलं तर गंगा. तेच पाणी दुसरीकडे टाकलं तर गटारगंगा. हे जे काही थेरं चालले आहेत ते हिंदुत्व नाही. कुणाच्याही कुटुंबावर, वैयक्तिक पत्नीवर, मुलांवर खोटे आरोप करणं हे हिंदुत्व नाही. याला नामर्द किंबहुना अक्कडमाशेपणा म्हणतात.


  • 15 Oct 2021 06:42 PM (IST)

    शिवसैनिक मदतीला धाऊन जातो : आदेश बांदेकर

    आदेश बांदेकर यांच्या भाषणातील मुद्दे :

    शिवसैनिक मदतीला धाऊन जातो. शिवसैनिक हा स्वत:च्या सोबत इतरांसाठी धावतो
    कोरोना काळात मुख्यमंत्र्यांमुळे धीर आणि आधार
    नम्रपणा पक्षप्रमुखांच्या संस्कारात आहेत. आपण खूप भाग्यवान आहोत अशा नेतृत्वाबरोबर काम करायला मिळतंय.
    तेजस ठाकरे यांनी जे शोध लावले आहेत त्यांचंही अभिनंदन करुयात.

  • 15 Oct 2021 06:37 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शस्त्रपुजन

    मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण, मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शस्त्रपुजन

  • 15 Oct 2021 06:22 PM (IST)

    मुख्यमंत्री षण्मुखानंद सभागृहात दाखल, शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात

    मुख्यमंत्री षण्मुखानंद सभागृहात दाखल,  शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात, शिवसेनेचे सचिव आदेश बांदेकरांकडून कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सुरु

  • 15 Oct 2021 06:05 PM (IST)

    कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याला सुरुवात, अंबाबाईची पालखी दसरा चौकात दाखल

    कोल्हापुरात शाही दसरा सोहळ्याला सुरुवात, अंबाबाईची पालखी दसरा चौकात दाखल, मानाची दुसरी पालखीही दाखल, शाही दसरा सोहळा केवळ निमंत्रितांच्या उपस्थितीत

  • 15 Oct 2021 05:37 PM (IST)

    थोड्याच वेळात शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला सुरुवात होणार, उद्धव ठाकरेंच्या भाषणाकडे महाराष्ट्राचं लक्ष

    शिवसेनेचा दसरा मेळावा आज संध्याकाळी साडेसहा वाजता सुरु होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संध्याकाळी साडे सात ते आठ वाजता शिवसैनिक आणि महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आहेत. यावर्षी हा मेळावा कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर षण्मुखानंद सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्याला सभागृहाच्या 50 टक्के क्षमतेने शिवसैनिक आणि इतर पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. या सभागृहाची क्षमता 2600 जागांची आहे. याचा अर्थ जवळपास 1300 शिवसैनिक सभागृहात उपस्थित राहतील. जवळपास दोन वर्षांनंतर शिवसेनेचा दसरा मेळावा उत्साहात साजरा होतोय. या मेळाव्यात मुख्यमंत्री काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.

     

     

  • 15 Oct 2021 03:45 PM (IST)

    मराठाला समाजाला आऱक्षण मिळतपर्यंत गळ्यात हार घालणार नाही – पंकजा मुंडे

    मराठाला समाजाला आऱक्षण मिळतपर्यंत गळ्यात हार घालणार नाही हा शब्द दिलाय, ही शपथ घेतलीये

    ओबीसीचं राजकीय आरक्षण परत मिळेपर्यंत डोक्याला फेटा घालणार नाही

    आपलं घर उन्हातच आपल्याला काही सहज मिळत नाही

    वंचितांच्या विकासासाठी झटण्याची शपथ मी घेते

    आजपासून माझ्यासाठी तंबाखू व्यसन सोडा

    आजचा व्यसन मुक्तीचा संकल्प

    गावागावात जाऊन त्या तंबाखुच्या पाकिटांची होळी करा

  • 15 Oct 2021 03:43 PM (IST)

    मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी आतुर आहे  – पंकजा मुंडे

    पंकडा मुंडे –

    जनतेच्या हितासाठी मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यावर मी आवाज उठवणार

    मराठा आणि ओबीसीचे भांडण नाही हे दोन्ही मिळूनच बहुजन समाज आहे

    या समाजाची वज्रमुछ करण्याचा निर्णय आम्ही घेतलाय

    आज उद्धव ठाकरेंचा मेळावा आहे, सकाळी मोहन भागवतांचं मी भाषण ऐकलं, मुख्यमंत्र्यांचं भाषण ऐकण्यासाठी मी आतुर आहे

    मला अपेक्षा आहे की ते जनहिताच्या योजना आणि खंबीर भूमिका मांडतील

    कारण तीन पक्षांचं सरकार चाललंय

    एकमेकांना खुश करण्याच्या नादात ते जनतेला दु:खी करण्याचं काम चाललंय

     

  • 15 Oct 2021 03:36 PM (IST)

    आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं – पंकजा मुंडे

    – पंकजा मुंडे

    आपलं मंत्रिपद यांनी किरायाने दिलं

    आमचं म्हणणे आहे तुम्ही चागंलं, जनतेच्या हिताचं काम करा आम्ही जाहीरपणे तुमचे अभिनंदन करु

    पण आज राज्यात काय परिस्थिती आहे

    स्त्रियांचे प्रश्न वाढलेत, रोज पेपर उघडला, टीव्ही लावली की बलात्काराच्या घटना दिसतात

    काय चालंलय महाराष्ट्रात?

    महिलांवर अत्याचार होत असतात त्यावर जबाब विचारायचा नाही का

    माझ्या घराचे दरवाजे तुमच्यासाठी २४ तास उघडे आहेत

    मंदिरापासून ते हॉस्पिटल्स स्वच्छ ठेवण्याचा संकल्प

     

     

  • 15 Oct 2021 03:28 PM (IST)

    या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    मी काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष

    माझ्यामागे मुंडे साहेबांची किर्ती आणि भगवानबाबांची मूर्ती आहे

    हे अत्यंत पवित्र स्थान आहे

    या स्थानावर उच्चार करायचा नाही असा कुठलाही शब्द मी उच्चारणार नाही

    या स्थानावर ज्या व्यक्तीचा उल्लेख केल्याने भगवान बाबांची मान खाली जाईल अशा कुठल्याही व्यक्तीचा मला उल्लेख करायचा नाही

    अशा कुठल्या प्रवृत्तीचाही मला उल्लेख करायचा नाही

     

  • 15 Oct 2021 03:24 PM (IST)

    तुम्ही मला सांगताय वंचिताची लढाई अटळ – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    श्रीकृष्णाने कर्णाला काय सांगितले – जेव्हा कर्णाला बाण  लागला, त्याचं चाक जमिनीत धसलं तेव्हा कृष्णाने त्याला सद्गती प्राप्त व्हावी यासाठी त्याला सांगितलं की का तुझा विजय नाही झाला. कर्णाने विचारलं की मी इतकी शूर पराक्रमी आहे, मग माझ्या वाट्याला हे दु:ख का, मी इतका दानवीर आहे, मी कधी माझा शब्द मोडला नाही, मी एवढं चांगले काम केलं. तेव्हा त्याला कृष्णाने सांगितले की तु जिथे जन्माला आला तू जिथे वाढला, देवाने जिथे तुला टाकलं त्याबद्दल नेहमी तुला लाज वाटली म्हणून तुला मोठा होता आलं नाही

    तुला सूतपूत्र म्हटल्यानंतर तुला त्याची लाज वाटायची

    तुम्ही मला सांगताय वंचिताची लढाई अटळ

     

  • 15 Oct 2021 03:18 PM (IST)

    तुम मुझे कब तक रोकोगे – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    “तुम मुझे कब तक रोकोगे, मुठ्ठी में कुछ सपने लेकर, जेबों में कुछ आशाऐं, दिल में अरमान यहीं, कुछ कर जाये… सुरजसा तेज नहीं मुझमें, दीपकसा जलता देखोगे, तुम मुझे कब तक रोकोगे, अपनी हद रोशन करने से तुम मुझे कैसे टोकोगे, कैसे रोकोगे”

    हा मेळावा होईल का नाही चर्चा होती

    मेळावा नको बोलले कारण सत्ता नाही

    कधी या मेळाव्याने सत्ता पाहिली

    मुंडे साहेब सत्तेत नसताना या मेळाव्याने लाखोची संख्या पाहिली, पण कशे राजासारखे राहिलात

    आपली परंपरा आहे

    कुणी म्हणे अतिवृष्टी आहे कुणी म्हणे कोरोना आहे, लोकांची मनस्थिती नाही

    मी म्हटलं अशाच लोकांना ऊर्जा देण्यासाठी मला हा मेळावा घ्यायचा आहे

    अधिकाऱ्यांनी विचारलं की लोक येणार, मी म्हटलं मला माहित नाही पण मी जाणार

    एवढ्या संख्येने तुम्ही इथे आलात, मला असं वाटतंय की माझ्यासमोर भगवान श्रीकृष्ण साक्षात आहेत

     

  • 15 Oct 2021 03:09 PM (IST)

    जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    आई जशी मुलाची दृष्ट काढते तसा मी पदर तुमच्यावरुन ओवाळला

    जर वेळ आली तर तुमच्यावरुन जीवही ओवाळून टाकेन

    तुमच्याशिवाय कोण आहे माझं

    आपण जिथे जन्म घेतला त्या मातीचा, त्या माऊला आणि जातीचा आपल्याला कधीही अपमान वाटला नाही पाहिजे, हे मला गोपीनाथ मुंडेंनी शिकवलं

    सकाळी मी आरएसएसचा कार्यक्रम बघितला, संरसंघचालकांनी सांगितले की भेदभाव नाही पाहिजे

    मुंडे साहेबांनीही तेच सांगितलं

    आज या मंचावर कोण नाहीये, सर्व जातीचे आहेत

     

  • 15 Oct 2021 03:01 PM (IST)

    तुमच्या या प्रेमापुढे माझी झोळी कमी पडली – पंकजा मुंडे

    पंकजा मुंडे –

    आज विजयादशमी आहे

    दसरा आणि दसऱ्याची आपली भक्ती आणि शक्तीची परंपरा ही कायम ठेवण्यासाठी या उन्हात घरची पुरणपोळी सोडून तुम्ही सर्वजन येथे उपलस्थित झालात, मी नतमस्तक होईल तुमच्या पाया पडल्या

    तुमच्या या प्रेमापुढे माझी झोळी कमी पडली

    कोणत्या नेत्याची चमचागिरी करायला हेलिकॉप्टरमधून फोटो टाकत नव्हती तर भगवानबाबा आणि तुमच्यावर फुलं टाकत होती

    पंकजा मुंडेंनी मंचावर समर्थकांच्या गावांची नावे घेतली

     

     

  • 15 Oct 2021 02:55 PM (IST)

    गोपीनाथ मुंडे नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता – महादेव जानकर

    भगवानबाबा एकट्या वंजाऱ्यांचा नव्हता

    ब्राह्मण ते मुस्लिमांचा होता, भगवान बाबांना जात नव्हती

    गोपीनाथ मुंडेंनाही जात नव्हती, गोपीनाथ मुंडे नसता तर हा महादेव जानकर मेंढरं राखत बसला असता

    दुसऱ्या जातीचा एखादा आमदार ऊस तोडायला गेला असता, पण ऊस तोडणाऱ्या माणसााच्या हातात कोयता देण्याऐवजी आयपीएस पीएसआय केलं. हे गोपीनाथ मुंडेंचं क्रेडिट आहे.

    काल ओबीसींची एमपीयूपएसीची लिस्ट झाली २७२ पैकी ३६ पोरं भगवान बाबाच्या जातीची झाली

    मंत्रीपदाच्या मांडवा खालून मीही गेलो आहे, एखादा मंत्री आणि आमदार होईल

    काय पॉवर आणि काय असंतं आम्हाला माहीत आहे

    काँग्रेसचं सरकार आलं तरी जनावराचं खातं धनगराला

    भाजपचं सरकार आलं तरी जनावराचं खातं धनगरालाच

    तुमच्या पोटात दुखतंय का, मला घाबरायची काहीही गरज नाही

  • 15 Oct 2021 02:49 PM (IST)

    आमदार, खासदार, मंत्री मिळतो पण नेता मिळत नाही – महादेव जानकर

    महादेव जानकर –

    माझ्या ताईने सांगितले की हा कुठला राजकीय कार्यक्रम नाही. प्रीतम ताई तुझं अभिनंदन

    आजचा कार्यक्रम आहे तो पंकजा ताईच्या शक्ती आणि युक्तीचा

    आमदार, खासदार, मंत्री मिळतो पण नेता मिळत नाही

    त्या नेत्याला सांभाळण्याचे काम माझ्ं आणि तुमचं आहे

    ज्या गोपीनाथ मुंडेंनी वंचिताची फळी बांधली त्याला भर देण्याचं काम पंकजा ताई करत आहेत, त्यांच्या मागे तुम्ही उभ्या राहिले पाहिजे, हिच माझी विनंती आहे

    सत्ता येईल जाईल पण नेता हा कधी मरत नसतो

    पंकजाताई तुमचं हेलिकॉप्टर फिरलं नाही तर हे आमदार, खासदार होतील का हो

    पक्ष येतील जातील पण आपला माणूस जिवंत राहिला पाहिजे

    तुमची ताकद हिच आमची युक्ती आम्ही गद्दार होणार नाही, लाचार होणार नाही, सन्मानाने तुम्हाला जगवण्याचा प्रयत्न करु, तुमची मान खाली जाऊ देणार नाही

    भिक मागून तुम्हाला पाया पडू देणार नाही

    हा महादेव जानकर मेला तरी तुला सोडणार नाही

    गोपीनाथ मुंडेंनी माझ्या कानात ३१ मे ला कुर्र केलं

    म्हणून माझी विनंती आहे, ही आपली नेता आहे

    नेता हा बनवता येत नाही, विकत घेता येत नाही, नाटक करता येत नाही, त्याला ओरिजीनल असावं लागतं

  • 15 Oct 2021 02:44 PM (IST)

    तुम्ही उन्हात असताना आम्ही सावलीत बसणं हे आम्हाला पटत नाही – प्रीतम मुंडे

    गोपीनाथ गडावर मुंडे साहेबांचे आशीर्वाद घेऊन निघाले तेव्हा त्यांना एकच मागणं मागितलं की आज समाजात जी नकारात्मका पसरली आहे त्या नकारात्मकतेचा सामना करण्याची शक्ती द्या, आज तुमचा उत्साह पाहून माझा तो विश्वास आणखी दृढ झाला आहे

    तुम्ही उन्हात असताना आम्ही सावलीत बसणं हे आम्हाला पटत नाही, हे आघाडीतल्या कार्यक्रमाचं स्टेज नाही

    त्यामुळे उन्हात, अतिवृष्टीत आणि कोरोनात आम्ही तुमच्यासोबत आहोत

    तुमच्या प्रत्येक सुखदुखात आम्ही तुमच्यासोबत राहू, आपलं हे नातं असंच राहो अशी इच्छा व्यक्त करते

  • 15 Oct 2021 02:41 PM (IST)

    मुंडे कुटुंबात जन्मल्याचं भाग्य मिळालं त्यामुळे आम्ही भाग्यवान – प्रीतम मुंडे

    गर्दी का थांबली एवढ्या उन्हात असा प्रश्न मला विचारला, या चमत्काराचं कारण विचारलं,

    त्यावर मी म्हटलं तुम्ही मुंडे कुटुंबात जन्माला आले असता तर तुम्हाला कळलं असतं

    मुंडे कुटुंबात जन्मल्याचं भाग्य मिळालं त्यामुळे आम्ही भाग्यवान आहोत

    राजकारणात अनेक लोक संपत्ती कमावतात

    काही लोक बेनामीही संपत्ती जमवतात

    पण मुंडे साहेबांनी आम्हालाही संपत्ती दिली, ती संपत्ती तुमच्यारुपाने समोर आहे

    ही गर्दी हा समाज हीच आमची संपत्ती आहे

  • 15 Oct 2021 02:35 PM (IST)

    आपला आवाज दिल्ली, मुंबईपर्यंत पोहोचेल – खासदार प्रीतम मुंडे

    खासदार प्रीतम मुंडे –

    आपला आवाज दिल्ली, मुंबईपर्यंत पोहोचेल

    मेळावा होईल की नाही हा संभ्रम होता, ज्या लोकांच्या मनात शंका होती त्यांना मला सांगायचं आहे की हा जनसमुदाय पाहा

    गोपीनाथ मुंडे म्हणजे पंकजा मुंडे प्रीतम मुंडे नाही तर आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले तुम्ही सगळे आमच्या कुटुंबाचा भाग आहात

    आपला मेळावा हा पक्षाचा किंवा राजकीय मेळावा नाही तर हा मेळावा त्या प्रत्येक वंचितासाठे आहे ज्याचं हातावरच पोट आहे, ज्याची समाजातून काहीतचरी अपेक्षा आहे

    ज्याला ही अपेक्षा आहे की या विकासाच्या गंगेत आपला नंबर कधीतरी येईल

    इथे येऊन तुम्ही ऊर्जा घेता. संघर्ष करण्याची प्रेरणा मिळवण्यासाठी तुम्ही येथे येता. हेच आपल्या मेळाव्याचं महत्व आहे. हा भगवानबाबच्या भक्तीचा आणि मुंडे साहेबांवरील श्रद्धेचा हा मेळावा आहे.

  • 15 Oct 2021 02:30 PM (IST)

    पंकजा मुंडे यांच्या भाषणाला थोड्याच वेळास सुरुवात, गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी

    पंकजा मुंडे यांच्या भाषणाला थोड्याच वेळास सुरुवात

    मुंडे यांचा भव्य सत्कार, गडावर मोठ्या प्रमाणात गर्दी

  • 15 Oct 2021 02:02 PM (IST)

    पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल, थोड्याच वेळात भाषणाला सुरुवात 

    पंकजा मुंडे भगवान गडावर दाखल

    गडावर मुंडे समर्थकांची मोठी गर्दी

    थोड्याच वेळात पंकजा मुंडे यांच्या भाषणाला सुरुवात

  • 15 Oct 2021 01:49 PM (IST)

    बुद्धांचा संदेश हा जगाचं कल्याण करणारा आहे : नितीन गडकरी

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दीक्षाभूमीवर बोलत आहेत.

    नितीन गडकरी – बुद्धांचा संदेश हा जगाचं कल्याण करणारा आहे

    जगातील जटील प्रश्न बुद्धाच्या विचाराने सुटू शकतात

    बुध्दाशी संबंधित असलेल्या सगळ्या ठिकाणांना जुळणारे रस्ते बांधण्याची संधी मला मिळाली

    या बुद्ध सर्किटचं लवकरच पंतप्रधान यांच्या हस्ते उद्घाटन होईल

    भगवान बुद्धांचा विचार फक्त बौद्धच नाही तर इतर लोकांचंसुद्धा कल्याण करणार आहे

    मेडिटेशन करण्यासाठी सगक्यात उत्तम ठिकाण आहे ड्रॅगन पॅलेस

    दीक्षा भूमी आणि ड्रॅगन पॅलेसपर्यंत मोठा निधी मुख्यमंत्री असताना फडणवीस यांनी पोहोचविला

    प्रत्येकाच्या पोटाला खायला मिळालं की काम चांगलं होतं

    चिंधी वेस्ट मटेरियल पासून कार्पेट बनविण्याचं काम नागपुरात सुरू झालं, त्याला मोठी मागणी आहे

    रोजगार वाढविण्यासाठी काम केलं जातं आहे.

    कोणीही माणूस जातीने मोठा नसतो गुणांनी मोठा असतो. जातीभेद नको

    हे स्थळ जगातील क्षेत्रातील मोठं स्थळ व्हावं यासाठी शुभेच्छा

    मला ड्रॅगन पेलेसमधील मेडिटेशन सेंटरमध्ये 1 तास कुठलीही गर्दी नसताना बसायचं

    असं नितीन गडकरी म्हणाले.

  • 15 Oct 2021 01:36 PM (IST)

    ड्रॅगन पॅलेस हे प्रत्येकाला मनशांती देणार ठिकाण आहे – देवेंद्र फडणवीस

    देवेंद्र फडणवीस –

    ड्रॅगन पॅलेस हे प्रत्येकाला मनशांती देणार ठिकाण आहे ..

    जगात भगवान गौतम बुद्ध यांनी जगावर बुद्ध विचारांच्या मार्गाने विजय मिळविला

    तलवारीने विजय कोणीही मिळवू शकतो मग विचाराने जगावर विजय मिळविणे फार मोठं आहे

    ड्रॅगन पॅलेस मध्ये अनेक उपक्रम सुरू आहे ते घडवून आणणाऱ्या सुलेखा कुंभारे यांच्या सोबत आमचं नाव सुद्धा चालत राहील

    बुद्धिष्ट थीम पार्क चा प्रकल्प सुद्धा या ठिकाणी निश्चित होईल याची ग्वाही देतो

  • 15 Oct 2021 12:53 PM (IST)

    पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

    पंकजा मुंडे गोपीनाथ गडावर दाखल

    गोपीनाथ गडावर त्यांनी गोपीनाथ मुंडेंच्या समाधीचं दर्शन घेतलं

  • 15 Oct 2021 12:40 PM (IST)

    शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही

    शिवसेना नेते रामदास कदम दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाही.

    प्रकृती अस्वास्थ्यामुळे दसरा मेळाव्याला उपस्थित न राहण्याचा निर्णय.

    गेले तीन महिने रामदास कदम हे आजारी आहेत.

    इन्फेक्शनची लागण होऊ नये यासाठी डॉक्टरांनी त्यांना गर्दीत न जाण्याचा सल्ला दिला आहे.

    रामदास कदम यांचे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना लिहले पत्र.

    6 ऑक्टोबर ला लिहले पत्र.

    कथित ध्वनिफितींबाबत मांडली आपली बाजू.

    पक्षात आपली बदनामी करण्याचे षडयंत्र रचल्याचा रामदास कदम यांचा पत्रात दावा.

    रामदास कदम यांनी आपल्या वेदना उद्धव ठाकरेंपुढे पत्राद्वारे मांडल्या.

    आठवडाभरात उद्धव ठाकरेंना व्यक्तिशः भेटून आपल्या भावना व्यक्त करणार

  • 15 Oct 2021 12:37 PM (IST)

    ड्रॅगन पॅलेस कामठी येथे धम्मचक्र महोत्सव सोहळा होत असून या सोहळा

    नागपूर –

    ड्रॅगन पॅलेस कामठी येथे धम्मचक्र महोत्सव सोहळा होत असून या सोहळा

    विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी , केंद्रीय राज्य मंत्री रामदास आठवले यांची उपस्थिती असणार

  • 15 Oct 2021 12:36 PM (IST)

    जामखेड येथील खर्डा येथील ऐतिहासिक शिवापट्टण भुईकोट किल्यावर सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना

    अहमदनगर –

    जामखेड येथील खर्डा येथील ऐतिहासिक शिवापट्टण भुईकोट किल्यावर सर्वांत उंच ध्वजाची प्रतिष्ठापना

    तर पारंपरिक पद्धतीने ढोल ताश्यांच्या गजरात ध्वज पडकवण्यास सुरवात

    उपस्थितांची जोरदार घोषणाबाजी

  • 15 Oct 2021 12:32 PM (IST)

    शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन

    दसऱ्याच्या निमित्ताने परंपरेप्रमाणे आज शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्याकडे असलेल्या ऐतिहासिक शस्त्रांचे पूजन करण्यात आले

    यावेळी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे हे व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून सहभागी झाले होते.

  • 15 Oct 2021 12:31 PM (IST)

    पंकजा मुंडे यांच्या मागे कुणी असो अथवा नसो, मी भाऊ म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहणार – महादेव जानकर

    बीड –
    महादेव जानकर –

    पंकजा मुंडे या मेळाव्याच्या क्रियेटर आहेत

    पंकजा मुंडे यांच्या माघे कुणी असो अथवा नसो मी भाऊ म्हणून कायम त्यांच्या पाठीशी राहणार

    पंकजा मुंडे यांनी बोलावलं नाही तर मी येऊन ओडिएनस मध्ये बसेन पण मेळाव्याला येणार

    बहीण एखाद्या ठिकाणी अस्वस्थ असेल तर ती भावाला बोलून दाखवते, पण पंकजा ताईंनी मला असं काही बोलून दाखवलं नाही त्यामुळे नाराज आहेत असं मला वाटत नाही

  • 15 Oct 2021 12:28 PM (IST)

    पुण्यात मनसेचे आज काळा दसरा आंदोलन

    पुणे

    पुण्यात मनसेचे आज काळा दसरा आंदोलन

    अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन

    शेतकऱ्यांच्या विविध समस्या संदर्भात व आघाडी सरकारच्या निषेधार्थ मनसेचे काळा दसरा आंदोल

  • 15 Oct 2021 11:44 AM (IST)

    प्रीतम मुंडेंच्या रॅलीचं ठिकठिकाणी जल्लोषात स्वागत

    सावरगाव घाट येथील दसरा मेळाव्यासाठी, खासदार प्रीतम मुंडे यांची गोपीनाथ गडावरुन सावरगावघाट कडे कार रॅली निघाली आहे. यावेळी गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन प्रीतम मुंडे या मेळाव्याकडे रवाना झाल्या आहेत. यावेळी सिरसाळा, दिंद्रुड, तेलगाव, वडवणी, घाटसावळी यासह अनेक गावांसह फाट्यावर खासदार प्रीतम मुंडेंच्या रॅलीचे, कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत केलं आहे. दरम्यान या मेळाव्याकडे संबंध राज्याचे लक्ष लागले आहे.

  • 15 Oct 2021 11:38 AM (IST)

    माझ्यासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा : पंकजा मुंडे

    भाजप नेत्या पंकजा मुंडे माध्यमांशी बोलत आहेत. माझ्यासाठी हा दिवस खूपच महत्त्वाचा आहे.

    हेलिकॉप्टरने भगवान गडावर जाणार आहे.

    मागच्या वर्षी आम्ही मेळावा घेतला नव्हता. आम्ही फक्त दर्शनासाठी गेलो होते.

    या वर्षीच्या मेळाव्याला माझी प्रमुख उपस्थिती आहे. हा मेळावा विशेष निमंत्रित असं कोणी नाही. लोक स्वयंप्रेरणेने येतात.

  • 15 Oct 2021 11:04 AM (IST)

    गोवा राज्यातही विजयादशमीचा उत्साह, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक ठिकाणी संचलन

    पणजी : गोवा राज्यातही विजयादशमीचा उत्साह

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनेक ठिकाणी संचलन

    बिचोलीममध्येही संघाचे शिस्तबद्ध संचलन

    मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत संचलनात सहभागी

    बीचोलिम ईथल्या संचलनात मुख्यमंत्री डॉक्टर सावंत सहभागी

  • 15 Oct 2021 10:35 AM (IST)

    केंद्रीय मंत्री भागवत कराड हे परळीला येणार

    औरंगाबादहून केंद्रीय मंत्री भागवत कराड हे परळीला येत आहेत. सध्या ते विमानतळ येथे आहेत. हेलिकॉप्टर ने ते गोपिनाथ गडावर येतील आणि पंकजा मुंडे आणि कराड सावरगाव येथील मेळाव्याकडे निघतील.

  • 15 Oct 2021 10:15 AM (IST)

    मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण महत्त्वाचं – संजय राऊत

    शिवसेना खासदार संजय राऊत

    मुख्यमंत्र्यांचं आजचं भाषण महत्त्वाचं

    शिवसेना प्रमुख आज काय भूमिका मांडतील याकडे संपूर्ण देशाचं लक्ष आहे

    मेळाव्याची तयारी पूर्ण झालीये

    कोरोनाचे सर्व नियम पाळून आजचा मेळावा होईल

    नक्कीच त्या मेळाव्यातून  महाराष्ट्राला, राजकारणाला दिशा देण्याचा प्रयत्न होईल

     

     

  • 15 Oct 2021 09:32 AM (IST)

    सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते, सरकार असलं तर जमिनीवर पाय ठेवून चालायच ही आमची भूमिका – अजित पवार

    अजित पवार

    बऱ्याच वर्षांनी माळेगाव कारखान्याच्या गळीत हंगामाला आलो

    विजयादशमी, दसऱ्याच्या शुभेच्छा

    २ नोव्हेंबर रोजी बारामतीत मुख्यमंत्री, शरद पवार आणि देशातील महत्वाचे लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम

    चढउतार येत असतात

    सरकार नसलं तरी चिकाटी सोडायची नसते, सरकार असलं तर जमिनीवर पाय ठेवून चालायच ही आमची भूमिका

    परवा १० हजार कोटींचे पॅकेज दिलं

    जेवढं नुकसान झालं त्याची भरपाई देता येत नाही याची खंत

    केंद्र सरकारची मदत मिळत नाही

    आज माळेगावला आल्यावर जुन्या आठवणींना उजाळा मिळाला

    सोमेश्वरच्या ९०% सभासदांनी साथ दिली

    सोमेश्वरच्या १५२ गावातल्या सभासदांचे आभार

    मी म्हणालो होतो मतांचं ओझं टाका, त्यांनीही इतकं ओझं टाकलं की मी पार आडवाच व्हायची वेळ आलीय

    ९० पासून राजकारणात आहे, एवढी एकतर्फी निवडणुक पाहिली नाही

    हे फक्त सोमेश्वरच्या कार्यक्षेत्रात होवू शकतं

    ४ कोटी ८० लाख रुपये किमतीचा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प

    अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरुन प्रकल्पाची माळेगाव कारखान्याने उभारणी केली

  • 15 Oct 2021 08:58 AM (IST)

    देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे, ते कसं थांबवावं माहित नाही – मोहन भागवत

    देशात अंमली पदार्थांचा वापर वाढत आहे

    ते कसं थांबवावं माहित नाही

    उच्च वर्गापासून ते खालच्या वर्गापर्यंत समाजातील सर्व स्तरात व्यसन आहे

    या व्यापारातून येणारा पैसा कुठे जातो हे आपल्याला माहित आहे

    सिमेपलीकडील देश त्याला प्रोत्साहन देतात

    अनियंत्रित गोष्टी वाढत आहेत

    बिटकॉईन सारखी करन्सी आहे, त्यावर कोणाचं नियंत्रण आहे माहित नाही

    यासर्वांवर नियंत्रण ठेवणे, ड्रग्जसारख्या व्यसनांचा पूर्ण विनाश व्हावा, हे सरकारने करावे

  • 15 Oct 2021 08:33 AM (IST)

    त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले – मोहन भागवत

    आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत –

    त्याग आणि बलिदानामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले

    स्वातंत्र्यतासाठी अनेकांनी परिश्रम केले

    स्वतंत्रता का हवी यावरही देशात संघर्ष झाला

    स्वातंत्र्यासाठी फाळणीचं दुखही अनुभवलं

    हरवलेली अखंडता परत मिळवायची असेल तर सध्याच्या पिढीने इतिहास जाणून घ्यायला हवा

    शत्रूता, भेद याची पुनरावृत्ती नको

    मनातील भेदभावाची भावना बदलायला हवी

    समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी

    समाजाला तोडणारी नव्हे जोडणारी भाषा वापरायला हवी

    लोकांमधील संवाद सकारात्मक असायला हवा

    स्वकियांचा विसर पडल्याने भेदभाव वाढला

     

  • 15 Oct 2021 08:07 AM (IST)

    शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काल सायंकाळी शिवसेना भवनात तुळजाभवानीचे दर्शन आणि आरती केली

    शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी काल सायंकाळी शिवसेना भवनात तुळजाभवानीचे दर्शन आणि आरती केली.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी यांच्यासह ते शिवसेनाभवनात आले होते.

    खासदार राहुल शेवाळे आणि अनिल देसाई तसंच महापौर किशोरी पेडणेकर, नगरसेविका श्रद्धा जाधव, पक्षाच्या महिला आघाडीच्या नेत्या मीना कांबळी याही यावेळी उपस्थित होत्या.

  • 15 Oct 2021 08:07 AM (IST)

    पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगाव घाट सज्ज

    बीड –

    पंकजा मुंडे यांच्या दसरा मेळाव्यासाठी सावरगाव घाट सज्ज

    भगवान बाबा स्मृती स्थळावर मेळाव्याची जय्यत तयारी

  • 15 Oct 2021 08:01 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये होणार धम्म चक्र महोत्सव

    नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये होणार धम्म चक्र महोत्सव

    विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस , केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री रामदास आठवले , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित

    दर वर्षी ड्रॅगन पॅलेस मध्ये साजरा केला जातो धम्म चक्र महोत्सव

    कोरोना नियमांचं पालन करत होणार आहे महोत्सव

  • 15 Oct 2021 07:58 AM (IST)

    राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी आणि शस्रपूजन सोहळा

    – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी आणि शस्रपूजन सोहळा

    – कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी मर्यादीत स्वरुपाचा साजरा होणार सोहळा

    – सरसंघचालक डॅा. मोहन भागवत काय बोलणार? याकडे अवघ्या देशाचं लक्ष

    – सकाळी ७:३० वाजता सुरु होणार कार्यक्रम

    – कोरोनामुळे निवडक स्वयंसेवकांना सोहळ्यात प्रवेश

    – शहरातील ४० मैदानात स्वयंसेवकांचे एकत्रीकरण होणार

    – फेसबुक आणि ट्वीटरच्या माध्यमातून संघाचा सोहळा लाईव्ह

  • 15 Oct 2021 07:55 AM (IST)

    खा. प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर पोहचल्या

    खा. प्रीतम मुंडे गोपीनाथ गडावर पोहचल्या

    गोपीनाथ गडावर घेतले दर्शन

    दर्शन घेऊन भगवान भक्तीगडाकडे रवाना

    मुंडे समर्थकांचा मोठा उत्साह

  • 15 Oct 2021 07:53 AM (IST)

    200 कोटींचा कथित घोटाळा, आज जॅकलिन फर्नांडिस ईडी समोर हजर राहणार

    नवी दिल्ली

    200 कोटींचा कथित घोटाळा

    आज जॅकलिन फर्नांडिस ईडी समोर हजर राहणार

    काल तब्बल 8 तास नोरा फतेहीची चौकशी

    सुकेश चंद्रशेखरच्या मनी laundring केस प्रकरणी 2 अभिनेत्रींची चौकशी

    ईडी कडून jaklin आणि नोरा या दोघींना समन्स

  • 15 Oct 2021 07:50 AM (IST)

    नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये होणार धम्म चक्र महोत्सव

    नागपूर जिल्ह्यातील कामठी येथील ड्रॅगन पॅलेस मध्ये होणार धम्म चक्र महोत्सव

    विरोधी पक्ष नेता देवेंद्र फडणवीस , केंद्रीय सामाजिक न्यायराज्य मंत्री रामदास आठवले , केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहणार उपस्थित

    दर वर्षी ड्रॅगन पॅलेस मध्ये साजरा केला जातो धम्म चक्र महोत्सव

    कोरोना नियमांचं पालन करत होणार आहे महोत्सव

  • 15 Oct 2021 07:47 AM (IST)

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने राज्य सरकारने करोना निर्बंध शिथिल केले

    शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात कोणतीही अडचण येऊ नये, यादृष्टीने राज्य सरकारने करोना निर्बंध शिथिल केले

    – बंद सभागृहात होणाऱ्या कोणत्याही कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा आता हटविण्यात आली आहे.

    – त्यामुळे षण्मुखानंद सभागृहातील शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात एकूण क्षमतेच्या ५० टक्के (एक हजारहून अधिक) पदाधिकारी उपस्थित राहू शकतील.

    – राज्यात २२ ऑक्टोबरपासून बहतांश निर्बंध शिथिल होणार आहेत.

    – मात्र, कोणत्याही बंद सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमास एकूण क्षमतेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा लागू होती.

    – अशा स्थितीत दसरा मेळाव्यात गर्दी होऊन करोनाच्या नियमांची पायमल्ली झाल्यास विरोधकांची टीका आणि न्यायालयीन लढाईस सामोरे जावे लागण्याची शक्यता काहींनी पक्षनेतृत्वाच्या निदर्शनास आणली.

    – त्यानंतर सरकारी पातळीवर सूत्रे हलली आणि या मेळाव्यापुढील संभाव्य मोठा अडथळा दूर करण्यात आला.

    – यासाठी मुख्यमंत्री व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या पातळीवर बराच खल झाल्याचे समजते.

    – राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केंद्र सरकारच्या निर्णयाचा आधार घेत बंद सभागृहातील कार्यक्रमासाठी असलेली २०० व्यक्तींच्या उपस्थितीची मर्यादा काढून टाकली आहे

  • 15 Oct 2021 07:38 AM (IST)

    संघाचा विजयादशमी सोहळा सुरु

    नागपुरात संघाचा विजयादशमी सोहळा सुरु

    मोजक्याच स्वयंसेवकांच्या उपस्थितीत संघाचा विजयादशमी सोहळा सुरु