मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्यावर अंमलबजावणी संचलनालय (Enforcement Directorate) अर्थात ईडीनं मोठा दणका दिलाय. पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत. त्याची एकूण किंमत 6 कोटी 45 लाख इतकी असल्याची माहितीही ईडीकडून देण्यात आलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे. ईडीच्या कारवाईनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवलाय. केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशासमोरील सर्वात मोठा प्रश्न बनल्याची टीका पवार यांनी केलीय.
पाटणकर यांच्यावरील ईडी कारवाईनंतर पत्रकारांनी शरद पवार यांना प्रश्न विचारला. ‘केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर हा सध्या देशातील सर्वात मोठा प्रश्न बनलाय. आपण जी आकडेवारी दिली ती आकडेवारी खरी असेल तर ती स्वच्छपणे सांगते की राजकीय किंवा अन्य हेतुनं कुणालातरी त्रास देण्यासाठी हा कार्यक्रम हाती घेण्यात आलाय. खरं सांगायचं म्हणजे गेल्या 5 – 6 वर्षात ही ईडी नावाची संस्था इथं बसलेल्या कुणाला माहिती नव्हती. मात्र आता ही ईडी गावागावात पोहोचलीय. या सगळ्या गोष्टीचा गैरवापर दुर्दैवानं सुरु आहे. बघू आता त्याला काही पर्याय निघतो का’, अशा शब्दात शरद पवार यांनी श्रीधर पाटणकर यांच्यावरील ईडीच्या कारवाईनंतर दिलीय.
Central agencies being misused for political interests.Till a few years ago most people didn’t know about ED, but today it’s being misused so much that even people in villages know about it:NCP’s Sharad Pawar on ED raid at Maharashtra CM’s relative Shridhar Madhav Patankar’s firm pic.twitter.com/YlJKopL1Uh
— ANI (@ANI) March 22, 2022
ED provisionally attached immovable properties worth Rs 6.45 Cr in case of M/s Pushpak Bullion, one of the Group companies of Pushpak Group. The attachment includes 11 residential flats in Neelambari project, Thane belonging to Shree Saibaba Grihanirmiti Pvt Ltd. Probe underway.
— ANI (@ANI) March 22, 2022
उद्धव ठाकरे माफिया सेनेनं जी लुटमार चालवली आहे. त्या लुटमारीचा हिशेब जनतेसमोर ठेवण्याचं काम मी करतोय. अजून तर ही सुरुवात आहे. पुढचा हिशेब येईल तेव्हा कळेल. किती मनी लॉन्ड्रिंग केलं हे श्रीधर पाटणकरांनी घोषित करावं नाहीतर पुढच्या कारवाईला तयार राहावं. ज्या कंपन्यांतून पैसे घेतले ते पैसे पुढे कुठे गेले? असा सवाल करतानाच उद्धव ठाकरेंना रात्री झोप येणार नाही, असा खोचक टोला सोमय्या यांनी लगावलाय.
Shridhar Patankar, Uddhav Thackeray’s Sala (brother in law) Money Laundering Scam… Use of Shell Companies, ED attached his Properties
Ghotalebajo ko Chhodenge Nahi@BJP4India @BJP4Maharashtra
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) March 22, 2022
इतर बातम्या :