रत्नागिरी: शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी भाजप खासदार नारायण राणे यांना अडचणीत आणणारं मोठं विधान केलं आहे. ईडीने नारायण राणे यांच्या संपत्तीची चौकशी करावी, अशी मागणी विनायक राऊत यांनी केली केली. राऊत यांच्या या मागणीमुळे राणे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. (ed should probe narayan rane’s property says vinayak raut)
प्रसारमाध्यमांशी बोलताना विनायक राऊत यांनी ही मागणी केली. नारायण राणे यांच्या संपत्तीची ईडीने चौकशी करावी, असं सांगतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे आम्ही भाजपच्या शंभर नेत्यांची नावं ईडीला चौकशीसाठी देऊ शकतो, असा दावा विनायक राऊत यांनी केला आहे. राणे सत्तेसाठी हपापले आहेत. त्यांनी मिटक्या मारत बसावे. त्यांना संपूर्ण आयुष्यात सत्तेतील सहभाग मिळणार नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
भाजप सत्तेसाठी हपापली आहे. त्यामुळे भाजप सैरभर झाली आहे. म्हणूनच भाजप नेते ठिकठिकाणी पत्रकार परिषद घेऊन आघाडी सरकारवर निशाणा साधत आहेत. आज ना उद्या आपण सत्तेच्या खुर्चीत जाऊन बसू असं भाजपला वाटत होतं. पण सुदैवाने तसं घडलं नाही. महाविकास आघाडी सरकार भक्कम असून त्यांच्यात जबरदस्त समन्वय असल्याने भाजपचं सत्ता प्राप्तीचं स्वप्नं हवेत विरल्याचा टोला त्यांनी लगावला आहे. (ed should probe narayan rane’s property says vinayak raut)
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत येत आहेत. त्यांच्या दौऱ्यामुळे बॉलिवूडला काहीही फरक पडणार नाही. ठाकरे सरकारला आव्हान देणं योगींना झेपणारं नाही. दिल्लीतील भाजपचे नेतेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे कौतुक करत असतात. त्यामुळे योगींनी ठाकरे सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्नही करू नये, असा सल्लाही त्यांनी दिला. योगींना फिल्म इंडस्ट्री करायचीच असेल तर त्यांनी त्यांच्या राज्यात जरुर करावी, त्याला आमचा विरोध नाही, असंही ते म्हणाले. सत्तापिपासू नेत्यांना दूर ठेवल्याशिवाय मोदी सरकार चांगलं काम करू शकत नाही. हे जेव्हा दिल्लीकरांना पटलं तेव्हा त्यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना सत्तेपासून दूर ठेवलं, असा दावाही त्यांनी केला. (ed should probe narayan rane’s property says vinayak raut)
VIDEO : TOP 9 News | टॉप 9 न्यूज | 1 December 2020https://t.co/RB4xGO4Cdk
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 1, 2020
संबंधित बातम्या:
उत्तर प्रदेश आधी भयमुक्त करा, मग बॉलिवूडचं स्वप्न बघा, अस्लम शेख यांचा योगींवर हल्ला
राजकारणात अनेक जयंत पाटील; राणे नक्की कोणत्या जयंत पाटलांबद्दल बोलले?; सुप्रिया सुळेंनी उडवली खिल्ली
(ed should probe narayan rane’s property says vinayak raut)