Eknath Shinde | चार्टर्ड प्लेन, आलिशान हॉटेल… जाणून घ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर किती पैसा खर्च होतोय!

| Updated on: Jun 23, 2022 | 7:50 PM

या सगळ्याशी भाजपाचा थेट संबंध दिसतोय, कारण भाजपाचे मुंबईतील काही नेते गुजरातमधील हाॅटेलवर दिसले होते. गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेल असो किंवा सुरतमधील ले मेरिडियन हॉटेल असो. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याची काळजी भाजप नेते घेत आहेत. भाजप नेत्यांची रॅडिसन ब्लू हॉटेलला भेटीगाठी सुरूच आहेत.

Eknath Shinde | चार्टर्ड प्लेन, आलिशान हॉटेल... जाणून घ्या शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर किती पैसा खर्च होतोय!
Image Credit source: radissonhotels.com
Follow us on

मुंबई : महाराष्ट्रात (Maharashtra) गेल्या दोन दिवसांपासून अनेक राजकिय घडामोडी घडत आहेत. शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडखोरी करत आपल्यासोबत शिवसेनेच्या तब्बल 42 आमदारांना आसामला नेले आहे. हे सर्व आमदार सध्या गुवाहाटी येथील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये आहेत. शिंदे यांच्यासोबत जवळपास 42 आमदार उपस्थित असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये 34 आमदार शिवसेनेचे (Shivsena) आहेत तर 8 आमदार अपक्ष आहेत. शिवसेनेतून बंडखोरी करणारे आमदार आधी सुरतला होते. येथून आमदारांना चार्टर्ड विमानाने गुवाहाटी येथे पाठवण्यात आले.

चार्टर्ड प्लेनने आमदारांचा प्रवास

इतक्या आमदारांना चार्टर्ड विमानांने पाठवायला किती खर्च होत आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते. बंडखोर आमदारांचे मन वळवण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे गुवाहाटीतील हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांच्या सर्व सुखसोयींची काळजी घेतली जात आहे. विशेष म्हणजे या हाॅटेलमधील तब्बल 70 खोल्या या बूक करण्यात आला आहेत. इतकेच नाही तर 56 लाख सात दिवसांसाठी भाडे या हाॅटेलचे होणार आहे. रॅडिसन हॉटेलच्या आसपास सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. भाजप ही संपूर्ण राजकीय परिस्थिती शिवसेनेची अंतर्गत बाब असल्याचे सांगत असेल. हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी बुक केलेल्या 70 खोल्यांव्यतिरिक्त, कॉर्पोरेट डीलवर आधीच बुक केलेल्या खोल्या वगळता व्यवस्थापन नवीन बुकिंग घेत नाहीत.

हे सुद्धा वाचा

भाजपाचा थेट संबंध, आसामच्या मुख्यमंत्र्यानी घेतली भेट

या सगळ्याशी भाजपाचा थेट संबंध दिसतोय, कारण भाजपाचे मुंबईतील काही नेते गुजरातमधील हाॅटेलवर दिसले होते. गुवाहाटीमधील रॅडिसन ब्लू हॉटेल असो किंवा सुरतमधील ले मेरिडियन हॉटेल असो. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, याची काळजी भाजप नेते घेत आहेत. भाजप नेत्यांची रॅडिसन ब्लू हॉटेलला भेटीगाठी सुरूच आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आसामचे मुख्यमंत्र्यांनी बंडखोर आमदारांची भेट घेतली आहे. हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये 6 दिवसांसाठी बुकिंग करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

रॅडिसन ब्लू हॉटेलमधील एका खोलीचे भाडे जाणून घ्या

हॉटेलमध्ये सुमारे 90 लोक थांबले आहेत. यामध्ये शिवसेना आणि अपक्ष आमदारांचा समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रॅडिसन ब्लू हॉटेलमधील एका खोलीचे भाडे 6800 रुपयांपासून सुरू होते. डिलक्स रूमचे भाडे 8000 पर्यंत आहे. अशा स्थितीत नक्कीच अंदाजा येईल की, राज्यात सुरू असलेल्या सत्तासंघर्षात किती पैसा खर्च होत आहे. कोरोनाच्या काळात राजस्थानमध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर काँग्रेस नेते सचिन पायलट बंडखोर आमदारांसह हरियाणाला पोहोचले.