मुंबईः बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मातोश्री वेगळी आहे. बाळासाहेबांची (Balasaheb Thackeray) तीन माळ्यांची होती तर उद्धव ठाकरेंची आठ माळ्यांची मातोश्री आहे. आठ मजले आम्ही चढूच शकत नाहीत, अशी सणसणीत टीका एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटातील बंडखोर आमदार भारत गोगावले यांनी केली. भारत गोगावले हे एकनाथ शिंदे गटाच्या शिवसेनेचे मुख्य प्रतोददेखील आहेत. आज टीव्ही9 शी बोलताना उद्धव ठाकरेंची शिवसेना ही बाळासाहेबांच्या शिवसेनेसारखी राहिलेली नाही, याबद्दल तीव्र नाराजी दर्शवली. तसेच आजची शिवसेना आणि त्यांच्या कारवाया या फक्त संजय राऊत यांच्या मार्फतच केल्या जात आहेत. त्यांच्यावर कुणाचाही वचक नाही, असं वक्तव्य त्यांनी केलं.
संजय राऊतांमुळेच उद्धव ठाकरेंची शिवसेना आमच्यापासून दुरावल्याचा गंभीर आरोप भारत गोगावले यांनी केला. ते म्हणाले, ‘ राऊत काय बोलतायत त्याचे परिणाम काय होतील, हे सगळ्यांनाच माहिती.. संजय राठोडच नाही तर आम्ही सगळे 40 आमदार हेच सांगत आहोत. मुख्यमंत्री शिंदे यांनी बराच आवधी दिला होता. अजूनही वेळ गेलेली नाही म्हणत होतो. पण शिवसेना एकेक लोकांची पदं कट करत चालले होते. संजय राऊतांचं वक्तव्य काळजाला घरं पाडणारं होतं. लोकांना चीड येत होती. उद्धव साहेब मिलिंद नार्वेकरांना चर्चेसाठी पाठवत होते. तर संजय राऊत तोंडाला येईल ते बोलत होते. त्यामुळे आमचं एकेक पाऊल पुढे पडत गेलं. मग आमदारांनी निर्णय घेतला. काँग्रेस- राष्ट्रवादीची साथ सोडण्याची विनंती केली. पण तिथे वन मॅन शो- संजय राऊत असंच होतं. राऊतांनी कुणाची सुपारी घेतली होती, हे कळलं नाही..
उद्धव ठाकरेंनी प्रति मातोश्री उभी केल्याचा गंभीर आरोप भारत गोगावले यांनी केला. ते म्हणाले, ‘ मातोश्रीचे दरवाजे उघडले तर जाऊत असं संजय राठोड म्हणालेत. एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केल्यानंतर आम्ही तो निर्णय घेऊ. पण मातोश्री हे ठिकाण बाळासाहेबांचं आहे. त्यांनीच ती उभी केली. उद्धव सागहेबांनी नवीन मातोश्री केली आहे. बाळासाहेबांची मातोश्री आहे. संजय राठोड यांनी जे सांगितलं, त्यावर चर्चा करावी लागेल. बाळासाहेबांची मातोश्री तीन माळ्यांची आहे. उद्धव सागेबांची ही मातोश्री आठ माळ्यांची आहे. आम्ही चढू शकत नाहीत. आम्ही तीन माळे चढू शकतो.’
आमदारांच्या बंडानंतर आता अनेक खासदारही शिंदे यांच्या संपर्कात आहेत का, या प्रश्नाला उत्तर देताना भारत गोगावले म्हणाले, ‘ खासदार नगरसेवक संपर्कात आहेत, अशी चर्चा आहे. आम्ही बाळासाहेब, दीघे साहेबांना दैवत मानून पुढे चाललो आहोत. त्यामुळे आम्ही शिवसेना सोडलेली नाही. स्वतः मुख्यमंत्र्यांनी भर सभागृहात सांगितली आहे. जर शिवसेना पुढे वाढण्याचं काम आम्ही करत असू.. छोटे पदाधिकारी, शाखाप्रमुख, विभागप्रमुख, जिल्हा प्रमुख सगळी मंडळी आमच्या संपर्कात आहेत. पण 12 खासदार हे शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत का, याची स्पष्ट कल्पना नाही.’