मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) बंडखोरी करून थेट गुजरात आणि त्यानंतर आता आसाममधील गुवाहटीत ठाण मांडून बसले आहेत. शिंदेंसोबत जवळपास 47 आमदार आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्याच्या राजकिय घडामोडींना प्रचंड वेग आलायं. शिवसेनेकडून आमदारांना वापस येण्यासाठी आवाहन केले जातयं. राज्यात अनेक ठिकाणी बंडखोर आमदारांचे (MLA) जनसंपर्क कार्यालयांची तोडफोड करण्यात आली. शिवसेनेचे आमदार गुवाहटीतील रेडिसन ब्लू या हाॅस्टेलमध्ये वास्तव्यास आहेत. या बंडखोर आमदारांचा गुवाहटीतला दिनक्रम नेमका कसा आहे, हे जाणून तुम्हाला आर्श्चय वाटेल. बंडखोर आमदारांचा गुवाहटीतील हाॅटेलमधील दिनक्रम नेमका कसा आहे, याबद्दल सुधीर सुर्यवंशी यांनी एक ट्विट शेअर केले आहे.
Rebelled Sena MLAs schedule in Guwahati
1.Morning walk/gym/swimming/spa
2. breakfast-special dishes
3. watching movies, news
4. light booze party & lunch
5. Cat nap
6. Meeting/strategy
7. High tea
8. Massage
9. Dinner
10. Musical night/mujra
11. Special massage/bed-time— Sudhir Suryawanshi (@ss_suryawanshi) June 27, 2022
हे सुद्धा वाचा
एकनाथ शिंदे यांनी दावा केला आहे की, त्यांच्यासोबत 47 आमदार आहेत. गुवाहटीतील हॉटेलमध्ये राहणाऱ्या आमदारांच्या सर्व सुखसोयींची काळजी घेतली जात आहे. रेडिसन हॉटेलच्या आसपास सुरक्षेसाठीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. हॉटेलमध्ये 196 खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या टीमसाठी 70 खोल्या बुक केल्याचे सांगितले जात आहे. भाजप नेत्यांची रेडिसन ब्लू हॉटेलला भेटीगाठी सुरूच आहेत. येणाऱ्या पुढील काही दिवसांमध्ये राज्यातील राजकारण अजून तापतांना दिसणार हे नक्की आहे.