Eknath Shinde vs Shivsena : उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका, जाणून घ्या शिंदे गटाचे याचिकेतील मुद्दे…
विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांना आज 5 वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. विधानसभेच्या नियमांनुसार 7 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं 2 दिवसांचा कालावधी दिलाय. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटानं केलीय.
एकनाथ शिंदे
Image Credit source: social
मुंबई : राज्यात शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट यांच्यातील वाद वाढल्याचं दिसतंय. शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ट्विटवर ट्विट करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेला आव्हान देत आहेत. तर बंडखोर 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढल्याचं पत्र दिल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. दरम्यान, राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपाकडूनही खलबतं सुरू आहे. तर शिंदे गटाकडून दाखल केलेल्या याचिकेतील मुद्दे समोर आले आहेत. शिंदे गटानं विधानसभा उपाध्यक्षांच्या निर्णयाविरोधात याचिका केली होती. जाणून घ्या याचिकेतील मुद्दे..
एकनाथ शिंदे यांच्या याचिकेतील मुद्दे
- विधानसभा अध्यक्षांनी 16 आमदारांना आज 5 वाजे पर्यंत म्हणणे मांडण्याची मुदत दिलीय. विधानसभेच्या नियमांनुसार 7 दिवसांचा वेळ द्यावा लागतो. परंतु स्पीकरनं 2 दिवसांचा कालावधी दिलाय. त्यामुळे उपाध्यक्षांच्या नोटीसाला स्थिगिती देण्याची मागणी एकनाथ शिंदे गटानं केलीय.
- स्पीकरच्या विरोधात अविश्वास ठराव आणला आहे. 34 जणांची सही आहे.. यावर कोर्टानं निर्णय घ्यावा.
- अजय चौधरीं आणि सुनिल प्रभूंची गटनेता आणि प्रतोद पदाची नियुक्ती चुकीच्या पद्धतीने केली आहे. या दोघांच्या नियुक्तीला स्थगिती द्या. कारण 17 आमदारांच्या सहीने ठराव करून गटनेते पद दिलं गेलं. पण आमच्याकडे जास्त आहेत.
- यात दुसरा मुद्दाः त्या ठरावात 24 आमदारांनी सह्या केल्या आहेत. त्यापैकी दादा भुसे आणि उदय सामंत , केसरकर यांसह 10 आमदार एकनाथ शिंदे गटात आले आहेत. त्यांनी आपला निर्णय वापस घेतला आहे..
- एकनाथ शिंदे गटाच्या 16 जणांवर शिस्तभंग कारवाईची केली. पण त्यातील पण काही आमदार एकनाथ शिंदे गटाकडे आले.
- गटनेत्यांची नियुक्ती हे निवडून आलेले आमदार करतात, पक्ष प्रमुख नाही. म्हणून स्पीकरनं अजय चौधरींची केलेली नियुक्ती चुकीची आहे.
- एकीकडे आम्हाला बोलवता आणि दुसरीकडे संजय राऊत आम्हाला धमक्या देत आहेत… जीवे मारण्याची धमकी देताहेत…
- सुनिल प्रभू आणि अजय चौधरींनी पक्षाचे लेटर हेड वापरू नये असे याचिकेत दिले आहेत.
- ऊपसभापती कार्यालयाचा गैरवापर केलाय…