“साहेब, तुमचे विचार-स्मृती सदैव आमच्या मनात!”, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेंचं नमन

| Updated on: Nov 17, 2022 | 12:00 PM

बाळासाहेब ठाकरेंचा 10 वा स्मृतीदिनानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून अभिवादन....

साहेब, तुमचे विचार-स्मृती सदैव आमच्या मनात!, बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतीदिनी एकनाथ शिंदेंचं नमन
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांना जाऊन आज 10 वर्षे झाली. आज त्यांचा स्मृतीदिन आहे. त्यानिमित्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बाळासाहेबांना अभिवादन केलंय. साहेब, आपले विचार आणि स्मृती सदैव आमच्या मनात… वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना स्मृतीदिनी विनम्र अभिवादन.., असं ट्विट करत शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरेंना अभिवादन केलंय.

बाळासाहेब ठाकरे यांचा आज स्मृतीदिन आहे. दसरा मेळाव्यावरून मोठा वाद झाला. त्यानंतर आता शिंदे-ठाकरे संघर्ष टाळण्यासाठी शिंदेगटाच्या वतीने एकदिवस आधी म्हणजे काल बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आलं. मात्र त्यानंतर शिवसेनेच्या ठाकरेगटाच्या वतीने बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी गोमूत्र शिंपडत शुद्धीकरण करण्यात आलं.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एक व्हीडिओ शेअर करत बाळासाहेब ठाकरेंबाबतच्या आठवणी जागवल्या आहेत. हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार सदैव मार्गदर्शन करीत राहतील…, असं फडणवीस म्हणालेत.

राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनीही बाळासाहेठ ठाकरेंना अभिवादन केलंय. माननीय हिंदुहृदयसम्राट सरसेनापती शिवसेनाप्रमुख आदरणीय श्रीमान. बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन! , असं केसरकर म्हणालेत.