Eknath Shinde: उद्धव ठाकरेंशिवाय बंडखोर गटाचेही काही खरं नाही? एकनाथ शिंदे म्हणतात, ‘उद्धव ठाकरेसाहेबांविषयी कालही आदर होता, आजही आहे!’

| Updated on: Jun 30, 2022 | 1:09 PM

Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरेसाहेबांविषयी कालही आदर होता, आजही आहे!'- एकनाथ शिंदे

Eknath Shinde: उद्धव ठाकरेंशिवाय बंडखोर गटाचेही काही खरं नाही? एकनाथ शिंदे म्हणतात, उद्धव ठाकरेसाहेबांविषयी कालही आदर होता, आजही आहे!
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई : सध्या राज्यात फडणवीस (Devendra Fadnavis) सरकार सत्तेत येण्याची चिन्हे आहेत. अश्यात आता एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गोव्याहून मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “मुंबईत गेल्यांतर मी पुढची रणनिती ठरवेन आणि मग बोलेन. दोन रेझोल्यूशन केलेले आहेत. उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्याचा आनंद आम्हाला नाही. शिवसेनेच्या आमदारांच्या मतदार संघातल्या लोकांची त्या आमदारांची भाजपसोबत जाण्याची इच्छा होती. उद्धव साहेबांच्या बद्दल कालही आदर होता, आजही आदर आहे”, असं एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबतच्या पुढच्या वाटचालीवर भाष्य केलंय. “आम्ही सध्या मुंबई राज्यपालांना भेटायला चाललोय. त्यांना भेटू, देवेंद्र फडणीवीसांनाही भेटू, मग अंतिम काय तो निर्णय घेऊ”, असंही शिंदे म्हणाले आहेत.

हे सुद्धा वाचा

पुन्हा बाळासाहेबांच्या विचारांचा दाखला

एकनाथ शिंदे यांनी एक ट्विट केलं आहे. यात त्यांनी पुन्हा एकदा बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचा दाखला दिला आहे. “वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार, धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिकवण, महाराष्ट्राचा सर्वांगिण विकास आणि आमदारांच्या मतदारसंघातील विकास कामे हाच आमचा फोकस”, असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.

दीपक केसरकर काय म्हणाले?

“कार्यकर्त्यांना चुकीचं वागण्यापासून रोखलं पाहिजे. ती माणसं आपल्यापासून दूर जाऊ शकतात. हे थांबवलं पाहिजे. अनेकांचे फोन येतात. त्यांना मला सांगायचंय, की शिवसेनेत ठाकरे कुटुंबाला आमचा विरोध नाही. हा वैधानिक पक्ष आहे. विधीमंडळ पक्षाला मान्यता आहे. १५ लोकांच्या सह्यांनी शिंदे साहेबांना काढण्याचा प्रयत्न झाला. नार्वेकरांना, फाटक साहेबांना चर्चेला पाठवणार, असं म्हणता मग तुम्ही त्यांच्यावर कारवाई का केली.. मी या गटाच्या वतीने बोलतोय. अगदी दोन दिवस अगोदरपर्यंत उद्धव साहेबांनी खुलं पत्र लिहिलं होतं… अजूनही तुम्ही महाविकास आघाडीची साथ सोडा आम्ही सर्व तुमच्याशी बोलायला येतो… पण ती अजूनही सोडलेली नाही”, असं दीप केसरकर यांनी म्हटलंय. ते पत्रकार परिषदेत बोलले आहेत.