Image Credit source: tv9 marathi
मुंबईः ठाकरे सरकारविरोधात बंड पुकारलेल्या एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अख्खी आमदारांची फौजच स्वतःसोबत घेतल्याचं दिसून येतंय. महाराष्ट्रर जिल्ह्या-जिल्ह्यात विखुरलेल्या शिवसैनिक आमदारांची ही फौज पुढील काही तासात ठाकरे (Uddhav Thackeray) सरकार उलथवून टाकेल की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. सोमवारी रात्रीपासून गायब असलेले एकनाथ शिंदे आणि आमदारांना मागमूस काढण्यासाठी शिवसेनेची धावपळ होत आहे तर इकडे एकनाथ शिंदे नवी शिवसेना (ShivSena) स्थापन करण्यासाठी सज्ज आहेत,असं बोललं जातंय. खुद्द एकनाथ शिंदे ज्या जिल्ह्यात आहेत, त्या ठाण्यापासून, मुंबई, रायगड, औरंगाबाद, बुलडाणा, अकोला आदी जिल्ह्यांतून फोडलेले आमदार एकनाथ शिंदेंच्या गळाला लागले असून ही फौज पुढील रणनीती आखण्यासाठी सज्ज झाली आहे. पाहुयात शिंदेंच्या सेनेतील आमदारांनी नावं..
कुठल्या जिल्ह्यातले किती आमदार फुटले?
ठाणे जिल्हा (7 आमदार)
- एकनाथ शिंदे-कोपरी पाचपाखाडी
- प्रताप सरनाईक- माजिवाडा
- विश्वनाथ भोईर-कल्याण पश्चिम
- शांताराम मोरे-भिवंडी
- बालाजी किणीकर-अंबरनाथ
- गीता जैन-मिरा भाईंदर
- प्रकाश सुर्वे-मागाठाणे
औरंगाबाद जिल्हा (6 आमदार)
- अब्दुल सत्तार-सिल्लोड
- संदीपान भुमरे-पैठण
- संजय शिरसाट-औरंगाबाद पश्चिम
- रमेश बोरणारे-वैजापूर
- प्रदीप जैस्वाल-औरंगाबाद मध्य
- उदयसिंह राजपूत-कन्नड
रायगड जिल्हा (3 आमदार)
- महेंद्र दळवी-अलिबाग
- महेंद्र थोरवे-कर्जत
- भरत गोगावले-महाड
सातारा जिल्हा (2 आमदार)
- शंभूराज देसाई-पाटण
- महेश शिंदे-कोरेगाव
सांगली जिल्हा (1 आमदार)
कोल्हापूर जिल्हा (1 आमदार)
सोलापूर जिल्हा (1 आमदार)
बुलढाणा जिल्हा (2 आमदार)
- संजय गायकवाड-बुलढाणा
- संजय रायमुलकर-मेहकर
अकोला जिल्हा (1 आमदार)
नांदेड जिल्हा (1 आमदार)
- बालाजी कल्याणकर-नांदेड उत्तर
पालघर जिल्हा (1 आमदार)
नाशिक जिल्हा (1 आमदार)
अमरावती जिल्हा (2 आमदार)
- बच्चू कडू- अचलपूर
- राजकुमार पटेल-मेळघाट
मुंबई (1 आमदार)
भंडारा जिल्हा (1 आमदार)
जळगाव जिल्हा ( 3 आमदार)
- किशोर पाटील-पाचोरा
- चिमणराव पाटील-पारोळा
- लता सोनवणे-चोपडा
उस्मानाबाद जिल्हा (2 आमदार)
- ज्ञानराज चौगुले-उमरगा
- तानाजी सावंत-भूम परांडा