अहमदनगर : ज्येष्ठ नेते यशवंतराव गडाख यांचे नातू आणि राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांचे चिरंजीव उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी होणार आहे. आज त्यांचा साखरपुडा पार पडला. गडाख आणि घुले कुटुंबीयांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न झाला. सध्या राजकारणात सक्रीय असलेल्या कुटुंबांकडून आपसात सोयरिक जुळवण्याचा ट्रेड जोरदार सुरू असल्याचे पहायला मिळत आहे. आज आणखी दोन राजकीय कुटुंब नात्यामध्ये अडकल्याचे पहायला मिळाले. लग्न ठरल्यापासून जिल्ह्यात या लग्नाची मोठी चर्चा आहे. अखेर आज उदयन आणि डॉ. निवेदिता यांचा साखरपुडा पार पडला.
उदयन गडाख यांचा विवाह राष्ट्रवादीचे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या डॉ. निवेदिता यांच्याशी करण्याचे ठरले आहे. त्यांचा आज साखरपुडा पार पडला. डॉ. निवेदिता या पुण्यातील भारती विद्यापीठात रेडिओ डायग्नोसिसमध्ये एमडीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. तर उदयन गडाख यांनी अहमदनगर येथे एमबीएचे शिक्षण पूर्ण केले असून. ते राजकारणात सक्रिय झाले आहेत.
दरम्यान आमदार तथा शिर्डी देवस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे हे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचे मोठे जावई आहेत. तर घुले यांचे दुसरे जावई हे आता उदयन गडाख होतील. चंद्रशेखर घुले हे राष्ट्रवादीत आहेत. तर गडाख हे शिवसेनेचे मंत्री आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीतील नेत्यांचे आपसातील नातेसंबंधांची आता चांगलीच चर्चा होऊ लागली आहे. हे नातेसंबंध पुढील राजकारणाच्या दृष्टीने देखील दोन्ही कुटुंबाला फायद्याचे ठरणार असल्याचे बोलेले जात आहे.
…म्हणून घेतला राजीनाम्याचा निर्णय; राजन तेली यांचे स्पष्टीकरण, दिपक केसरकरांवरही साधला निशाणा