मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतरही पुन्हा शिवतारेंची अजित पवारांवर शाब्दिक फायरिंग

| Updated on: Mar 19, 2024 | 7:07 PM

विजय शिवतार विरुद्ध अजित पवार वाद अजूनही शांत होताना दिसत नाहीय. मुख्यमंत्री एकनाश शिंदे यांनी विजय शिवतारे यांना शांत करण्याचा प्रयत्न केला असला तरी देखील त्यांनी पुन्हा एकदा अजित पवारांवर टीका केली आहे.

मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतरही पुन्हा शिवतारेंची अजित पवारांवर शाब्दिक फायरिंग
Follow us on

मुंबई : अजित पवारांविरोधात आक्रमक झालेल्या विजय शिवतारे यांना मुख्यमंत्री शिंदेंनी शांत करण्याचा प्रयत्न केलाय. पण मुख्यमंत्र्यांना भेटून आल्यानंतर पुन्हा शिवतारेंनी अजित पवारांच्या शाब्दिक फायरिंग केली आहे. बारामतीत अजित पवारांच्या विरोधात दंड थोपटल्यानंतर, दुसऱ्यांदा मुख्यमंत्री शिंदेंनी शिवतारेंना बोलावलं. आपल्याला मुख्यमंत्र्यांनी युती धर्माचं पालन करण्यास सांगितलं. पण त्यावर आपण 4-5 दिवसांत कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असं शिवतारे म्हणाले आहेत.

मुख्यमंत्री शिंदेंच्या शब्दाच्या पलिकडे जाणार नाही, असं शिवतारे म्हणत आहेत. म्हणजेच बारामतीतून शिवतारे माघार घेणार अशी दाट शक्यता आहे. मात्र मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही शिवतारेंही अजित पवारांवर हल्ला चढवणं काही सोडलं नाही. मी लढलो नाही तरी बारामतीत सुनेत्रा पवार जिंकणार नाही, अशी टीका शिवतारेंनी केली आहे.

बारामतीत सुनेत्रा पवारांच्या विरोधात शिवतारे उभं राहिल्यास, कल्याणमध्ये श्रीकांत शिंदेंना पाडणार, शिंदेशाही संपवणार असा इशारा अजित पवार गटानंही दिला. त्यावरुनही शिवतारेंनी पुन्हा निशाणा साधला. 2019 मध्ये माझा आवाका काढणारे आता का धमकी देत आहेत ? असं शिवतारे म्हणाले आहेत.

शिवतारे बारामतीतून सुनेत्रा पवारांविरोधात माघार घेणार अशीच शक्यता आहे…मात्र असं असलं तरी अजित पवार त्यांच्या पवार कुटुंबातच वेगळे पडल्याचं दिसत आहेत.

शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार त्यांच्या पत्नी सुनंदा पवार, राजेंद्र पवारांचे पुत्र आणि अजित अजित पवारांचे पुतणे रोहित पवार दादांच्या विरोधात मैदानात आहेतच तसंच रोहित पवारांची बहीण सई पवारही सुप्रिया सुळेंच्या समर्थनात प्रचारात उतरल्यात

अजित पवारांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार त्यांची पत्नी शर्मिला पवार आणि श्रीनिवास पवारांचे पुत्र युगेंद्र पवारांनी सुप्रिया सुळेंचा प्रचार सुरु केलाय

इकडे अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांनी मतदारांना संधी देण्याचं आवाहन केलंय. संधी दिल्यास बारामती लोकसभेच्या इतर मतदारसंघाचाही विकास करणार, असं सुनेत्रा पवार म्हणाल्या आहेत.

बारामती लोकसभेच्या निवडणुकीत कुटुंबातून एकटं पडणार अशी भीती आधीच अजित पवारांनी बोलून दाखवली होती…म्हणजेच अजित पवारांसाठी ही लढाई फक्त राजकीय नाही. तर कौटुंबीकही झाली आहे.