मुंबई : (Rebellion in Shiv Sena) शिवसेनेतील बंड आता थंड झाले असले तरी अंतर्गत मतभेद आणि रुसवे-फुगवे हे सुरुच आहेत. (Uddhav Thackeray) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे पक्ष संघटनेवर भर देत आहेत. पदाधिकाऱ्यांच्या बैठका आणि बंडखोर आमदारांच्या मतदार संघात जाऊन ते आपली भूमिका मांडत आहे. ढासळलेला गढ पुन्हा उभा करण्याचा प्रयत्न सुरु असतानाच (Rajan Salvi) आमदार राजन साळवी हे देखील नाराज असल्याचे समोर येत आहे. याला कारण ठरले आहे ते बारसू,सोलगाव येथे उभारली जाणारा रिफायनरी प्रोजेक्ट. आ. राजन साळवी यांनी या रिफायनरीला समर्थन दर्शवले आहे तर त्यांच्या या भूमिकेमुळे शिवसेनेचे नेतृत्व नाराज झाले आहेत. त्यामुळे आता पक्षश्रेंष्ठींनी जर रिफायनरीला विरोध केला तर राजन साळवी आपली राजकीय भूमिका काय घेणार हे पहावे लागणार आहे. त्यामुळे एकीकडे सावरासावरी सुरु असतनाच अशा नाराजांना रोखण्याचे आव्हान देखील ठाकरेंसमोर आहे.
राजापूरातील बारसू आणि सोलगाव येथे रिफायनरीचा प्रोजेक्ट उभारला जाणार आहे. या प्रोजेक्टला शिवसेनेचे आमदार राजन साळवी यांनी समर्थन दिले आहे तर शिवसेना आणि पक्षप्रमुखांचे मत हे वेगळे आहे. शिवाय राजन साळवींनी घेतलेल्या समर्थनाच्या भूमिकेवरून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर आली आहे. तर रिफायनरीला साळवेंचे समर्थन हे त्यांचे वैयक्तीक मत असल्याचे काही शिवसेना नेते सांगत आहेत. पण स्थानिक जनतेची भावना लक्षात घेता याला विरोध होणे गरजेचे असल्याचे सांगितले जात आहे. यावरुन पक्षनेतृत्व आणि राजन साळवी यांच्यात मतभेद असल्याचे समोर आले आहे.
रिफायनरीला विरोध किंवा समर्थन हा मुद्दा गौन आहे पण तेथील स्थानिकांचे म्हणणे काय आहे हे देखील महत्वाचे असल्याचे शिवसेना खा. विनायक राऊत यांनी सांगितले आहे. तर शिवसेना ही स्थानिक जनतेच्या बाजूने असल्याचेही ते म्हणाले आहे. राजन साळवींचा विरोध म्हणावा तर मविआ सरकारच्या काळात उद्धव ठाकरे यांनीच राजापूरच्या बारसू,सोलगाव इथं रिफायनरी प्रकल्प करण्यास हिरवा कंदील दाखवला होता. आणि आता विरोधाची भूमिका शिवसेना घेत आहे.
शिवसेना नेतेपदी भास्कर जाधव आणि अरविंद सावंत यांची वर्णी लागलेली आहे. दोन दिवसांपूर्वीच त्यांची निवड पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. भास्कर जाधव यांची वर्णी राजन साळवी यांना खटकलेली आहे. यातच आता रिफायनरीचा मुद्दा समोर आल्याने त्यांची नाराजी दूर केली जाते की तेच वेगळा निर्णय घेणार हे पहावे लागणार आहे.