मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिन्ही वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केलीय. शेतकऱ्यांना समजावण्यात आम्ही कमी पडलो. त्यामुळे आम्ही देशवासियांची माफी मागत आहोत, असं सांगत शेतकऱ्यांनी आता आंदोलन संपवून आपल्या घरी जावं, असं आवाहनही मोदींनी केलंय. दरम्यान, आंदोलन काळात ज्या 700 शेतकऱ्यांनी आपला जीव गमावला त्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची पंतप्रधान मोदींनी माफी मागावी, अशी मागणी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केलीय. (PM Narendra Modi should apologize to the families of the deceased farmers, demanded MP Sanjay Raut)
‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या 700 शेतकऱ्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुंबीयांची माफी मागावी. ज्यांनी जीव गमावला त्यांच्या कुटुबांसाठी आर्थिक मदत जाहीर करावी. तसंच लाल किल्ल्यावरील हिंसाचाराच्या गुन्ह्यांसह शेतकऱ्यांवर सर्व खटले मागे घ्यावेत. जय जवान, जय किसान,’ असं ट्विट करत संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधलाय.
PM Modi should apologise to the family members of 700 farmers who lost lives, he should also announce monetary relief for those who lost lives and he should also withdraw all cases against Farmers including cases registered for violence on Red Fort.
जय जवान
जय किसान— Sanjay Raut (@rautsanjay61) November 19, 2021
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला चढवला होता. पंतप्रधानांनी सात वर्षात पहिल्यांदा देशातील जनतेचा आवाज ऐकला. पहिल्यांदा त्यांनी मन की बात ऐकली. दिल्लीत अनेक शेतकऱ्यांचा मृत्यूही झाला. एक वर्षापूर्वीच ऐकलं असतं तर अनेकांचा जीव वाचला असता, अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिली आहे.
गेल्या दीड वर्षापासून देशातील शेतकरी विशेषतः पंजाब, हरियाणाचा शेतकरी तीन कृषी कायदे, काळे कायदे याविरुद्ध संघर्ष करतोय, आंदोलन करतोय. सरकारची भूमिका पहिल्यापासून आठमुठेपणाची होती. काही झालं तरी झुकणार नाही, काही झालं तरी शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करणार नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे पूर्णपणे त्यांनी दुर्लक्ष केलं. या संपूर्ण काळात 450 च्या आसापास शेतकऱ्यांचे मृत्यू झाले, आत्महत्या झाल्या. लखीमपूरमध्ये शेतकऱ्यांना चिरडून मारण्यात आलं. लाठ्याकाठ्या वापरण्यात आल्या. प्रचंड दबावाचं राजकारण करण्यात आलं. शेतकऱ्यांना आतंकवादी, पाकिस्तानी, खलिस्तानी अशा प्रकारच्या उपमा देण्यात आल्या. पण शेतकऱ्यांनी जी भूमिका घेतली ती इतकी परखड आणि अतिशय स्पष्ट होती की देशातील शेतकऱ्यांच्या भावनाही शेतकऱ्यांच्या पाठिशी राहिल्या आणि अखेर आज पंतप्रधानांना तीन काळे कायदे मागे घ्यावे लागले, असंही राऊत म्हणाले.
इतर बातम्या :
Amravati Violence : अमरावतीमधील इंटरनेट सेवा पूर्ववत, सामान्यांना दिलासा; संचारबंदी मात्र कायम
PM Narendra Modi should apologize to the families of the deceased farmers, demanded MP Sanjay Raut