स्वप्निल उमप
अमरावती : अमरावतीमध्ये तब्बल पंधरा दिवसांनंतर दाखल झाल्यानंतर आमदार रवी राणा (Ravi Rana) यांचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. जयस्तंभ चौकात त्यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. यावेळी त्यांनी मौन धारण केले. मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर यांचा जाहीर निषेध केला. कार्यकर्त्यांनी त्याठिकाणी पोस्टर फडकवले. रवी राणा यांनी राज्य सरकारवर टीका केली. राजपेठ उड्डाणपुलावरील (Rajpeth flyover) शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी 20 लाख रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणा आमदार रवी राणा यांनी केली. तसेच अटक पूर्व जामिनासाठी अर्ज करणार असल्याचे राणा म्हणाले. रवी राणा यांची निषेध रॅली संपली. महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोरच (Statues of Mahatma Gandhi) आमदार रवी राणा यांना भोवळ आली. त्यामुळं त्यांना त्यांच्या राजापेठ येथील कार्यालयात नेण्यात आले.
कार्यकर्त्यांनी आमदार रवी राणा यांचे जोरदार स्वागत केले. या स्वागत समारंभादरम्यान रवी राणा यांना चक्कर आली. ते भोवळ येऊन पडणार येवढ्यात कार्यकर्त्यांनी त्यांना सांभाळले. त्यानंतर त्यांना त्यांच्या राजापेठ येथील कार्यालयात नेण्यात आले. राणा यांच्यावर रेडियंट रुग्णालयात उपचार करण्यात आले. तिथं डॉक्टरांकडून योग्य उपचार सुरू आहे. त्यांची प्रकृती स्थिर असल्यांच डॉक्टरांनी सांगितलं.
शाई फेक प्रकरणात रवी यांना यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेत. त्यामुळं रवी राणा हे राज्याबाहेर होते. त्यांनी पटियाला न्यायालयातून ट्रान्झिट रिमांड मिळविला. नागपूर येथील विमानतळावर ते उतरले. त्यानंतर अमरावतीकडे रवाना झाले. तिथं त्यांचं जोरदार स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या गराळ्यात असतानाच त्यांना भोवळ आली. ज्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला त्यांच्याविरोधात मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचं राणा यांनी यावेळी सांगितलं.
— Govind Hatwar (@GovindHatwar) February 24, 2022
क्लड प्रेशर कमी आल्याने रवी राणा यांना चक्कर आली होती. एक-दोन दिवस त्यांना रुग्णालयात उपचार घ्यावे लागतील. शरीरात पाण्याचे प्रमाणही कमी झाले होते. पचनक्रियाही व्यवस्थित नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तपासण्या पूर्ण केल्यानंतर डॉक्टरांनी ही माहिती दिली.