धुळे : भाजप नेते राजेंद्रकुमार गावित (Rajendra Kumar Gavit) आणि त्यांच्या पत्नी ईला गावित यांच्याविरोधात बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय. गावितांवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आज राजेंद्रकुमार गावित यांच्या नटावद आणि तळोदा येथील घरी एसीबीनं छापे टाकलेत. (Filed a Case Against BJP Leader Rajendra Kumar Gavit)
राजेंद्रकुमार गावित हे माजी कक्ष अधिकारी तर त्यांच्या पत्नी या माजी पोलीस निरीक्षक आहेत. दोघांनीही स्वेच्छानिवृत्ती घेतलीय. 42 लाखांपेक्षा अधिक बेहिशेबी मालमत्ता जमवल्याप्रकरणी धुळे शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. एसीबीच्या तपासात नेमकं काय समोर आलंय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. एसीबीच्या अधिकाऱ्यांनीही कॅमेरासमोर बोलण्यास नकार दिलाय.
विना परवानगी मोर्चा काढल्याने भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा पोलीस आयुक्तांनी सत्कार केला होता. पोलीस आयुक्तांच्या या कृतीमुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून भाजपमधूनही संताप व्यक्त केला जात होता. भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी पोलीस ठाण्यावर विना परवानगी मोर्चा काढला होता. त्यामुळे फरांदे यांच्याविरोधात बेकायदेशीर जमाव जमवल्याचा ठपका ठेवून पोलीस आयुक्तांनी पोलीस निरीक्षक निलेश माईनकर यांचा जाहीर सत्कार केला होता. त्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात असून भाजपने मात्र पोलीस आयुक्तांच्या या कृतीवर संताप व्यक्त केला आहे. आमदारावर गुन्हा दाखल करण्यात आला म्हणून पोलिसांना प्रचंड आनंद झाला आहे का? असा सवाल भाजपमधून व्यक्त केला जात आहे.
संबंधित बातम्या
नायलॉन मांजामुळे गळा चिरुन महिलेचा मृत्यू, मृतदेह स्वीकारण्यास नातेवाईकांचा नकार
देवयानी फरांदेंवर गुन्हा दाखल करणाऱ्या पोलिसांचा सत्कार; भाजप संतप्त
Filed a Case Against BJP Leader Rajendra Kumar Gavit