Assembly Election 2023 | सध्या देशात पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरु आहे. तेलंगणमध्ये सुद्धा विधानसभा निवडणूक होणार आहे. या दरम्यान हैदराबादमध्ये निवडणूक प्रचार करताना असदुद्दीन ओवैसींचा भाऊ अकबरुद्दीन ओवैसीने पोलीस इंस्पेक्टरला खुलेआम धमकावले. अकबरुद्दीनने पोलीस अधिकऱ्यासोबत गैरवर्तन केलं. एआयएमआयएमचे (AIMIM) उमेदवार अकबरुद्दीन काल रात्री हैदराबादमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित करत होते. रात्रीचे 10 वाजल्यानंतर प्रचाराची वेळ संपणार होती. तिथे उपस्थित असलेल्या पोलीस इंस्पेक्टरने जनसभा संपवण्याचा इशारा केला. त्याचा अकबरुद्दीन ओवैसीला राग आला. त्याने उलट पोलिसांना धमकावत तिथून निघून जाण्यास सांगितलं. अजून 10 वाजायला पाच मिनिट बाकी आहेत. तुम्ही इथून निघा. माझ्या एका इशाऱ्यावर तुम्हाला इथून पळून लावलं जाईल. सभेला उपस्थित असलेल्या समर्थकांना विचारलं, की मी बरोबर बोलतोय ना?.
मी एक इशारा केला, तर तुम्हाला इथून पळाव लागेल, असं अकबरुद्दीन म्हणाला. इंस्पेक्टर त्यांना आदर्श आचार संहितेचा पालन करुन वेळेवर भाषण संपवायला सांगितलं होतं. रात्री 10 वाजून गेल्यानंतरही ते जनसभेला संबोधित करत होते, असं म्हटल जातय. आता त्यांच्या या कृतीवर निवडणूक आयोगच निर्णय़ घेऊ शकतो. अकबरुद्दीन ओवैसी चंद्रयानगुट्टा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढत आहेत.
#WATCH | Telangana: AIMIM leader Akbaruddin Owaisi threatened a police inspector who was on duty and asked him to leave the spot while he was addressing a campaign in Lalitabagh, Hyderabad yesterday. The police inspector asked him to conclude the meeting on time as per the Model… pic.twitter.com/rf2tJAOk3b
— ANI (@ANI) November 22, 2023
मतदान आणि निकाल किती तारखेला?
चंद्रयानगुट्टा सीट AIMIM साठी खूप मजबूत सीट आहे. 2014 आणि 2018 मध्ये ओवैसीच्या पार्टीने इथून विजय मिळवलाय. तेलंगणमध्ये 30 नोव्हेंबरला मतदान आहे. तीन डिसेंबरला निवडणुकीचे निकाल जाहीर होतील. तेलंगणमध्ये त्रिकोणीय लढत अपेक्षित आहे. राज्यात बीआरएस, काँग्रेस आणि भाजपामध्ये तगडी फाईट होऊ शकते. तेलंगणध्ये सध्या KCR यांचं सरकार आहे.