Sanjay Raut : भाजप बहुमतासाठी एकनाथ शिंदे, अजित पवारांचा पक्षही फोडेल – संजय राऊत

| Updated on: Nov 26, 2024 | 11:27 AM

Sanjay Raut : "2019 साली अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला आम्ही सांगत होतो, तेव्हा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. तेव्हा अडीच वर्ष फॉर्मुला मान्य केला असता तेव्हा पुढल्या अनेक घडामोडी टाळता आल्या असत्या. पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता"

Sanjay Raut : भाजप बहुमतासाठी एकनाथ शिंदे, अजित पवारांचा पक्षही फोडेल - संजय राऊत
संजय राऊत, खासदार ठाकरे गट
Image Credit source: Facebook
Follow us on

“भाजपकडे बहुमत आहे आणि जर त्यांच्याकडे बहुमत नसेल तर ते बहुमत कसं मिळवायचं? कोणाला तोडायचं? कोणाला खरेदी करायचं ? यामध्ये ते माहिर आहेत. बहुमतासाठी भाजप शिंदे यांची पार्टी सुद्धा तोडू शकते आणि अजित पवारांची पार्टी देखील तोडू शकतात. त्यामुळे मला असं वाटतं की मुख्यमंत्री हे भाजपचेच व्हायला पाहिजे” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. “एकनाथ शिंदे आज संध्याकाळपर्यंत मुख्यमंत्री आहेत असे आम्ही मानतो, जरी जे घटनाबाह्य असतील तरी ते मुख्यमंत्री आहेत, ते आता नव्याने निवडून आले आहेत ते आणि त्यांची लोकं. आता जर ते मुख्यमंत्री झाले तर ते घटनेनुसार होतील. पण आतापर्यंत आज संध्याकाळपर्यंत ते घटनाबाह्य मुख्यमंत्रीच होते आणि आहेत. आता नवीन निवडणूक झाली आहे. त्यानंतर जो मुख्यमंत्री महाराष्ट्राला लाभेल तो कोणीही असेल तो लोकशाही आणि घटने नुसार बसेल” असं संजय राऊत म्हणाले.

“2019 साली अडीच-अडीच वर्ष फॉर्म्युला आम्ही सांगत होतो, तेव्हा अडीच-अडीच वर्षाचा फॉर्म्युला त्यांना मान्य नव्हता. तेव्हा अडीच वर्ष फॉर्मुला मान्य केला असता तेव्हा पुढल्या अनेक घडामोडी टाळता आल्या असत्या. पण फक्त माननीय उद्धव ठाकरे आणि शिवसेनेला त्रास द्यायचा होता. पक्ष फोडायचा होता म्हणून हा तेव्हा अडीच वर्षाचा फॉर्मुला पाळला नाही आणि आता ते सर्व काही करायला तयार आहेत, यातून लक्षात घ्या महाराष्ट्र विषयी शिवसेनेविषयी किती द्वेष आहे” असं संजय राऊत म्हणाले.

….तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल

“मला कोण मुख्यमंत्री होणार याच्यामध्ये इंटरेस्ट नाही. मी एका सांगेन आज 26 तारीख आहे, आज सरकार स्थापनेबाबत शेवटचा दिवस आहे. विधानसभेची मुदत संपत आहे, जेव्हा आम्ही सरकार बनवू अशी परिस्थिती निर्माण झाली होती, काही काळापूर्वी आम्हाला बहुमत मिळेल तेव्हा वारंवार सांगण्यात येत होतं 26 तारखेपर्यंत मुख्यमंत्री शपथ घेतली नाही सरकार स्थापन झालं नाही तर राष्ट्रपती राजवट लावली जाईल, अशा धमक्या दिल्या जात होत्या” असं संजय राऊत म्हणाले.

भारतीय जनता पक्षाचा सरकार स्थापनेचा हक्क

“आज संध्याकाळी पर्यंत महाराष्ट्राला मुख्यमंत्री मिळेल अशी अपेक्षा आम्ही करतो. जनतेला अपेक्षा नाही पण आम्हाला असं वाटतं राज्याला एक नेतृत्व मिळावं ते कोण आहे हे शेवटी दिल्लीचे अमित शहा किंवा नरेंद्र मोदी ठरवतील. ते काही इकडे आमदार ठरवणार नाहीत. भारतीय जनता पक्षाकडे स्वतःच बहुमत आहे. त्यांच्यामुळे मला असं वाटतं भारतीय जनता पक्षाचा सरकार स्थापनेचा हक्क आहे” असं संजय राऊत म्हणाले.