माजी हवाई दल प्रमुख RKS भदौरिया राजकारणात, ‘या’ पक्षातून सुरु करणार नवी इनिंग

| Updated on: Mar 24, 2024 | 1:00 PM

भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी राजकारणात प्रवेश केला आहे. काही नवीन प्रभावशाली लोक राजकारणात येत आहेत.

माजी हवाई दल प्रमुख RKS भदौरिया राजकारणात, या पक्षातून सुरु करणार नवी इनिंग
Former IAF Chief rks bhadauria
Follow us on

लोकसभा निवडणुकीची तारीख जशी जवळ येतेय, तसं सगळ्याच पक्षात पक्षांतर वाढत चाललय. काही नवीन प्रभावशाली लोक राजकारणात येत आहेत. खासकरुन भाजपामध्ये प्रवेश करणाऱ्यांची संख्या जास्त आहे. काँग्रेससह अन्य पक्षाच्या छोट्या-मोठ्या नेत्यांनी निवडणुकीआधी भाजपात प्रवेश केलाय. दरम्यान भारतीय हवाई दलाचे माजी प्रमुख राकेश कुमार सिंह भदौरिया यांनी सुद्धा राजकारणात प्रवेश केलाय. राकेश कुमार सिंह भदौरिया आणि YSR चे वरिष्ठ नेते वी प्रसाद राव यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे. भाजपाचे महामंत्री विनोद तावडे आणि केंद्रीय मंत्री अनुराग ठाकुर यांनी राकेश कुमार आणि वी प्रसाद राव यांना दिल्लीत पक्षाच सदस्यत्व मिळवून दिलं.

मंत्री अनुराग ठाकुर आणि महामंत्री विनोद तावडे यांनी दोन्ही नेत्यांच स्वागत केलं. जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असलेल्या भाजपामध्ये प्रवेश केल्याबद्दल भदौरिया आणि वी प्रसाद राव यांचं अनुराग ठाकूर यांनी स्वागत केलं. भदौरिया हे आत्मनिर्भर भारत अभियानासाठी सर्वाधिक सक्रीय होते. आता ते राजकीय व्यवस्थेत योगदान देणार आहेत असं अनुराग ठाकूर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं विकसित भारताच स्वप्न साकार करण्यासाठी प्रसाद राव भाजपामध्ये आले आहेत असं अनुराग ठाकूर म्हणाले. “देश मोदींच्या नेंतृत्वाखाली सुरक्षित आहे, त्यामुळेच आर के भदौरिया सरांसारखे लोक भाजपामध्ये येत आहेत” असं अनुराग ठाकूर म्हणाले.

माजी हवाई दल प्रमुख प्रवेशानंतर काय म्हणाले?

“विकसित भारताचा संकल्प जागतिक स्तरावर भारताला एक वेगळी ओळख मिळवून देईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारताच्या संकल्पाला पूर्ण करेन. भारतीय सैन्याच सशक्तीकरण, आधुनिकीकरणाच जे काम झालय, त्यामुळे आत्मनिर्भरता येईल” असं भाजपामध्ये दाखल झाल्यानंतर राकेश कुमार सिंह भदौरिया म्हणाले.