मुंबई : 100 कोटींच्या वसुली आदेश प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अखेर अटक करण्यात आलीये. काल रात्री 12 वाजता त्यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली. अनिल देशमुखांना अटक केल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ माजली असून यावर अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. यातच रात्री 2 वाजता भाजप आमदार नितेश राणे यांनी खोचक टीका करणारं ट्विट केलं आहे. “अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
नितेश राणेंचं खोचक ट्विट – थँक्स नवाब मलिक आणि संजय राऊत
“अनिल देशमुख हॅपी दिवाली आणि अनिल परब मेरी ख्रिसमस?, स्पेशल थँक्स टू नवाब मलिक आणि संजय राऊत”, असं ट्विट नितेश राणे यांनी केलं आहे.
Anil deshmukh.. Happy Diwali!
Anil Parab..Merry Christmas??
Special thanks to nawab malik n Sanjay raut ?
— nitesh rane (@NiteshNRane) November 1, 2021
अनिल देशमुखांना अटक?
सोमवारी 1 नोव्हेंबरला सकाळी 11.30 ते 11.45 वाजताच्या दरम्यान अनिल देशमुख ईडी कार्यालयात पोहोचले. त्यापूर्वी त्यांनी व्हिडीओ ट्विट करत ईडीच्या कारवाईला सहकार्य करणार असल्याचं सांगितलं होतं.
ईडी कार्यालयात गेल्यानंतर त्यांची चौकशी सुरु झाली. त्यानंतर तब्बल 13 तासांच्या चौकशीनंतर त्यांना वेगवेगळ्या कलमांनुसार अटक करण्यात आलीये. मनी लाँड्रिंगच्या अनुषंगानं ही सर्व कारवाई करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. 2 नोव्हेंबरला सकाळी त्यांना ईडीच्या कोर्टामध्ये हजर केले जाणार आहे. त्यांची सकाळी मेडिकल होणार असून, त्यानंतर ईडीच्या स्पेशल कोर्टात त्यांना नेण्यात येणार आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणातील ही तिसरी अटक आहे. यापूर्वीही अनिल देशमुख यांच्या दोन सचिवांना अटक करण्यात आली होती.
अनिल देशमुख यांना अखेर ईडीकडून अटक#anildeshmukh #edactionhttps://t.co/yoGMiS4kjC
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 1, 2021
संबंधित बातम्या :