1993 बॉम्बस्फोट कनेक्शन, फडणवीसांनी उल्लेख केलेला सरदार शाह वली खान कोण आहे?

| Updated on: Nov 09, 2021 | 1:51 PM

फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब मलीक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलीक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खरेदी केल्याचा आरोप केला आहे.

1993 बॉम्बस्फोट कनेक्शन, फडणवीसांनी उल्लेख केलेला सरदार शाह वली खान कोण आहे?
देवेंद्र फडणवीस, नवाब मलिक
Follow us on

मुंबई – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज पत्रकार परिषद घेत नवाब मलीक यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. मलीक यांनी 1993 च्या बॉम्बस्फोट प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या सरदार शहा वली खान आणि हसीना पारकरचा ड्रायव्हर असलेल्या सलीम पटेल अशा अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून कोट्यावधीची जमीन अवघ्या काही लाखांमध्ये खरेदी केल्याचे फडणवीस यांनी म्हटले आहे. दरम्यान फडणवीस यांनी या प्रकरणात ज्या सरदार शहाब अली खानचा उल्लेख केला, तो नेमका कोण होता? त्याचा आणि मुंबई बॉम्बस्फोटातील मुख्यसूत्रधार टायगर मेमनचा काय संबंध होता? जाणून घेऊयात.

   कोण आहे सरदार शहा वली खान?

सरदार शहा वली खान हा 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटाचा गुन्हेगार आहे. बॉम्बस्फोट प्रकरणात दोषी आढळल्याने त्याला उच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. सर्वोच्च न्यायालयाने देखील त्याची शिक्षा कायम ठेवल्याने सध्या तो जन्मठेपेची शिक्षा भोगत आहे. सरदार शहा वली खान हा टायगर मेमनच्या नेतृत्त्वात फायर आर्म ट्रेनिंगमध्ये सहभागी झाला होता. बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि मुंबई महापालिकेच्या इमारतीत बॉम्ब कुठे ठेवायचा, याची रेकी देखील त्यानेच केली होती. टायगर मेमनच्या घरी बॉम्बस्फोटाचे कारस्थान शिजले. त्या सर्व  बैठकीला तो उपस्थित होता. पुढे काय घडणार आहे? कोणत्या ठिकाणी बॉम्फोट होणार आहेत? या सर्व गोष्टींची त्याला कल्पना होती.  माहिममध्ये असलेल्या टायगर मेमनच्या घरातून त्यानेच गाड्यांमध्ये आरडीएक्स भरले. पुढे बॉम्बस्फोटातील आरोपींना अटक करण्यात आल्यानंतर माफीचे साक्षीदार आणि इतर गुन्हेगारांनी दिलेल्या पुराव्यामुळे त्याला जन्मठेपेची शिक्षा झाली.

काय म्हणाले फडणवीस ?

राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी अंडरवर्ल्डशी संबंधित लोकांकडून जमीन खऱेदी केल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे. अवघ्या 20 लाखांमध्ये एलबीएस रोडवर 3 एकर जमीन खरेदी करण्यात आली. त्या जमीनीची प्रत्यक्ष किंमत ही कोट्यावधींच्या घरात होती. यातील 15 लाख हे हसीना पारकचा ड्रायव्हर असलेल्या सलीम पटेलला मिळाले तर  5 लाख रुपये हे  सरदार खानला मिळाले. या जमीनीचा व्यवहार हा सॉलिडस कंपनीसोबत झाला होता. सॉलिडस प्रा. लि. कंपनी ही नवाब मलिक यांच्या कुटुंबीयांची आहे. नवाब मलिक देखील या कंपनीशी संबंधित होते. 2019 मध्ये मंत्री झाल्यानंतर ते राजीनामा देऊन कंपनीतून बाहेर पडल्याचा आरोप फडणवीस यांनी केला आहे.

 

संबंधित बातम्या 

अखेर फडणवीसांनी बॉम्ब फोडला! मुंबईत बॉम्बस्फोट करणाऱ्यांकडून जमीन का खरेदी केली? फडणवीसांचा मलिकांना सवाल

राणेंसारख्या गद्दाराची सिंधुदुर्गात डाळ शिजणार नाही; राऊतांची घणाघाती टीका

तासाभरापूर्वी संजय राऊत भेटले, आता पवार गृहमंत्री वळसे पाटलांच्या भेटीला, मुंबई पोलीस आयुक्तांनाही बोलावलं, हालचालींना वेग