मुंबई : माजी मंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. संजय राऊत यांनी 27 जुलै रोजी बोलताना 20/11 वेळी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना पद सोडावं लागलं होतं, असं वक्तव्य केलं. त्यावरुन सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांना टोला लगावलाय. श्रेयवादाचे जनक असलेले संजय राऊत ज्यावेळी 1 बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवता त्यावेळी बाकी बोटं तुमच्याकडे असतात हे विसरलात की काय? असा सवाल सदाभाऊ खोत यांनी विचारला आहे. (Sadabhau Khot criticizes Shiv Sena MP Sanjay Raut)
‘श्रेयवादाचे जनक असलेले खासदार संजय राऊत ज्यावेळी 1 बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवतात त्यावेळी बाकीबोटं तुमच्याकडे असतात हे विसरलात की काय? 26/11 दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी पद सोडले हा मुद्दा समोर ठेवून मुख्यमंत्र्याची कार्यक्षमता लपविण्याची नामुष्की तुमच्यावर ओढावली आहेना’, असा खोचक टोला खोत यांनी संजय राऊतांना लगावला आहे.
श्रेयवादाचे जनक असलेले@rautsanjay61 ज्यावेळी 1 बोट तुम्ही दुसऱ्याकडे दाखवतात त्यावेळी बाकीबोटं तुमच्याकडे असतात हे विसरलात की काय?
26/11दहशतवादी हल्ल्यानंतर विलासराव देशमुख यांनी पद सोडले हा मुद्दा समोर ठेवून मुख्यमंत्र्याची कार्यक्षमता लपविण्याची नामुष्की तुमच्यावर ओढावली आहेना pic.twitter.com/4Xto0yWXgA
— Sadabhau Khot (@Sadabhau_khot) August 2, 2021
भाजपमध्ये उपऱ्यांना, बाटग्यांना स्थान नव्हतं. पण आता मूळ विचारांचे लोक भंगारात व बाटगे पालखीत बसवून त्यांना नाचवले जात आहे. त्यामुळेच या पक्षाचा अंतकाळ जवळ आला आहे, अशी घणाघाती टीका आजच्या सामना अग्रलेखातून संजय राऊत यांनी केलीय. त्यावरुन भाजप आमदार नितेश राणे यांनी संजय राऊतांना थेट इशारा दिलाय. तसंच राऊतांवर जोरदार हल्लाही चढवला आहे. महामंडळं, पदं सगळ्या खास लोकांना. बाळासाहेबांचे निष्ठावंत दिसले नाहीत. बाटग्यांच्या माध्यमातून चालणारी शिवसेना आहे, असं प्रत्युत्तर नितेश राणे यांनी दिलंय. तसंच नारायण राणे यांनी सेना सोडली तेव्हा सामना समोरच्या सभेत संजय राऊत बाथरुममध्ये लपले होते. समोर आले तर ततपप होतं होतं आणि आता धमक्यांची भाषा वापरली जातेय. आम्ही खांद्यावर बंदूक ठेवत नाही. सेनाभवन आणि बाळासाहेबांबद्दल आदर आहे, अशा शब्दात नितेश राणे यांनी राऊतांवर हल्ला चढवलाय.
प्रसाद लाड यांच्याबद्दल बोलताना शाखाप्रमुख उत्तर देतील असं तुम्ही बोलता. मग कॉन्ट्रॅक्ट देताना हे शाखाप्रमुख कुठे जातात? त्यांना काय देता? असा खोचक सवालही नितेश राणे यांनी शिवसेनेला विचारलाय. मुख्यमंत्र्यांनी सगळ्यांना सोबत घेऊन न्याय देण्याचा प्रयत्न करावा. प्रसाद लाड यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. त्यामुळे विषय संपलाय. आता मुंबईच्या समस्यांबाबत बोला. नाहीतर आरे ला कारे करायला आम्ही मागेपुढे पाहणार नाही, असा इशाराही नितेश राणे यांनी यावेळी दिलाय.
संबंधित बातम्या :
मुंबईची लोकल कधी सुरू होणार?; वाचा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Video: मुंबईत शिवसैनिकांचा तुफान राडा, ‘अदानी एअरपोर्ट’वर संतप्त, जोरदार तोडफोड