मुंबई : माजी आमदार अनिल गोटे यांनी देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) केलेल्या आरोपांवर टीव्ही 9 शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली आहे. आपल्यावर करण्यात आलेले सगळे आरोप अनिल गोटे (Anil Gote) यांनी फेटाळून लावले आहेत. फोन टॅपिंगवरुन त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घातला जात असल्याचं म्हटलय. ‘म्हजे उद्या आम्ही खासगीत आमच्या बायकांशीही बोलायचं नाही का’ असा सवालही उपस्थित केला आहे. फोन टॅपिंग करायचे काही नियम आहेत की नाही? फोन टॅपिंग मॅन्युप्युलेट केलेलं आहे, असा आरोप अनिल गोटे यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना वकील प्रवीण चव्हाण (Praveen Chavhan) यांनी अनिल गोटेंना फोन केला होता, असा आरोप केला आहे. त्यावरुनही अनिल गोटे यांना आव्हान देत फडणवीसांनी हे आरोप सिद्ध करावेत, असं म्हटलंय. दरम्यान, केंद्राकडून सत्तेचा दुरुपयोग कसा सुरु आहे, हे देखील यावरुन समोर आलं असल्याची टीका अनिल गोटे यांनी यावेळी बोलताना केली आहे.
देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या आरोपांवर अनिल गोटे यांना विचारणा करण्यात आली. त्यावेळी अनिल गोटे यांनी म्हटलं आहे की,…
माझं नाव घेतलं याबाबत मी त्यांचा आभारी आहे, याशिवाय मला त्यांच्याबद्दल बोलताच आलं नसतं. आम्ही कुणाला अडकवण्यासाठी तिथे बसलो होतो असं त्यांनी (फडणवीसांनी) म्हटलंय. माझ्या एका केसबाबत मी तिथं बसलो होतो. चव्हाण नावाचे वकील जे आहेत, ते आमच्या धुळ्याला सातत्यानं येत होते. त्यामुळे त्यांना भेट घ्यायला गेलो होतो. पण देवेंद्र फडणवीस यांना एवढी काय पडली आहे की तिथे जाऊन शूटिंग करायला लावलं? म्हणजे कुणी आपआपसामध्ये बोलूही नये. केंद्र सत्तेचा दुरुपयोग करते, ते यातूनच सिद्ध होतं.
रेकॉर्डिग केल्याच्या बाबीवरुनही अनिल गोटे यांनी आक्षेप घेतलाय. रश्मी शुक्ला यांच्यावर करण्यात आलेले फोन टॅपिंगचा आरोपांचा हवाला देत अनिल गोटे यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधलाय. फडणवीस यांनी तो फोन अनिल गोटेंना करण्यात आला असल्याचा दावा केला होता. त्यावरुन अनिल गोटे यांनी सर्व आरोप फेटाळू लावले आहेत. तसंच खासगीत आता आम्ही आमच्या बायकांशीही बोलायचं नाही? असाही सवालही उपस्थित केला आहे.
विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी विधानसभेत एका स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून सनसनाटी आरोप केले आहेत. सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांच्यामार्फत अनेक महानायक खेळ खेळत असल्याचा अतिशय गंभीर, स्फोटक आरोप पुराव्यांसह फडणवीसांनी केला केला. पेन ड्राईव्ह सादर करत त्यांनी हे आरोप केले आहे.
सुमारे 125 तासांच्या या स्टिंगमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळ्या पेनड्राईव्हच्या माध्यमांतून त्यांनी सादर केलाय. भाजपमधील काही नेते टार्गेटवर असल्याचा आरोप यावेळी फडणवीसांकडून करण्यात आलाय. देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, गिरीश महाजन, जयकुमार रावल, सुभाष देशमुख, सुधीर मुनगंटीवार, चंद्रशेखर बावनकुळे इत्यादी नेते कसे टार्गेटवर होते, असा गंभीर आरोप यावेळी करण्यात आला आहे. या आरोपांमुळे राज्याचं राजकारण आता आणखी तापण्याची शक्यता आहे.
विरोधकाना संपवण्याचं षडयंत्र! फडणवीसांचा व्हिडीओ बॉम्ब, अजितदादांबाबतचा त्या व्हिडीओमध्ये काय?