मुंबई : शिवसेनेतून (shivsena) बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटानं वेगळीवाट पकडल्यानं सेनेत हकालपट्टीचं सत्र सुरू झाल्याचं दिसतंय. पक्षविरोधी काम केल्याचा शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalrao Patil) यांच्यावर ठपका ठेवण्यात आलाय. त्यावरुन माजी खासदार शिवाजीराम आढळराव पाटील यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे. एकनाथ शिंदे गटानं बंडखोरी केल्यानं शिवसेनेला मोठा फटका बसल्याचं बोललं जातंय. त्यामुळे शिवसेनेनं बंडखोर आणि त्यांच्या समर्थकांना पक्षापासून दूर करण्याचं सत्र सुरू केलंय.
शिवसेनेचे उपनेते आणि माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी सोशल मीडियावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यामध्ये त्यांनी ‘गर्जत राहील आवाज हिंदुत्वाचा अभिनंदन मुख्यमंत्री साहेब’ असं म्हटलं आहे. तसेच या पोस्टमध्ये पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा कुठेही फोटो टाकला नाही.
महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री पदावर मा.ना.श्री. एकनाथजी शिंदे साहेब @mieknathshinde यांची नियुक्ती झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन! pic.twitter.com/HN4ZMzXqO8
— Shivajirao Adhalrao (@MPShivajirao) July 1, 2022
एकनाथ शिंदे गटात सामील झाल्यानं पाटील यांच्यावर ही कारवाई आली आहे. यापूर्वी देखील शिवसेनेतून अनेकांची हकालपट्टी करण्यात आलीय. एकनाथ शिंदे गटासोबत सामील झाल्यानं त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आलीय. त्यामुळे पाटील यांच्यानंतर आता कुणावर कारवाई करण्यात येणार, याकडे लक्ष लागून आहे.
राज्यात एकीकडे शिवसेनेतून वेगळी वाट पकडलेला शिंदे गट वाढत असून दुसरीकडे शिवसेनेत गळतीचं सत्र सुरू झालंय. शिवसेनेत आधी एकनाथ शिंदे यांच्या समर्थकांची मोठ्या प्रमाणात हकालपट्टी केल्याचं दिसून आलं. त्यानंतर आता शिवसेना उपनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांची हकालपट्टी करण्यात आल्यानं मोठा शिरुर मतदारसंघात आता काय होणार, पाटील यांचे समर्थकही त्यांच्यासोबत जाणार का, याबाबतही चर्चा सुरू आहे.
शिवसेनेतून एकनाथ शिंदे गटानं वेगळं वळण घेतल्यानं सेनेत मोठी फूट पडली आहे. दरम्यान, यामुळे शिवसेनेला फटका बसत असून एकीकडे हकालपट्टी सुरू आहे. तर दुसरीकडे समर्थ शिंदे गटात सामील होत आहे. यामुळे ही फूट वाढतच जात असल्याचं दिसतंय.