सुनील घरत, शहापूर : ठाण्यातील दिग्गज नेते सुरेश (बाळ्या मामा) म्हात्रे (Suresh Balya Mama Mhatre) यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला. राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत बाळ्या मामांनी राष्ट्रवादीचे ‘घड्याळ’ हाती बांधले. अवघ्या साडेचार महिन्यांपूर्वी म्हात्रेंनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शिवसेना-मनसे-भाजप-शिवसेना-काँग्रेस नंतर आता राष्ट्रवादी असा सुरेश म्हात्रेंचा राजकीय प्रवास आहे.
ठाणे जिल्हा परिषद बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती सुरेश म्हात्रे यांनी गुरुवारी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, मंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील मुख्य कार्यालयात झालेल्या जाहीर कार्यक्रमात पक्षप्रवेश केला.
2019 च्या लोकसभा निवडणुकीत युतीमध्ये लढत असताना भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध केल्याने त्यांना शिवसेनेतून निलंबित करण्यात आले होते. नंतर निलंबन मागे घेण्यात आले होते.
कोण आहेत सुरेश म्हात्रे उर्फ बाळ्या मामा?
सुरेश गोपीनाथ म्हात्रे हे बाळ्या मामा नावाने प्रसिद्ध
शिवसेना ठाणे ग्रामीण जिल्हा संपर्क प्रमुख म्हणूनही काम केलं होतं
ठाणे जिल्हा परिषदेचे गटनेते, तर बांधकाम, आरोग्य समितीचे सभापती
2014 मध्ये सुरेश म्हात्रेंनी मनसेकडून लोकसभा निवडणूक लढवली होती
पराभवानंतर आधी भाजप, नंतर पुन्हा स्वगृही शिवसेनेत प्रवेश केला होता
2019 च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार कपिल पाटील यांना उघड विरोध करत उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
अर्ज मागे घेत कपिल पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे शिवसेनेतून निलंबित करण्यात आले, नंतर निलंबन मागे घेण्यात आले.
संबंधित बातम्या:
शिवसेनेचे दोन बडे नेते काँग्रेसमध्ये, अशोक शिंदेंसह बाळ्या मामा म्हात्रेंचेही पक्षांतर