मुंबई : अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांच्या (Nawab Malik) अडचणीत आणखी वाढ झाली आहे. मलिकांची कोठडी (custody) 4 एप्रिलपर्यंत वाढवण्यात आली असून मलिकांचा कोठडीतील मुक्काम आणखी वाढला आहे. कोठडी वाढल्याने नवाब मलिक यांचा आर्थर रोड कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. नवाब मलिक यांच्या विनंतीवरून त्यांना काही वस्तू वापरण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक अटकेत आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती. 7 मार्चला त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने (Mumbai court) त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. नवाब मलिक यांना तुरुंगात बेड आणि अथंरूणासोबत एक खुर्ची देण्यास मुंबई सत्र न्यायालयाकडून परवानगी देण्यात आली आहे. नवाब मलिक यांना अटक करण्यात आल्यानंतर काही दिवसांनी त्यांना प्रकृती अस्वास्थामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्यांना पाठदुखी व इतर व्याधींचा त्रास होत असल्याची चर्चा होती. त्यानंतर आता मलिक यांनी कोर्टाकडे बेड, खुर्चीची मागणी केली होती.
यापूर्वी मलिक यांनी जामिनासाठी अर्ज केला होता पण तो फेटाळण्यात आला. कुख्यांत गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहीणीशी जमीन व्यवहार आदीबाबत नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती. त्यानंतर नवाब मलिक आधी ईडी कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडीत होते. राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची अटक बेकायदेशीर असल्याचा दावा चुकीचा आहे, असा निर्वाळा मुंबई उच्च न्यायालयाने यापूर्वी दिला आहे. केंद्रीय तपासयंत्रणेची कारवाई कायद्याला अनुसरूनच आहे असे न्यायालयानं म्हटलं होतं. त्यावेळी नवाब मलिक यांच्या समोर रितसर जामीनासाठी अर्ज करण्याचा पर्याय उपलब्ध आहे, असंही न्यायालयाने म्हटलं होतं. न्यायालयाच्या निर्णयामुळे नवाब मलिक यांची न्यायालयीन कोठडी सुरू राहणार आहे.
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिकांची कोठडी वाढल्याने ते अडचणी आले आहेत. कोठडीत असलेल्या अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांना जामीन मिळून देण्यासाठी पैसे मागणाऱ्या विरोधात मलिक यांच्या मुलाने गुन्हा दाखल केला आहे. अमीर मलिक यांच्या तक्रारीवरून व्हीबी नगर पोलिसांनी इम्तियाज नावाच्या एका अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनी लाँड्रिंग प्रकरणी राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक अटकेत आहे. नवाब मलिक यांना 23 फेब्रुवारी रोजी ईडीनं अटक केली होती. 7 मार्चला त्यांच्या कोठडीचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर मुंबई न्यायालयाने त्यांना आणखी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. आता पुन्हा 4 एप्रिलपर्यंत त्यांना कोठडी सुनावण्यात आली आहे. मलिकांना कुख्यांत गुंड दाऊद इब्राहिम यांच्याशी आर्थिक व्यवहार तसेच त्यांच्या बहीणीशी जमीन व्यवहार आदीबाबत नवाब मलिकांना ईडीने अटक केली होती.
इतर बातम्या