मुंबई: गणेशोत्सव (Ganeshotsav) अवघ्या दोन महिन्यांवर येऊन ठेपलाय. कोकण आणि गणेशोत्सवाचं एक खास नातं आहे. गणेशोत्सवात मुंबई ते कोकण असा प्रवास करणारे नोकरवर्ग मोठ्या प्रमाणावर असतो. एसटी महामंडळाकडून (ST Mahamandal) गणेशोत्सवासाठी जादा गाड्यांची सोय करण्यात आलीये आता यापाठोपाठ रेल्वेने सुद्धा चाकरमान्यांचं टेन्शन कमी केलंय. कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सोयीसाठी एसटी महामंडळापाठोपाठ मध्य रेल्वेने 74 स्पेशल ट्रेन चालविण्याच्या निर्णय घेतला आहे. त्याचबरोबर या ट्रेन जर कमी पडल्या तर मध्य रेल्वेने (Central Railway) आणखी जादा गाड्या सोडण्याची तयारी ठेवली आहे.
कोकणात जाणाऱ्या नियमित गाड्या चार महिन्यांपूर्वीच फुल्ल झाल्याने या जादा फेऱ्यांचा समावेश केल्याने चाकरमान्यांना दिलासा मिळणार आहे. तसेच मध्य रेल्वेने आणखी जादा गाड्या सोडण्याची तयारी ठेवली आहे. याशिवाय नागपूर- मडगाव द्विसाप्ताहिक विशेष (१२ फेऱ्या), पुणे कुडाळ विशेष (6 फेन्या) आणि पुणे – थिविम/कुडाळ विशेष ट्रेनच्या 6 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. या गणपती स्पेशल गाड्यांचे आरक्षण स्पेशल चार्ज लावून सोमवार, 4 जुलैपासून सुरू होणार आहे. तसेच संगणकीय आरक्षण केंद्रे आणि आयआरसीटीसीच्या वेबसाईटवरूनही तिकिटांचे आरक्षण सुरू होणार आहे.
विशेष गाड्यांची गरज होतीच, पण चार महिन्यांपूर्वी नियमित गाडया फुल्ल झाल्या आहेत. एका सेकंदात आरक्षण फुल्ल होते. मग भल्यामोठ्या वेटिंगचे तिकीट हाती पडते. एवढी मोठी ‘वेटिंग लिस्ट’ देण्याची गरज काय आहे? हा प्रश्न रेल्वे व्यवस्थापनाने आधी मार्गी लावायला हवा असं नागरिक म्हणणं आहे.