पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीसाठी भाजपकडून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती केली आहे. त्यानंतर फडणवीस गोवा दौऱ्यावर आहेत. त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस आणि आम आदमी पक्षावर जोरदार हल्ला चढवलाय. यावेळी फडणवीसांसोबत गोव्याची मुख्यमंत्री प्रमोद सावंतही उपस्थित होते. काँग्रेससमोर अस्तित्वाचं आणि नेतृत्वाचं संकट असल्याचा घणाघात फडणवीस यांनी यावेळी केलाय. (Devendra Fadnavis criticizes Congress and AAP)
काँग्रेससमोर अस्तित्वाचे संकट आहे, नेतृत्वाचे संकट आहे. आम आदमी पक्ष केवळ पोस्टरबाजीत व्यस्त आहे. राज्य चालवण्यासाठी आचार, विचार आणि नीती लागते. अराजकतेनं अस्तित्व दाखवता येतं पण राज्य चालवता येत नाही, असा टोला फडणवीस यांनी काँग्रेसला आणि आम आदमी पत्राला लगावलाय. 2022 मध्ये भाजप पूर्ण आणि अश्वासक बहुमताने गोव्यात सरकार बनवेल असा दावाही फडणवीस यांनी यावेळी केलाय.
काँग्रेससमोर अस्तित्त्वाचे संकट आहे, नेतृत्त्वाचे संकट आहे.
आप केवळ पोस्टरबाजीत व्यस्त आहे.
राज्य चालवायला आचार, विचार आणि नीती लागते. अराजकतेने अस्तित्व दाखविता येते, पण राज्य चालविता येत नाही : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis
@BJP4Goa
@DrPramodPSawant— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 20, 2021
मजबूत सरकार आणि मजबुत संघटन घेऊन भाजप या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाईल आणि ऐतिहासिक विजय आम्ही संपादन करु. देशाला पुढे नेण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात होऊ शकते. हे जनतेला कळालं आहे, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.
गोवा सरकारनं लसीकरणात मोठी आघाडी घेतली. 100 टक्के नागरिकांना पहिला डोस देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात अनेक दुर्बल घटकांना विविध प्रकारची मदत करण्याचं काम गोवा सरकारनं केलं. पूरग्रस्तांनाही मोठी मदत गोवा सरकारनं केल्याचं फडणवीस म्हणाले. पर्यटन, रोजगाराच्या क्षेत्रातही मोठं काम झालं आहे. सरकार आपल्या दारी हा उपक्रमही महत्वाचा आहे. जनतेचे प्रश्न तात्काळ आणि त्याच ठिकाणी निकाली काढण्यासाठी त्याची मोठी मदत होणार असल्याचं फडणवीस यावेळी म्हणाले.
गोव्याने लसीकरणात मोठी आघाडी घेतली. 100 टक्के नागरिकांना पहिला डोज देण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात अनेक दुर्बल घटकांना विविध प्रकारची मदत करण्याचे काम गोवा सरकारने केला. पूरग्रस्तांना सुद्धा मोठी मदत सरकारने केली : देवेंद्र फडणवीस @Dev_Fadnavis https://t.co/mJxmU7p2eC
— @OfficeOfDevendra (@Devendra_Office) September 20, 2021
चंद्रकांत पाटील यांनी मला भाजपत येण्याची ऑफर दिली होती, असा गौप्यस्फोट मुश्रीफ यांनी केला आहे. त्याच्याही पुढे जाऊन मी भाजपची ऑफर नाकारली म्हणून मला त्रास देण्यासाठी माझ्यावर ईडीच्या धाडी वगैरे टाकल्या, असं मुश्रीफ यांनी सांगितलं. या सगळ्या प्रकारावर देवेंद्र फडणवीस यांना पत्रकारांनी प्रश्न विचारले असता त्यांनी मुश्रीफांवर पलटवार केला आहे. हसन मुश्रीफ साहेबांना भाजपमध्ये येण्याची कुणी ऑफर दिली, असा सवाल करताना असे ऑफर लेटर घेऊन आम्ही थोडी फिरत असतो, असे आमचे ऑफर लेटर मैदानात पडलेले नाहीत, कुणालीही देण्याकरिता, असा पलटवार देवेंद्र फडणवीस यांनी केला.
‘महाविकास आघाडी सरकार स्थापन होत असताना मी उद्धव ठाकरेंना सल्ला दिला होता की, राष्ट्रवादीकडे गृह खातं देऊ नका, असं चंद्रकांत पाटील म्हणाले. पाटलांच्या या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवारांसोबत शपथ घेतली तेव्हा तुम्ही हा सल्ला फडणवीसांना दिला होता का? असा सवाल पत्रकारांनी केला. पत्रकारांच्या या प्रश्नाला उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी ‘देवेंद्र फडणवीस दबंद नेते आहेत, ते शंभर अजित पवारांना खिशात घालून फिरतात, फडणवीसांच्या वयावर तुम्ही जाऊ नका’, असं वक्तव्य केलं आहे. त्याचवेळी अजित पवारांसोबत शपथ घेणं ही कॅल्क्युलेटेड रिस्क होती असंही चंद्रकांत पाटील पुण्यात म्हणाले.
Live from #Goa | Media interaction after Core Group Meeting in Goa.@BJP4Goa #BJP4Goa #Goa #GoaElections2022 #GoaAssemblyElections https://t.co/1OHC1D2ltK
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 20, 2021
इतर बातम्या :
मुश्रीफांच्या घोटाळ्यात पहिल्यांदाच शरद पवारांना ओढलं, किरीट सोमय्यांनी थेट नाव घेतलं
Devendra Fadnavis criticizes Congress and AAP