अजित पवार को गुस्सा क्या आया? सोम्या गोम्यांना उत्तर देणार नाही…

| Updated on: Jan 17, 2023 | 5:01 PM

अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन पाठवलंय. तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही.

अजित पवार को गुस्सा क्या आया? सोम्या गोम्यांना उत्तर देणार नाही...
गोपीचंद पडळकर आणि अजित पवार
Image Credit source: टीव्ही९ नेटवर्क
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार (ajit pawar) आज चांगलेच संतापले. राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक झाली. आमदार गोपीचंद पडळकर (gopichand-padalkar)यांच्यासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर अजित पवारांचा राग अनावर झाला. सोम्या-गोम्यांचा प्रश्नांना आपण उत्तर देणार नाही, असे ते म्हणाले.
मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक झाली. या बैठकीनंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.
नाशिकमध्ये बोलताना गोपीचंद पडळकर यांनी अजित पवार व शरद पवार यांच्यांवर जोरदार टीका केली होती. पडळकर म्हणाले होते की, ५० वर्षे तुम्ही राज्य केलात. कुणालाही चाळीस वर्ष दिलं तर तो जिल्ह्याचा विकास करेल. यांनी फक्त बारामतीचाच विकास केला. तुम्ही एक हजार कोटी राज्य सरकारचे नेता. तुमच्याकडं तिजोरी दिली आहे. ती गडप करू नका. ती राज्याची तिजोरी आहे. तुमच्याकडं एका विश्वासानं राज्यानं दिली.

काय होता प्रश्न :
पत्रकारांनी हा मुद्दा पकडून गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला. त्यावेळी अजित पवार चांगलेच संतापले. त्यांनी पहिल्यांदा तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली. “अशा उपटसुंभ लोकांना उत्तरे द्यायला मी बांधील नाही. त्याच्या प्रश्नावर उत्तर देण्यास मी बांधील नाही. त्याचे डिपॉझिट जप्त करुन पाठवलंय. तो काही ऐवढा मोठा नेता लागून गेला नाही.

हे सुद्धा वाचा

कृषी प्रदर्शन होत असताना शरद पवारांनी पैसे मागितले हे सिद्ध झाल्यास आपण राजकारण सोडून देऊ, असे अजित पवार यांनी सांगितलं. सोम्या गोम्यांचा प्रश्नाला उत्तर न देता ज्यांची जनमानसात प्रतिमा आहे, त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर देईल.

पडळकर यांनी दिले उत्तर :

गोपीचंद पडळकर यांनी अजित पवारांना उत्तर दिले. इंदिरा गांधींचाही पराभव झाला होता. मग अजित पवार किस झाड की पत्ती है. पवार कुटुंबाला मी सळो की पळो करुन सोडलंय. त्यांच्यांकडे उत्तर नाही. त्यांना उत्तर मी बारामतीत जाऊन देईल. पवार कुटुंब बावचाळल्यासारखे करत असल्याचेही पडळकर यांनी सांगितले.