सांगली : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता राज्याचे जलसंपदा मंत्री आणि सांगलीचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आज ( 20 जुलै) जिल्हाधिकारी कार्यालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली (Gopichand Padalkar slams Jayant Patil). या बैठकीला स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. मात्र, या बैठकीचे निमंत्रण न मिळाल्याने भाजपचे विधानपरिषद आमदार गोपीचंद पडळकर यांनी नाराजी व्यक्त करत जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला (Gopichand Padalkar slams Jayant Patil).
“जयंत पाटील यांना एक लाख लोकांनी मत देऊन निवडून दिलं आहे. पण जनतेने निवडून दिलेल्या आमदारांनीच गोपीचंद पडळकर म्हणजेच मला आमदार केलं आहे”, असं गोपीचंद पडळकर कडाडले.
TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!
“मी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यासाठी आलो होतो. इथे आल्यावर समजलं की, जिल्ह्यातील लॉकडाऊनचा निर्णय घेण्यासाठी पालकमंत्र्याच्या उपस्थिति बैठक सुरु आहे”, असं गोपीचंद पडळकर यांनी सांगितलं.
“मला बैठकीला का बोलावले नाही हे माहिती नाही. पण जयंत पाटील हा अत्यंत तज्ज्ञ आणि बुद्धिमान पंडीत माणूस आहे. मला असं वाटतं की, माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा सल्ला घ्यावा, असं त्यांना वाटत नसावं”, असा टोला पडळकरांनी लगावला.
“जयंत पाटील यांची नेमकी भूमिका काय ते मला नेमकं माहिती नाही. पण कोरोना आढावा बैठकीत चर्चेला बोलवण्यासाठी विधानसभा आणि विधान परिषदेचा आमदार असा भेदभाव करु नये”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
Mahafast 100 | बुलेटच्या वेगाने 100 बातम्या, ‘महाफास्ट’ रोज रात्री 7.56 वा. टीव्ही 9 मराठीवर
“जयंत पाटील यांच्यात विरोधी पक्षाच्या आमदारांना बैठकीला बोलवायचं धारिष्ट नाही. कोरोनाबात जयंत पाटलांना राजकारण करण्याची गरज नव्हती. याबाबत त्यांना राजकारण करण्याची गरजही नाही”, असं गोपीचंद पडळकर म्हणाले.
सांगलीत आठवडाभर कडकडीत लॉकडाऊन
कोरोनाबाधितांचा वाढता आकडा लक्षात घेता सांगलीत आठ दिवसांचा कडकडीत लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. हा लॉकडाऊन 22 जुलै रोजी रात्री 10 वाजेपासून 30 जुलै रात्री 10 वाजेपर्यंत असणार आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी याबाबत घोषणा केली. या बैठकीत मंत्री विश्वजीत कदम, स्थानिक लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी आणि इतर प्रशासकीय अधिकारी यांच्या उपस्थितीत कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. या बैठकीनंतर जयंत पाटील यांनी लॉकडाऊनची घोषणा केली.