Haryana Politics | लोकसभा निवडणुकीपूर्वी मोठी घडामोड घडली आहे. एका छोट्या पण महत्त्वाच्या राज्यात भाजपाच्या मुख्यमंत्र्याने राजीनामा दिला आहे. दिल्लीला लागून असलेल्या हरियाणामध्ये मोठा राजकीय भूकंप झाला आहे. हरियाणामध्ये भाजपाच सरकार आहे. या राज्याचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भाजपा आणि जननायक जनता पार्टी (JJP) यांची आघाडी तुटली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत जागा वाटपाच्या मुद्यावरुन ही आघाडी तुटल्याच बोलल जातय. मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळाने सुद्धा राजीनामा दिला आहे. मनोहर लाल खट्टर यांच्या राजीनाम्यामुळे सरकार कोणाच बनणार? हा प्रश्न पडू शकतो. पण सरकार भाजपाच स्थापन करेल.
आज दुपारी 1 वाजता नव्या सरकारचा शपथविधी होईल. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाच्या नव्या सरकारमध्ये संजय भाटिया यांना मुख्यमंत्री बनवलं जाऊ शकतं. नायब सैनी यांची उपमुख्यमंत्रीपदी वर्णी लागू शकते. संजय भाटिया करनालमधून खासदार आहेत. त्यांच्याजागी मनोहर लाल खट्टर यांना करनालमधून लोकसभेची उमेदवारी दिली जाऊ शकते. जेजेपीचे 4 ते 5 आमदार फुटून भाजपामध्ये सहभागी होऊ शकतात. हरियाणात चंदीगड येथील निवासस्थानी मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांची बैठक सुरु आहे. सीएम खट्टर यांची अपक्ष आमदारांसोबत बैठका सुरु आहेत.
#WATCH | BJP leader Manohar Lal Khattar leaves from Raj Bhavan in Chandigarh after resigning as CM of Haryana
CM Khattar and his cabinet submitted their resignations to state Governor Bandaru Dattatreya. pic.twitter.com/UaGDECkk5L
— ANI (@ANI) March 12, 2024
भाजपाला अशी पण त्यांची गरज नव्हती
भाजपाला जेजेपीची आवश्यकता नाहीय. त्यांच्याशिवाय ते सरकार स्थापन करु शकतात. सूत्रांच्या माहितीनुसार, भाजपाला बऱ्याच महिन्यांपासून जेजेपीपासून वेगळ व्हायच होतं. पण दुष्यंत चौटाला तयार नव्हते. अमित शाह, जेपी नड्डा आणि प्रभारी बिप्लब देब म्हणालेले की, भाजपा राज्यातील दहा जागांवर निवडणूक लढवून जिंकेल. सोमवारी दुष्यंत चौटाला यांनी जे.पी.नड्डा यांची भेट घेतली व हिसार, भिवानी-महेंद्रगढ या लोकसभेच्या 2 जागा मागितल्या. आघाडी तुटल्यानंतर भाजपा हरियाणामध्ये अपक्ष आमदारांच्या समर्थनाने आरामात सरकार बनवू शकते. जेजेपीच्या 10 आमदारांपैकी 5 चंडीगड येथे पोहोचले आहेत. जेजेपीचे आमदार देवेंद्र बबली, ईश्वर सिंह, रामनिवास, जोगीराम आणि दादा गौतम चंडीगडमध्ये दाखल झाले आहेत.