मुंबई: अनिल देशमुख यांनी गृहमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना गृहमंत्रीपद दिलं जाणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा आणि शरद पवारांचे खंदे समर्थक एवढीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची ओळख नाही, तर कोल्हापूर आणि कागलच्या विकासात त्यांचा मोठा वाटा आहे. सलग पाचव्यांदा निवडून येऊन ते कागलकरांच्या मनातील हिंदकेसरीही ठरले आहेत. मुश्रीफ यांची राजकीय कारकिर्द कशी आहे, त्याबाबताच घेतलेला हा आढावा. (hasan mushrif : ncp strong muslim face in western maharashtra)
कौटुंबीक स्थिती
हसन मुश्रीफ यांचा जन्म 1954मध्ये झाला. त्यांनी अर्थशास्त्रातून बीएची पदवी घेतली आहे. हिंदी, मराठी आणि इंग्रजीवर त्यांचं प्रभुत्त्व आहे. त्यांना तीन मुलं आणि एक मुलगी आहे. शेती हा त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. विद्यार्थीदशेपासूनच ते चळवळीत सक्रिय होते. दलित, मुस्लिम, शोषितांच्या विकासासाठी त्यांनी नेहमी आंदोलने केली. कर्नाटक सीमाप्रश्नावर शरद पवार यांच्या नेतृत्वात झालेल्या आंदोलनात त्यांनी भआग घेतला होता. अनेक शैक्षणिक संस्था आणि सहकारी बँकांवर ते चेअरमन म्हणून सक्रिय आहेत. सहकार क्षेत्रातही ते कार्यरत आहेत.
पाचव्यांदा कागल राखले
मुश्रीफ हे कोल्हापूरमधील कागल विधानसभा मतदारसंघातून पाचव्यांदा निवडून आले आहेत. 2019च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार समरजितसिंह घाटगे यांचा पराभव केला. 28 हजार मतांनी त्यांनी समरजितसिंह यांना पराभूत केले. तर शिवसेनेचे माजी आमदार संजय घाटगे या निवडणुकीत तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले. विशेष म्हणजे माझी ही शेवटची निवडणूक आहे, असं भावनिक आवाहन संजय घाटेग यांनी केले होते. मात्र त्यांना केवळ 55 हजार 657 मते मिळाली. त्यांचा सलग पाचव्यांदा पराभव झाला. तर मुश्रीफ यांनी सलग पाचवेळा मैदान मारून कागलकरांच्या मनातला आपणच हिंदकेसरी असल्याचं दाखवून दिलं आहे.
मंडलिक गटाच्याविरोधानंतरही विजयी
कोल्हापुरात दिवंगत माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांचा मोठा दबदबा होता. मुश्रीफ यांनीही कोल्हापुरावर वर्चस्व निर्माण केलं आहे. मात्र, मंडलिक गेल्यानंतर मंडलिक गटाने त्यांचं वर्चस्व कायम राखलं आहे. 2009च्या विधानसभा निवडणुकीत मुश्रीफ यांना मंडलिक गटाने विरोध केला होता. त्यामुळे मुश्रीफ विधानसभेवर पोहोचणार नाही, असं बोललं जात होतं. मात्र, हा विरोध असतानाही मुश्रीफ विजयी झाले. त्यामुळे कोल्हापुरात मुश्रीफ यांनीही निर्विवाद वर्चस्व निर्माण केल्याचं स्पष्ट होतं. सध्या कागल पंचायत समितीवर मुश्रीफ आणि मंडलिक गटाची सत्ता आहे.
मुस्लिम चेहरा
कोल्हापूरच्या राजकारणातील मोठं प्रस्थ आहे. कोल्हापूरच्या राजकारणावर त्यांचा दबदबा आहे. पश्चिम राष्ट्रवादीचा मुस्लिम चेहरा अशी त्यांची ओळख आहे. बेधडक, बिनधास्त आणि आक्रमक नेते म्हणूनही त्यांची ख्याती आहे. कोणतीही भिडभाड न ठेवता ते बेधडकपणे आपली मते मांडत असतात. 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला. गेल्या 20 वर्षांपासून ते कागलचं प्रतिनिधित्व करत आहेत. कोल्हापूर जिल्हा बँक, सरसेनापती संताजी घोरपडे साखर कारखाना, गडहिंग्लज कारखान्यावर त्यांचे वर्चस्व राहिलेले आहे.
दिग्गजांना डावलून…
कोल्हापूर जिल्ह्याचा राष्ट्रवादीचा सर्व कारभार मुश्रीफ यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. ते राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे खंदे समर्थक आहेत. पवारांचे अत्यंत निकटचे असल्यामुळेच नगरच्या पालकमंत्रीपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे. विशेष म्हणजे दिलीप वळसे पाटील, बाळासाहेब थोरात आणि शंकर गडाख आदी दिग्गज मंडळींना डावलून मुश्रीफ यांच्याकडेही महत्त्वाची जबाबदारी देण्यात आली आहे.
काँग्रेस ते मंत्री
काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. मात्र 1999 मध्ये ते राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर ते राष्ट्रवादीत सक्रिय झाले. 1999- 2004, 2004-2009, 2009-2014, 2014-2019 याकाळात ते विधानसभा सदस्य होते. मार्च 2001मध्ये त्यांनी पशू संवर्धन आणि दूग्ध विकास राज्यमंत्री म्हणून काम पाहिलं. त्यानंतर 2004मध्ये ते पुन्हा पशू संवर्धन, दूग्ध विकास आणि वक्फ विभागाचे राज्यमंत्री झाले. 2008 मध्ये त्यांनी नगरविकास मंत्री म्हणून काम पाहिलं. 27 जून 2014मध्ये ते ऑक्टोबर 2014पर्यंत ते जलसंपदा (कृष्णा खोरे) मंत्री होते.
आयकर विभागाची धाड
मुश्रीफ यांच्या कागल आणि पु्यातील घरावर 2019मध्ये छापे टाकले होते. त्यांच्या पुण्यातील कोंढव्यासह दोन घरांवर छापे मारण्यात आले होते. त्यांच्या साखर कारखायन्यावर आयकर विभागाने छापे टाकले होते. (hasan mushrif : ncp strong muslim face in western maharashtra)
कोण आहेत हसन मुश्रीफ?
>> हसन मुश्रीफ हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार आहेत
>> ते कोल्हापूर जिल्ह्यातील कागल विधानसभा मतदारसंघाचं नेतृत्त्व करतात
>> राष्ट्रवादीचा बडा मुस्लिम चेहरा म्हणून मुश्रीफ यांची पश्चिम महाराष्ट्रात ओळख आहे
>> कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात मुश्रीफ यांचा दबदबा आहे
>> आघाडी सरकारच्या काळात हसन मुश्रीफ यांची मंत्रिपदी वर्णी लागली
>> हसन मुश्रीफ यांनी कामगार मंत्रिपद सांभाळलं
>> 2014 च्या विधानसभा निवडणुकीत मोदी लाटेतही त्यांनी विजय मिळवला (hasan mushrif : ncp strong muslim face in western maharashtra)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/qJ3huyGgHi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
संबंधित बातम्या:
वनवासातून पुन्हा सत्तेत, असं आहे अशोक चव्हाणांचं ‘राज’कारण!
रश्मी शुक्लांचा दबाव झुगारला; कोण आहेत राजेंद्र पाटील-यड्रावकर?
‘ठाकरें’ना अटक ते ‘ठाकरें’च्या मंत्रिमंडळात; भुजबळांचा झंझावात माहीत आहे का?
(hasan mushrif : ncp strong muslim face in western maharashtra)