असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला

| Updated on: Aug 15, 2021 | 1:02 PM

विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. (hasan mushrif)

असे राज्यपाल येऊ शकतील असं बाबासाहेबांनाही वाटलं नसेल; मुश्रीफ यांचा राज्यपाल कोश्यारींना खोचक टोला
hasan mushrif
Follow us on

अहमदनगर: विधान परिषदेच्या 12 सदस्यांच्या नियुक्तीवरून राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका केली. राज्यपालांनी विधानसभेचे 12 आमदार लटकवून ठेवले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाने चांगला निकाल दिला आहे, असं सांगतानाच भविष्यात असे राज्यपाल येऊ शकतात असं डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना देखील वाटलं नसेल, अशी खोचक टीका हसन मुश्रीफ यांनी केली आहे. (hasan mushrif taunt governor bhagat singh koshyari over 12 mlc nomination)

हसन मुश्रीफ यांनी मीडियाशी बोलताना हा खोचक टोला लगावला. एका खाजगी कार्यक्रमात आमदार विनय कोरे यांनी विचारल्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, माझं देवेंद्र फडणवीस आणि राज्यपालांचं बोलणं झालंय. आपलं सरकार येईपर्यंत सदस्यांची नियुक्ती करायची नाही. यावरून राज्यपालांवर राज्यपालांचा दबाव आहे, हे स्पष्ट होतं. भाजप राज्यपालांवर किती दबाब आणणार? अशाने राज्यपालांची प्रतिष्ठा खराब होईल, असं मुश्रीफ म्हणाले.

तर यादी परत पाठवा

विधान परिषद सदस्य नियुक्तीवरून भाजप नेते अमित शहा यांनी काल राज्यपालांना समज दिली असेल, असं सांगताानाच राज्यपालांनी किती अप्रतिष्ठा केली. 9 महिने झाले अजून निर्णय नाही. ती यादी आवडली नसेल तर पुन्हा पाठवा. आम्ही परत पाठवू. मात्र निर्णय घ्या. होय म्हणा किंवा नाही म्हणा, पण निर्णय घ्या, असं आवाहनही त्यांनी केलं.

राज्यपाल म्हणतात…

स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या कार्यक्रमासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुण्यात आले होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजपचे खासदार गिरीश बापट आणि काँग्रेस नेते शरद रणपिसेही उपस्थित होते. कार्यक्रमानंतर रणपिसे यांनी राज्यपालांची भेट घेऊन 12 सदस्यांची नियुक्ती करण्याची विनंती केली. या सदस्यांना विधान परिषदेत येण्याचा मार्ग मोकळा करावा, असंही ते म्हणाले. त्यावर राज्यपालांनी रणपिसे यांनी त्यांच्या खास शैलीत उत्तर दिलं. अजित पवार माझ्याबरोबर आहेत. ते माझे मित्रं आहेत. ते इथेच आहेत. सरकार याबाबत आग्रह धरत नाहीत. तुम्ही का आग्रह धरता?, असा सवाल राज्यपालांनी केला. या विषयावर राज्य सरकारने पाटपुरावा केला पाहिजे, असं त्यांनी रणपिसेंना सांगितलं.

नंतर बोलू: अजित पवार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण आणि मी आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटलो होतो. त्यावेळी या 12 सदस्यांच्या नियुक्तीचा विषय काढला होता. तसेच हे प्रकरण कोर्टातही गेलं. त्यावर कोर्टाने सूचक विधान केलं आहे, असं सांगतानाच आज त्यावर जास्त बोलण्याची गरज नाही. आज स्वातंत्र्य दिन आहे. या विषयावर नंतर बोलेन, असं अजित पवार म्हणाले. (hasan mushrif taunt governor bhagat singh koshyari over 12 mlc nomination)

 

संबंधित बातम्या:

…तर नाईलाजाने आपल्याला लॉकडाऊन लावावा लागेल, मुख्यमंत्र्याचा जनतेला स्वातंत्र्यदिनी पुन्हा इशारा

तिसरी लाट भयंकर असणार, काळजी घ्या, महाविकास आघाडी तुमच्यासोबत: राऊत

12 सदस्यांच्या नियुक्तीसाठी सरकार आग्रह धरत नाही, तुम्ही का धरता?; राज्यपालांनी काँग्रेस नेत्याला सुनावले

(hasan mushrif taunt governor bhagat singh koshyari over 12 mlc nomination)