तेव्हा शरद पवारांबाबत कळलं नव्हतं का?; हसन मुश्रीफ यांचा राज ठाकरेंना सवाल

| Updated on: Aug 21, 2021 | 6:54 PM

राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. (hasan mushrif taunt raj thackeray over comment on ncp)

तेव्हा शरद पवारांबाबत कळलं नव्हतं का?; हसन मुश्रीफ यांचा राज ठाकरेंना सवाल
hasan mushrif
Follow us on

कोल्हापूर: राष्ट्रवादीच्या उदयानंतर राज्यात जातीयवाद वाढला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्याचा राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी समाचार घेतला आहे. शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओचा कार्यक्रम घेतला होता. तेव्हा तुम्हाला पवारांबद्दल कळलं नाही का?, असा सवाल हसन मुश्रीफ यांनी केला आहे. (hasan mushrif taunt raj thackeray over comment on ncp)

हसन मुश्रीफ यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना हा सवाल केला. राज ठाकरे यांनी शरद पवारांसोबत लाव रे तो व्हिडीओ हा कार्यक्रम घेतला होता, तेव्हा पवारांसोबत दौरे करत होते. तेव्हा त्यांना पवारांबद्दल कळलं नाही का? असा सवाल मुश्रीफ यांनी केला. राज यांना भाजपसोबत सलगी करायची आहे. पण त्यांनी परप्रांतियांबाबत जी भूमिका मांडलेली आहे. त्यावर भाजप आडून बसला आहे. ते धुवून काढण्यासाठीच ते राष्ट्रवादीला टार्गेट करत असावेत. त्यांनी एकत्र यावेत, दोघांनी एकत्र संसार करावा पण राष्ट्रवादीला बदनाम करण्याची गरज काय?, असा सवालही मुश्रीफ यांनी केला आहे.

भाजपची आदळ आपट थांबली

यावेळी त्यांनी भाजपवरही टीका केली आहे. भाजपचे राज्यातील नेते मध्यंतरी दिल्लीत गेले होते. त्यानंतर महाराष्ट्र भाजप शांत झाला आहे. दिल्लीतून आल्यापासून त्यांची आदळआपट कमी झाली आहे, असा चिमटाही त्यांनी काढला आहे.

पंचनामे झाले नाहीत, मदत कशी करणार?

पिकाला किती मदत द्यायची याबाबत अजून जीआर काढलेला नाही. पंचनामे झालेले नाहीत. मग मदत कशी जाहीर करणार? असा सवाल करतानाच राज्याचे आर्थिक स्रोत आटले आहे. 30 ते 35 कोटीचं केंद्र सरकारकडून येणं आहे. संकटातून आपल्याला मार्ग काढायचा आहे, या गोष्टी राजू शेट्टी यांनी लक्षात घेतल्या पाहिजे, असं सांगतानाच अलिकडे त्यांच्यात बदल झाला आहे असं मला वाटत आहे. यड्रावकर मंत्री झाल्यापासून त्यांच्यात बदल झाला आहे, असं ते म्हणाले. (hasan mushrif taunt raj thackeray over comment on ncp)

 

संबंधित बातम्या:

राज ठाकरे म्हणतात, राज्यातील जातीय द्वेषाला राष्ट्रवादी जबाबदार; रोहित पवारांनी पहिल्यांदाच दिलं जोरदार प्रत्युत्तर

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उपमुख्यमंत्री अजित पवारांचं महत्वाचं वक्तव्य, काय म्हणाले पवार?

‘मदिरालयावर ज्यांचा विश्वास, त्यांना मंदिरांशी काही देणंघेणं नाही’, सुधीर मुनगंटीवारांचा सरकारला टोला

(hasan mushrif taunt raj thackeray over comment on ncp)