कोल्हापुरातून हसन मुश्रीफांना तिकीट नाहीच!

| Updated on: Jul 05, 2019 | 4:41 PM

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर 4 जानेवारी 2019 रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची नावंही ठरवली. मात्र, कोल्हापूरच्या जागेवरुन राष्ट्रावादीत वाद सुरु झाला होता. याचं कारण तेथून धनंजय महाडिक हे विद्यमान खासदार असले, तरी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या जागेवरुन […]

कोल्हापुरातून हसन मुश्रीफांना तिकीट नाहीच!
Follow us on

कोल्हापूर : लोकसभेच्या निवडणुका जसजशा जवळ येऊ लागल्या आहेत, तसा राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने तर 4 जानेवारी 2019 रोजी मुंबईत झालेल्या पक्षाच्या बैठकीत संभाव्य उमेदवारांची नावंही ठरवली. मात्र, कोल्हापूरच्या जागेवरुन राष्ट्रावादीत वाद सुरु झाला होता. याचं कारण तेथून धनंजय महाडिक हे विद्यमान खासदार असले, तरी माजी मंत्री हसन मुश्रीफ यांनीही या जागेवरुन लढण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यामुळे कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरील उमेदवाराबाबत राष्ट्रवादीने निर्णय प्रलंबित ठेवला होता.

आता कोल्हापुरात जाऊन दस्तुरखुद्द शरद पवार यांनीच कोल्हापूर लोकसभेच्या जागेवरुन कोण लढेल हे स्पष्ट केले आहे. कोल्हापूरबद्दल बोलताना शरद पवार म्हणाले, “कोल्हापुरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारासंदर्भात आमचा निर्णय झालाय. हसन मुश्रीफ यांची संसदेपेक्षा महाराष्ट्रामध्ये अधिक गरज आहे. त्यांनी लोकसभेची मागणी केली होती.”

वाचा : कोल्हापूर लोकसभा : धनंजय महाडिकांच्या उमेदवारीला हसन मुश्रीफांचा विरोध

एकंदरीत शरद पवार यांनी कोल्हापुरातून लोकसभेसाठी हसन मुश्रीम हे राष्ट्रवादीचे उमेदवार नसतील, हे एकप्रकारे स्पष्ट केले आहे. मात्र, ‘कोल्हापुरातून आमचा उमेदवार ठरला आहे’ असे म्हणून त्यांनी धनंजय महाडिकांचं नाव निश्चित केल्याचंही अप्रत्यक्षपणे सांगितल्याची चर्चा कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात रंगताना दिसते आहे.

2014 साली नरेंद्र मोदी यांची कथित लाट असतानाही राज्यात राष्ट्रवादीने जिंकलेल्या जागांमध्ये कोल्हापूरच्या जागेचा समावेश आहे. कोल्हापुरातून धनंजय महाडिक हे 2014 साली राष्ट्रवादीच्या तिकिटावर जिंकले होते. महाडिकांचं कोल्हापुरातील राजकारणावर वर्चस्व असले, तरी त्यांचे विरोधकही तितकेच ताकदवान आहेत, हेही उघड सत्य आहे. त्यात, धनंजय महाडिक यांच्याबाबत कोल्हापुरातीलच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पक्षनेतृत्त्वाकडे नाराजीही दर्शवली होती. त्यामुळे महाडिकांना कोल्हापुरातून उमेदवारी मिळेल की नाही, याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. मात्र, शरद पवारांनी ‘मुश्रीफांची संसदेपेक्षा महाराष्ट्रात गरज आहे’ असे म्हणून एकप्रकारे महाडिकांच्या उमेदवारंच अप्रत्यक्ष समर्थन केले आहे.

दरम्यान, यावेळी शरद पवारांनी राज्यातील लोकसभा जागावाटपावरही भाष्य केले. “लोकसभेच्या निवडणुकीसंदर्भात 40 जागांचा विषय संपला आहे. 8 जागांचा निर्णय दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी बसून घ्यायचा आहे. या संदर्भात राहुल गांधी यांच्याशी चर्चा झाली असून, दोन ते तीन ठिकाणच्या जागेसंदर्भात चर्चा सुरु आहे. उमेदवार निवडून येण्याचं महत्वाचं आहे, उमेदवार काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा. दोन्ही पक्षाचे मोठे नेते प्रचारात उतरणार आहेत.” असे सांगत शरद पवारांनी राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झाल्याचेही स्पष्ट केले. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी मोठ्या ताकदीने उतरेल, यात शंका नाही.

संबंधित बातम्या :

लोकसभेसाठी काँग्रेस-राष्ट्रवादी सज्ज, जागावाटपाचा संभाव्य फॉर्म्युला तयार

लोकसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य उमेदवारांची नावं निश्चित

नगरसाठी राष्ट्रवादीचा आग्रह, तीन नावं निश्चित

मराठा मतांसाठी राष्ट्रवादीची ‘व्यूहरचना’

राष्ट्रवादीकडून लोकसभा निवडणूक लढण्याबाबत उज्ज्वल निकम म्हणतात…