कोल्हापूर – बहुचर्चित अशा कोल्हापूरातल्या (Kolhapur) निवडणुकीचे निकाल (Election Result) जाहीर होताचं, कोल्हापूराता महाविकास आघाडीतील नेत्यांनी जल्लोष करायला सुरूवात केली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांनी भाजपचे उमेदवार सत्यजीत कदम (Satyajeet Kadam) यांचा मोठ्या फरकाने पराभव केला. त्यानंतर भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, “हिंदुत्व आमचा अजेंडा नाही आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे. 51 साली जनसंघाची स्थापणा झाली. तेव्हापासून ३७० कलम रद्द झालं पाहिजे. कोणत्या तरी पक्षासारखी राजकीय आवश्यकता म्हणून आम्ही काही गोष्टी अचानक मांडलेल्या नाही. आणि त्यामुळे हिंदुत्वावर निवडणुक लढवली नाही. तर हिंदुत्वावरचं आम्ही निवडणुक लढवणार, हिंदुत्व आमचा आत्मा आहे. हिंदुत्व आमचा श्वास आहे. आणि त्यामुळे ते हिंदुत्व तु्म्हालाही अपेक्षित आहे.”
“आज एक पोस्ट फिरत आहे. हे शहर हिंदुत्व वाद्यांचं नाही तर पुरोगाम्यांचं आहे. हिंदुत्व या शब्दातचं पुरोगामित्व आहे. हिंदु या शब्दात पुरोगामीत्व आहे, याचं मोठ उदाहरण म्हणजे स्वातंत्र्यवीर सावकर आहेत. ते ज्या पध्दतीने विज्ञाननिष्ठ होते. तेवढं पुरोगामी कुणीही विज्ञाननिष्ठ असू शकतं नाही. असे विज्ञाननिष्ठ सुध्दा हिंदुत्वावादी असतात. आणि प्रचंड देवदेव करणारे सुध्दा हिंदुत्ववादी असतात” अशी प्रतिक्रिया त्यांनी कोल्हापूरात मिडीयाशी संवाद साधत असताना दिली. कोल्हापूरातील निवडणुक अत्यंत चुरशीची होईल असं अनेकांना वाटतं होतं. परंतु जयश्री जाधव यांनी सत्यजीत कदम यांचा मोठ्या फरकाने पराजय केला. त्यामुळे कोल्हापूरात महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते उत्साहात आहेत.
आम्ही ही निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढलो. तरी सुध्दा या जिल्ह्याचे पालक मंत्री बंटी पाटील यांचं असं म्हणणं आहे की, ती आम्ही जातीवर नेली, धर्मावर नेली. आम्ही हेचं मुद्दे मांडले की, तुम्ही मागच्या पन्नास वर्षात काय केलं ते सांगा आणि पाच वर्षात काय केलं ते सांगतो. आम्हाला राज्यात पाच वर्षे मिळाली. कोल्हापूर महापालिकेत पाच वर्षे मिळाली नाही.
“तीन पक्ष विरूध्द एक पक्ष असं कोल्हापूरात चित्र होतं. तीन पक्षांनी अगदी एकदिलाने काम केलं. स्वत:चं उमेदवार आहे, म्हणून काम केलं. स्वत:ची प्रतिष्ठापणाला लागेल असं काम केलं. असं असूनही आम्ही एकट्याने 77 हजार मतं मिळवली. तोंडाला फेस आणला. शेवटच्या राऊंडपर्यंत काहीही होऊ शकतं अशा स्थितीत ही निवडणूक होती. अटीतटीची निवडणूक झाली, शेवटी निवडणुकीमध्ये यश अपयश असतं. इंदिरा गांधी पंतप्रधान असताना सुध्दा पराभव स्विकारावा लागला होता” असं देखील चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं.