मुंबई : विधानसभेत अविश्वास प्रस्ताव असेल, तर त्यावर निर्णय होत नाही तोपर्यंत अध्यक्ष पीटिशन ऐकू शकत नाहीत. त्यामुळं विरोधकांकडून अविश्वास प्रस्ताव (Proposal) आणण्यात आला होता. त्यासाठी हा कारभार केला होता. विश्वास मताचा प्रस्ताव पारित केल्यामुळं दुसरा अविश्वासाचा (Distrust) प्रस्ताव वर्षभर आणता येत नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. ते म्हणाले, ज्या लोकांनी व्हीपचं उल्लंघन केलं. भरतसिंग गोगावले (Bharatsingh Gogavale) यांनी दिलेल्या व्हीपचं उल्लंघन केलं. अशा सदस्यांवर एकनाथ शिंदे आणि भरत गोगावले हे कारवाई करू शकतात. त्यामुळं हा विश्वासमताचा प्रस्ताव पारित केला, असं फडणवीस यांनी स्पष्ट केलं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, विश्वासमत प्रस्तावावर काल विजय मिळाला. कालही शिवसेना (शिंदे गट) व भाजपला 164 मतं मिळाले होते. काल विधानसभा अध्यक्षांनी मतदान केलं होतं. स्पीकर डायसवर असूनसुद्धा 164 मतं मिळाले. कराडचे एक सदस्य संतोष बांगर शिंदे गटात सहभागी झालेत. त्यामुळं एक चांगला विजय शिवसेना (शिंदे)-फडणवीस गटाला मिळाला. अध्यक्षांवर विश्वासमत व्यक्त करणारा प्रस्ताव पारित केला. काल 12 वाजून 1 वाजता अध्यक्ष निवडून आले. 12.2 मिनिटांनी अविश्वास प्रस्ताव दाखल केला. नियमानुसार असं करता येत नाही. शिंदे गटाला मान्यता मिळाल्यामुळं त्यांना काढलेला व्हीप लागू होणार हे माहीत होतं. त्यासाठी हा सारा खटोटोप विरोधक करत असल्याचं त्यांनी सांगितलं.
18 तारखेला अधिवेशन आहे. त्यादिवशी राष्ट्रपतींची निवडणूक आहे. त्यादिवशी अधिवेशन करणं शक्य होणार नाही त्याची नेमकी तारीख काय यासंदर्भात चर्चा करू. त्यामुळं 19 पासून किंवा त्याआधी घेता येत असेल. तर विश्वासमत जिंकणारे. दिलखुलास भाषण करणारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यानंतर पत्रकार परिषदेला संबोधित केलं.
व्हीपचं उल्लंघन केल्यास आपल्याविरुद्ध पिटीशन होतील. त्या पिटीशन अध्यक्षांना ऐकता येऊ नये, यासाठी हा कारभार होता. विश्वासमत पारीत केला. त्यामुळं त्यांच्या अविश्वास प्रस्तावाला काही अर्थ राहणार नाही. भरत गोगावले यांच्या विरुद्धची कारवाई शिंदे आणि गोगावले यांनी दाखल केली तर होऊ शकते, असंही फडणवीस म्हणाले.