सोलापूर : महाराष्ट्रातील प्रमुख रोमहर्षक लढतींपैकी एक मानली जाणारी लढत म्हणजे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील लढत. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर आणि भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी अशी तिन्ही ताकदवान उमेदवार असलेली ही लढत सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. सोलापुरात भाजपकडून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी हे रिंगणात आहेत. महास्वामींच्या संपत्तीबाबत अनेकांना कुतुहल होतं. अखेर महास्वामींनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर, त्यांचे प्रतिज्ञापत्र समोर आले आहे. त्यामुळे त्यांची संपत्ती किती, हेही उघड झाले आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांच्याकडे 3 कोटींहून अधिक रकमेची मालमत्ता आहे, असे त्यांच्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख आहे. विशेष म्हणजे, महास्वांमींकडे कोट्यवधींची मालमत्ता असली, तरी त्यांच्या पॅनकार्ड नसल्याचा उल्लेख प्रतिज्ञपत्रात असल्याने आश्चर्य व्यक्त केला जात आहे.
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींची मालमत्ता :
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींचे शिक्षण :
डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामींनी सोलापुरातील सिद्धेश्वर हायस्कूलमधून दहावीची परीक्षा दिली. त्यानंतर सोलापूरच्याच दयानंद कॉलेजमध्ये 1974 साली 11 वी P.D हे शिक्षण पूर्ण केले. पुढे उत्तर प्रदेशातील बनारस हिंदू विद्यापीठातून 1978-79 साली महास्वामींनी बीएचं शिक्षण पूर्ण केले.
राजकाणासाठी वाट्टेल ते, डॉ.जयसिद्धेश्वर शिवाचार्यांनी मौनव्रताची परंपरा मोडली
कोण आहेत जयसिद्धेश्वर महास्वामी?
अक्कलकोट येथील वीरशैव मठाचे मठाधीश म्हणून डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी सर्वदूर परिचित आहेत. शिवाय त्यांना मानणाऱ्या भाविकांची संख्या सुद्धा लक्षणीय आहे. महाराजांचे शैक्षणिक काम, मतदारसंघातील जातीय समीकरणे आणि भक्तांची संख्या पाहता महास्वामीजींचे पारडे जड मानलं जातं आहे.