पाच गाड्या, 40 तोळं सोनं, संग्राम जगतापांची संपत्ती किती?

| Updated on: Jul 05, 2019 | 4:07 PM

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी अहमदनगर दक्षिण मतदारसंघात मतदान पार पडेल. या मतदारसंघातून भाजपकडून सुजय विखे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम जगताप यांनी कालच शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते […]

पाच गाड्या, 40 तोळं सोनं, संग्राम जगतापांची संपत्ती किती?
Follow us on

अहमदनगर : लोकसभा निवडणुकीसाठीचं मतदान अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलं आहे. पहिल्या तीन टप्प्यातील निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासही सुरुवात झाली आहे. तिसऱ्या टप्प्यात 23 एप्रिल रोजी अहमदनगर दक्षिण मतदारसंघात मतदान पार पडेल. या मतदारसंघातून भाजपकडून सुजय विखे, तर काँग्रेस-राष्ट्रवादीकडून आमदार संग्राम जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. संग्राम जगताप यांनी कालच शेतकरी दाम्पत्याच्या हस्ते उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांनी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून त्यांनी संपत्तीही समोर आली.

आमदार संग्राम जगताप यांनी वाणिज्य शाखेतील पदवीपर्यंत शिक्षण घेतलं असून, ते बी कॉम उत्तीर्ण आहेत. संग्राम जगतापांविरुद्ध कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये 2018 मध्ये हत्येचा गुन्हा दाखल आहे.

संग्राम जगताप यांची संपत्ती :

  • जंगम मालमत्ता – 2 कोटी 25 लाख 65 हजार (रोख मौल्यवान वस्तू, वाहन)
  • स्थावर मालमत्ता – 6 कोटी 25 लाख 88 हजार 596 (शेती, घर)
  • कर्ज – 2 कोटी 91 लाख 70 हजार 584 रुपये

पाच गाड्या आणि चाळीस तोळे दागिने

आमदार संग्राम जगताप याना स्वतःच्या मालकीच्या दोन चारचाकी गाड्या आहेत. त्यातील एका गाडीची किंमत 22 लाख 70 हजार 856 रुपये तर 26 लाख 65 हजार 990 रुपये दुसऱ्या गाडीची किंमत आहेय. तर पत्नी शीतल जगताप यांच्या नावे तीन गाड्या आहे 19 लाख 19 हजार 900 रुपये तर दहा तोळे सोने असून 30 टोळ्यांचे दागिने आहेत.

सव्वा तीन कोटींचे कर्ज

आमदार जगताप आणि पत्नी शीतल जगताप या दोघांच्या नावावर 3 कोटी 25 लाख 49 हजार 132 रुपयांचे कर्ज आहे तर आमदार संग्राम जगताप यांच्यावर विविध बँकांचे मिळून 2 कोटी 91 लाख 70 हजार 584 रुपयांचे कर्ज तर पत्नी शीतल जगताप यांच्यावर बँकेचे 33 लाख 78 हजार 547 रुपयांचे कर्ज आहे.