बीड : मराठवाडा पदवीधर मतदारसंघ निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर भाजप नेत्या पंकजा मुंडे या बीडमध्ये सभा घेण्यासाठी दाखल झाल्या आहेत. पंकजा मुंडे आल्यामुळे सभेसाठी मोठी गर्दी झाली असून सोशल डिस्टंसिंगचा फज्जा उडाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. पंकजा मुंडे या उमेदवार शिरिष बोराळकर यांच्या प्रचारार्थ सभा घेण्यासाठी बीडमध्ये दाखल झाल्या आहेत. (huge crowd in Assembly of Pankaja Munde in Beed for Marathwada Graduate Constituency Election)
अधिक माहितीनुसार, पदवीधर निवडणुकांसाठी पंकजा मुंडेंची बीडमध्ये पहिलीच सभा असणार आहे. यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून सोशल डिस्टंसिंगचं पालन होत नसल्याची माहिती समोर येत आहे. खरंतर, कोरोनाच्या या जीवघेण्या संकटानंतर पंकजा या पहिल्यांदाच सभेमध्ये बोलणार आहेत. त्यामुळे बीडच्या सभेतील भाषणाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.
भाजप उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही सभा घेतली होती. यावेळी फडणवीसांनी सत्ताधारी शिवसेनेवर टीका केली होती. “ठाकरे सरकारच्या अजेंड्यावर मराठवाडा-विदर्भ नाहीच. नवीन सरकारने औरंगाबादच्या निधीलाही स्थगिती दिली. समृद्धी महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) यांचं नाव दिल्यामुळे ते काम सुरु आहे, असा टोला विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ठाकरे सरकारला लगावला होता.
“मागच्या वेळी गोपीनाथ मुंडे गेल्यामुळे भाजपचा पराभव झाला, मात्र शिरीष बोराळकर यांनी चांगली मतं घेतली होती. यावेळी मुंडे साहेबांचं स्वप्न पूर्ण करण्याचा आम्ही चंग बांधला आहे. मराठवाडा आणि विदर्भाचं चित्र बदलल्याशिवाय महाराष्ट्राचा विकास होणार नाही” असं फडणवीस म्हणाले होते.
पॉझिटीव्ह रुग्णाला मतदान करण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान, मराठवाडा पदवीधर निवडणुकीत कोरोना पॉझिटिव्हही मतदान करणार आहेत. मतदानासाठी आरोग्य विभागाकडून स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सायंकाळी चार ते पाच या वेळेत मतदानाची सोय असणार आहे. आरोग्य विभाग रुग्णाला मतदान केंद्रावर नेवून मतदान करण्यात येईल. (huge crowd in Assembly of Pankaja Munde in Beed for Marathwada Graduate Constituency Election)
रिंगणात कोण कोण ?
1. मराठवाडा औरंगाबाद पदवीधर
सतीश चव्हाण (राष्ट्रवादी)
शिरीष बोराळकर (भाजप)
प्रवीण घुगे (भाजप बंडखोर)
रमेश पोकळे (भाजप बंडखोर)
जयसिंगराव गायकवाड (भाजप बंडखोर)
2. पुणे पदवीधर
अरुण लाड (राष्ट्रवादी)
संग्रामसिंह देशमुख (भाजप)
प्रताप माने (राष्ट्रवादी बंडखोर)
रुपाली पाटील (मनसे)
शरद पाटील (जनता दल)
श्रीमंत कोकाटे (इतिहास संशोधक)
एन डी चौगुले (रयत क्रांती संघटना)
3. नागपूर पदवीधर
अभिजीत वंजारी (काँग्रेस )
संदीप जोशी (भाजप)
नितीन रोंघे ( विदर्भवादी)
राहुल वानखेडे (वंचित बहुजन आघाडी)
4. अमरावती शिक्षक
श्रीकांत देशपांडे (शिवसेना)
नितीन धांडे (भाजप)
दिलीप निंभोरकर (शिक्षक भारती)
संगीता शिंदे (शिक्षण संघर्ष समिती) (भाजपचे माजी कृषीमंत्री अनिल बोंडे यांची बहीण )
प्रकाश काळबांडे (विदर्भ माध्यमिक शिक्षक संघ )
5. पुणे शिक्षक संघ
जयंत आसगावकर (काँग्रेस )
उत्तम पवार (पदवीधर कल्याण मंडळ)
इतर बातम्या –
Pankaja Munde | बाळासाहेब ठाकरे केवळ एका पक्षाचे नाहीत, ते सर्वांचे : पंकजा मुंडे
भाजपला सोडचिठ्ठी, जयसिंगराव गायकवाड शरद पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
Devendra Fadnavis | …तर मराठवाडा कायमस्वरूपी दुष्काळमुक्त होऊ शकतो : देवेंद्र फडणवीसhttps://t.co/uVb9vCcWeU@Dev_Fadnavis
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2020
(huge crowd in Assembly of Pankaja Munde in Beed for Marathwada Graduate Constituency Election)