माझ्या बापाला कोणी मारलं मला माहीत, पण मास्टरमाइंड कोण होता?; पूनम महाजन यांचा सवाल

| Updated on: Nov 07, 2022 | 10:01 AM

शिवसेना-भाजप-रिपाइंच्या युतीतून मी 2014 आणि 2019मध्ये मी खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. जनतेने विश्वास देऊन निवडून दिलं. त्याचा अभिमान मला आहे.

माझ्या बापाला कोणी मारलं मला माहीत, पण मास्टरमाइंड कोण होता?; पूनम महाजन यांचा सवाल
माझ्या बापाला कोणी मारलं मला माहीत, पण मास्टरमाइंड कोण होता?; पूनम महाजन यांचा सवाल
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: मी तुम्हाला शकुनी (shakuni) म्हटल्यावर इतर पक्षातील लोक मला तू हे बोलणारी कोण? असा सवाल करतील. माझ्या घराबाहेर मोठी पोस्टर लावतील. तुझ्या बापाला कोणी मारलं असा सवाल करतील. माझ्या वडिलांना कोणी मारलं हे मला माहीत आहे. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता? तुम्ही सत्तेत होतात. तेव्हा तुम्ही हा मास्टरमाइंड का शोधला नाही? असा सवाल भाजपच्या (bjp) नेत्या, खासदार पूनम महाजन (poonam mahajan) यांनी केला. वांद्रे येथील सभेला संबोधित करताना पूनम महाजन यांनी हा सवाल केला.

मला माहीत आहे माझ्या बापाला कोणी मारलं. प्रत्येकवेळी तो प्रश्न निर्माण करून फरक पडत नाही. पण त्यामागचा मास्टरमाइंड कोण होता हे तुम्ही सत्तेत असताना का शोधलं नाही? असा सवाल पूनम महाजन यांनी केला.

हे सुद्धा वाचा

शिवसेना-भाजप-रिपाइंच्या युतीतून मी 2014 आणि 2019मध्ये मी खासदार झाले. त्याचा मला अभिमान आहे. जनतेने विश्वास देऊन निवडून दिलं. त्याचा अभिमान मला आहे. आमच्या मित्रपक्षाला जनमताचा का अभिमान नव्हता? असा सवालही त्यांनी केला.

दोन भावात म्हणा, मित्रांमध्ये म्हणा युतीत भांडण झालं, महाभारत झालं असं तुम्ही म्हणता. हे महाभारत घडवणारे शकुनी कोण कोण होते? ते तुम्हाला माहीतच असेल. या शकुनींनी महाभारत रचलं आणि स्वत: सत्तेवर जाऊन बसले. 2019 ते 2022 दरम्यान दोन भावात महाभारत घडलं. घडलं ते घडलं, असंही त्या म्हणाल्या.

आज लोकांच्या हितासाठी जनतेच्या हितासाठी आपण शिवाजी महाराजांचं शिवभारत घडवणार आहोत. श्रीकृष्णाने अर्जुनाला प्रत्येक प्रश्नाची उत्तरे दिली. त्याला आपण भगवत गीता म्हणतो.

महाभारतात अजून एक संवाद होता. श्रीकृष्ण आणि सारथी उद्धवाचा. त्याला उद्धव गीता म्हणतात. तो उद्धव गीता म्हणूनच वाचला जातो, असं त्यांनी सांगितलं.

या महापालिकेच्या कुरुश्रेत्रात उतरायचंय म्हणून मी भगद्वगीता वाचली. नंतर उद्धव गीता वाचली. त्यात पहिलाच प्रश्न पडला. उद्धव म्हणतो, कृष्णा सच्चा मित्रं होण असतो.

श्रीकृष्ण हसतात. उद्धवा, सच्चा मित्र तोच असतो जो गरज पडल्यावर काही न मागता देतो. तोच सच्चा मित्र असतो, असं श्रीकृष्ण सांगतात. मग उद्धव ठाकरेंनी सच्चा मित्रं म्हणून ही मैत्री का निभावली नाही? असा माझा सवाल आहे, असंही त्या म्हणाल्या.