मुंबई : मला अशा भारतात राहायचं नाही, जिथं फक्त भाजपचा पितृसत्ताक ब्राम्हणवादी दृष्टिकोन वरचढ असेल. मी मरेपर्यंत माझ्या विधानापासून मागे हटणार नाही. तुम्ही गुन्हे दाखल करा. मी देशाच्या प्रत्येक कोर्टात (Court) तुम्हाला भेटेन, असं वक्तव्य तृणमूल काँग्रेसच्या (Trinamool Congress) खासदार महुआ मोईत्रा यांनी केलंय. मी मरेपर्यंत माझ्या विधानापासून मागे हटणार नाही, असंही मोईत्रा म्हणाल्यात. महुआ मोईत्रा त्यांच्या ट्वीटमध्ये म्हणतात, देवींच्या बाबतीत तसेच वेस्ट प्लास्टिकच्या बाबतीत डबल स्टँडर्ड (Double Standard) आहेत. संघ लघु भारतीला पाठिंबा द्यायला लागला. कारण मूल आणि पार्ले अॅग्रोनं स्ट्रावरील बंदी नको, असा आग्रह केला. तेव्हा नियमात शिथिलता आणण्यात आली.
मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये तृणमूलच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. देवी कालीबद्दल वादग्रस्त वक्तव्य करून हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला. पश्चिम बंगालच्या सत्ताधारी पक्षाची हिंदू देवतांचा अपमान करण्याची ही अधिकृत भूमिका आहे का, असा सवालही भाजपनं उपस्थित केलाय.
मोईत्रा यांनी भाजपच्या गुंडगिरीला घाबरत नसल्याचं म्हटलंय. मी कालीदेवीची उपासक आहे. मला कुठलीही भीती नसल्याचं त्यांनी म्हटलंय. भाजपनं मोईत्रा यांच्यावर पश्चिम बंगालमध्ये पोलीस कारवाई करत नसल्याचा आरोप केलाय. तसेच दहा दिवसांत कारवाई न झाल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा दिलाय. तृणमूल काँग्रेसनं त्यांच्या विधानाचं समर्थन केलेलं नाही. तरीही मी जे म्हटलं ते सत्य आहे. त्यामुळं मी घाबरत नसल्याचं मोईत्रा यांनी स्पष्ट केलंय.
शशी थरूर म्हणाले, मोईत्रा यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळं धक्का बसला. धर्म ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब आहे. पण, मोईत्रावरील हल्ल्यामुळं मी अस्वस्थ झालो आहे. मोईत्रा यांच्या वक्तव्यामुळं धार्मिक भावना दुखावल्या गेल्याचं मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान म्हणाले. महुआ मोईत्रा यांनी काली देवीवर आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं.