मध्यरात्रं ते दुपार, महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या

| Updated on: Oct 19, 2024 | 1:23 PM

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर वेगवान घडामोडी घडत आहेत. काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत वेगाने हालचाली झाल्या आहेत. कारण राजकीय पक्ष आणि उमेदवारांच्या हाती महिन्याभरापेक्षा कमी वेळ आहे. कुठला नेता शरद पवारांच्या भेटीसाठी तातडीने विमानाने रवाना झाला? जाणून घ्या महत्त्वाच्या अपडेट्स

मध्यरात्रं ते दुपार, महाराष्ट्राच्या राजकारणातील 5 महत्त्वाच्या घडामोडी, जाणून घ्या
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक
Follow us on

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. 20 नोव्हेंबरला मतदान आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी म्हणजे निकाल. सर्वच राजकीय पक्ष आणि त्यांच्या उमेदवारांकडे आता फक्त महिन्याभराचा कालावधी उरला आहे. मात्र, अजूनही महाविकास आघाडी आणि महायुतीने कुठला पक्ष किती जागा लढवणार? उमेदवार कोण असणार? ते जाहीर केलेलं नाही. वेळ निघून चालली आहे. महाराष्ट्रात सत्ताधारी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असाच सामना असणार आहे. काही जागांवरचा पेच अजूनही सुटलेला नाही. मविआ आणि महायुतीमध्ये काही जागांवर दोन तर तीन पक्ष दावे सांगत आहेत. त्यामुळे जागा वाटप रखडतय. त्याशिवाय तिकीट न मिळाल्यामुळे इथून तिथे उडी मारणारे नेते, पक्षांतर बंडखोरी रोखण्याच दोन्ही आघाड्यांसमोर आव्हान आहेत. महाराष्ट्रात काल रात्रीपासून आज दुपारपर्यंत काही महत्त्वाच्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. त्यातल्या पाच महत्त्वाच्या घडामोडी जाणून घ्या.

पहिली महत्त्वाची घडामोडं

महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटामध्ये काही जागांवरुन तीव्र मतभेद आहेत. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांच्यात वाद झाल्याच्या बातम्या आल्या. आज काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

“मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंना भेटलो. ते रुग्णालयात होते. प्रकृतीची विचारपूस करण्यासाठी आलो होते. महाविकास आघाडीची प्रकृती सुद्धा ठीक आहे. महाविकास आघाडीत कुठलेही मतभेद नाहीत. आम्ही एकत्र निवडणूक लढवणार आहोत. आज दुपारी 3 वाजता नाना पटोले आणि संजय राऊत जागावाटपावर चर्चा करतील” असं रमेश चेन्नीथला यांनी भेटीनंतर सांगितलं.

मध्यरात्री बैठक

काल मध्यरात्री दिल्लीत अमित शाह यांच्यासमोर महायुतीमधला जागावाटपाचा तिढा सुटला अशी माहिती आहे. बैठकीत जागावाटपावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती. जवळपास सर्वच जागांचा तिढा सुटल्याची माहिती. थोड्या जागांचा निर्णय बैठकीत झाला नसल्याची माहिती. मात्र, त्या जागांचा निर्णय राज्यातील नेत्यांनी एकत्र बसून तिथेच सोडवण्याच्या शाह यांच्या सूचना. निवडणुकीच्या जोरदार तयारीला लागण्याचे शाह यांचे निर्देश. प्रचाराचे मुद्दे, जाहीरनामा आणि प्रचार सभा यावरही बैठकीत चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती

कुटुंब फोडण्यात भाजपाला अपयश

वसई-विरारमध्ये भाजपाच्या फोडाफोडीच्या राजकारणाला अपयश. बविआचे कार्याध्यक्ष तथा आमदार हितेंद्र ठाकूर यांचे आत्तेभाऊ राजीव पाटील यांची भाजपातील पक्षप्रेवेशातून माघार. पक्षांतर्गत कौटुंबिक वाद टाळण्यासाठी, राजीव पाटील यांची 89 वर्षाची आई, पक्षाचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर, बविआचे संघटक सचिव तथा राजीव पाटील यांचे छोटे भाऊ आजीव पाटील यांच्या मध्यस्थीला यश. नालासोपारा विधानभेतून आमदार हितेंद्र ठाकूर यांचे पुत्र आमदार क्षितिज ठाकूर यांच्यासमोर भाजप राजीव पाटील यांना तिकीट देऊन काका-पुतण्यात लावणार होते लढत. पक्ष आणि कुटुंब फोडण्याच्या भाजपाच्या राजकीय परंपरेला वसई विरार मध्ये हितेंद्र ठाकुरानी लावला ब्रेक.

या मतदारसंघात सर्वपक्षीय नेते आले एकत्र

पुण्याच्या खेड आळंदी विधानसभा मतदार संघात महायुती आणि महाविकास आघाडीकडून चुकीचे उमेदवार दिल्यास तिसरा पर्याय देण्यात येणार. खेड तालुक्यातील सर्व पक्षाचे प्रमुख नेत्यांचा एकत्र येत बैठकीत निर्णय. महाविकास आघाडी कडून अद्याप उमेदवारी जाहीर होण्याआधीच सर्व पक्षीय नेत्यांचा निर्णय. तालुक्याच्या हितासाठी गुन्हेगारी आणि वादविवाद थांबवण्यासाठी, तालुका चुकीच्या व्यक्तीच्या हातात जाऊ नये यासाठी सर्व पक्षीय नेत्यांचा तिसरा पर्याय देण्याचा विचार. तालुक्याचा सर्वांगीण विकास व्हावा, भीतीचे वातावरण नष्ट व्हावे यासाठी समाज मान्यता असलेला आणि चांगली वर्तणूक असलेला उमेदवार तालुक्याचा आमदार व्हावा अशी चर्चा या बैठकीत झाल्याचे बैठकीतील एक पदाधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले. अजित पवार गटाचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांना शह देण्यासाठी सर्व पक्षीय नेते एकत्र. खेड तालुक्यामध्ये अशा प्रकारे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन अनेक निर्णय केले आहेत. नुकतीच कृषी उत्पन्न बाजार समितीची सत्ता देखील त्याच माध्यमातून परिवर्तन झाले.

शरद पवारांच्या भेटीसाठी नेता तातडीने मुंबईला रवाना

जळगाव ग्रामीणचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे इच्छुक उमेदवार माजी मंत्री गुलाबराव देवकर शरद पवारांच्या भेटीसाठी रात्री तातडीने विमानाने मुंबईला रवाना. जळगाव ग्रामीण मतदार संघात जागेवरून महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे गट व राष्ट्रवादी शरद पवार गट या दोघांमध्ये सुरू आहे रस्सीखेच. जळगाव ग्रामीण मतदार संघात जागा ही मशाल चिन्हावरच लढवली जावी यावर उद्धव ठाकरे तसेच शिवसैनिक ठाम असल्याने तिढा. दुसरीकडे शरद पवार गटाचे गुलाबराव देवकर तसेच राष्ट्रवादी शरद पवार गट हे मशाल चिन्हा निवडणूक लढवण्यास तयार नसल्याची माहिती. तुतारी चिन्हावरच निवडणूक लढवली जावी, यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गट सुद्धा ठाम असल्याची माहिती. या दोन्ही गोष्टींमुळे जळगाव ग्रामीण मतदार संघात महाविकास आघाडीमध्ये तिढा निर्माण झाला आहे. तिढा सुटावा त्यासाठी गुलाबराव देवकर यांना शरद पवार यांनी तातडीने मुंबईला बोलावून घेतल्याची माहिती.