लाहोर: पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान (Imran Khan) यांच्या शिफारशीनंतर अखेर पाकिस्तानची नॅशनल असेंबली (संसद) (pakistan assembly) बरखास्त करण्यात आली आहे. इम्रान खान यांनी राष्ट्रपती आरिफ अल्वी यांच्याकडे संसद बरखास्त करण्याची मागणी केली होती. त्यानंतर हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता पाकिस्तानात (pakistan) 90 दिवसात म्हणजे तीन महिन्यात निवडणुका घेणं बंधनकारक आहे. तोपर्यंत इम्रान खान हे काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम पाहणार आहे. मात्र, अविश्वास प्रस्ताव फेटाळल्या गेल्यानंतर इम्रान खान यांनी संसदभंग करण्याची शिफारस करून विरोधकांना चीतपट केलं आहे. इम्रान खान यांची सत्तेतून हकालपट्टी करण्याची आणि त्यांना अटक करण्याची विरोधकांची खेळी इम्रान खान यांनी मोठ्या चतुराईने उधळून लावली आहे. तर, नव्याने निवडणुका होणार असल्याने इम्रान खान यांची पुन्हा सत्तेत वापसी होणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पाकिस्तानचे माहिती आणि प्रसारण राज्य मंत्री फारूख हबीब यांनी याबाबतची माहिती दिली. राष्ट्रपती आरिफ अल्वी यांनी पंतप्रधानांच्या शिफारशीची दखल घेऊन नॅशनल असेंबली बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रपतींनी 90 दिवसात निवडणुका घेण्याचे आदेश दिले आहेत, असं हबीब यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ बरखास्त करण्यात आलं आहे, अशी माहिती माहिती मंत्री फवाद चौधरी यांनी दिली. विशेष म्हणजे अविश्वास प्रस्तावावर मतदान झालं असतं तर इम्रान खान यांची सत्ता गेली असती. 342 सदस्य संख्या असलेल्या नॅशनल असेंबलीत बहुमतासाठी 172 सदस्यांचा आकडा आवश्यक आहे. मात्र, इम्रान खान यांच्या विरोधात त्यांच्या सहकाऱ्यांनी बंड पुकारलं होतं. त्यामुळे इम्रान खान यांची सत्ता जाणार असल्याचं बोललं जात होतं. मात्र, इम्रान खान यांच्या खेळीमुळे संसद भंग कररण्यात ते यशस्वी ठरले आहेत.
दरम्यान, इम्रान खान यांनी आज पुन्हा एकदा देशावासियांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी अविश्वास प्रस्ताव हा परदेशी षडयंत्र होतं, असा आरोप केला आहे. राष्ट्रपतींना संसद बरखास्त करण्याची शिफारस केली आहे. त्यामुळे नागरिकांनी आता पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे. निवडणुकीनंतरच कोण पाकिस्तानवर राज्य करेल हे दिसून येईल, असं खान यांनी म्हटलं आहे.
Pakistan President dissolves National Assembly, elections in 90-day
Read @ANI Story | https://t.co/H96iBcUCis#ImranKhanPrimeMinister #imrankhan #NoConfidenceMotion #NoTrustMotion #PakistanPoliticalCrisis pic.twitter.com/DMtXnW9li8
— ANI Digital (@ani_digital) April 3, 2022
संबंधित बातम्या:
डिजिटल इकोनॉमीसाठी नेपाळला भारताची मदत… जाणून घ्या काय होईल फायदा