Chhagan Bhujbal : मोठी बातमी, छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज, मतभेदाच कारण काय?

| Updated on: Jun 13, 2024 | 11:04 AM

Chhagan Bhujbal : अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये छगन भुजबळ नाराज असल्याची चर्चा आहे. काल देवगिरीवर राष्ट्रवादी काँग्रेसची एक बैठक झाली. त्यात छगन भुजबळ यांनी आपली नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे.

Chhagan Bhujbal : मोठी बातमी, छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज, मतभेदाच कारण काय?
chhagan bhujbal
Follow us on

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून मोठी बातमी आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराज असल्याची चर्चा आहे. छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन छगन भुजबळ नाराज असल्याच समजतय. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवणं छगन भुजबळ यांना फारस पटलेलं नाही अशी सूत्रांची माहिती आहे. प्रफुल पटेल यांची राज्यसभेची जागा रिक्त झाली आहे. त्या जागेवर सुनेत्रा पवार यांची वर्णी लागू शकते. राष्ट्रवादी काँग्रेसने अजून अंतिम निर्णय जाहीर केलेला नाही. सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं राष्ट्रवादीमधल्या एका गटाच मत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांचा शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांनी पराभव केला होता. भविष्यातील बारामतीच राजकारण लक्षात घेऊन सुनेत्रा पवार यांना राज्यसभेवर पाठवाव असं पक्षात एक मतप्रवाह आहे.

पण छगन भुजबळ या मताशी फारसे अनुकूल नाहीयत. सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्यावर छगन भुजबळ अजित पवार गटात नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेच्या उमेदवारीवरुन भुजळ नाराज असल्याची चर्चा आहे. राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. राज्यसभेच्या या जागेसाठी सुनेत्रा पवार, छगन भुजबळ, पार्थ पवार यांची नाव चर्चेत होती. सुनेत्रा पवार यांच्या नावावर सहमती झाली असून आज त्यांचं नाव जाहीर होईल अशी माहिती आहे.

देवगिरीवरच्या बैठकीत छगन भुजबळ काय म्हणाले?

छगन भुजबळ राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आहेत. अलीकडच्या काही दिवसात लोकसभा निवडणूक निकालाच्या आधी आणि नंतर त्यांनी अनेक विषयांवर स्पष्टपणे आपली मत मांडली होती. लोकसभेसारख विधानसभेला व्हायला नको, म्हणून भाजपाकडे आताच 80 जागा मागून घ्या, असं छगन भुजबळ म्हणाले होते. अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर राज्यसभा उमेदवारीबाबत बैठक झाली. या बैठकीत भुजबळ यांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करतील, त्यावेळी छगन भुजबळ तिथे उपस्थित राहणार का? याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.